“मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमुळे 2026 (CM Fellowship Maharashtra Scheme 2026)” राज्यातील तरुणांना आता थेट प्रशासनासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार. या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमुळे तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा वृंदावण्यास मदत व्हावी तरुणांमधील कल्पकता आणि वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह आणि तंत्रज्ञानाची आवड याचा उपयोग प्रशासनास हवा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025-26 जाहीर करण्यात आली आहे.
योजनेचा मुख्य उद्देश
राज्यातील तरुणांना सरकार सोबत काम करण्याची संधी मिळणार एवढेच नव्हे तर तरुणांना प्रशासकीय प्रक्रियेची ओळख करून देणे.
तरुण पिढीच्या स्किल चा वापर करून नवीन कल्पनांचा वापर करून सरकारी योजना अधिक प्रभावी शाली बनवणे.
तरुणांना प्रशासकीय कामाची ओळख करून देणे एवढेच नव्हे तर भविष्यातील सामाजिक आणि राजकीय नेतृत्वासाठी तयार करणे.
मुख्यमंत्री फिलोशीप योजना 2026 (CM Fellowship Maharashtra Scheme) हे पूर्णपणे यशस्वी पार पडल्यानंतर जे प्रमाणपत्र मिळते ते अतिशय भविष्यासाठी मौल्यवान ठरू शकते.
पात्रता काय असणार ?
- उमेदवाराचे वय हे 21 ते 26 दरम्यान असायला हवे
- शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे
- पदवी मध्ये 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे
- त्यांची पदवी पूर्ण झालेली आहे अशा उमेदवारांना अधिक पसंती केली जाऊ शकते
- उमेदवाराला संगणकाची माहिती असणे गरजेचे आहे जसे की MS- OFFICE (Word, Excel, PowerPoint) आणि इंटरनेट हाताळण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे कारण प्रशासकीय कामात याचा मोठा वापर करण्यात येतो
- भाषेचे ज्ञान असणेही अनिवार्य आहे खास करून मराठी भाषेचे ज्ञान मराठी भाषा ही लिहिता वाजता आणि बोलता येणे अनिवार्य आहे.
- इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेचे ज्ञान असेल तर फायदेशीर ठरते.
पात्र उमेदवारांची एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाते परीक्षेतील विषय सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी तर्कशास्त्र आणि चालू घडामोडी असे असणार आहेत.
जास्तीत जास्त प्रश्न हे महाराष्ट्राची भौगोलिक सामाजिक आणि आर्थिक स्थिती यावर विचारली जातात. आणि विचार करण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी निबंध व लेखी स्वरूपाचे प्रश्न सुद्धा विचारले जातात
उमेदवारांना एक वर्षाचा कामाचा अनुभव असेल तर मुख्यमंत्री फिलोशीप योजनेसाठी (CM Fellowship Maharashtra Scheme 2026) तुम्ही पात्र ठरता फक्त पदवी असूनच चालत नाही. महत्त्वाचे म्हणजेच ही अट अनेक तरुणांना माहीत नाही अर्ज करण्यापूर्वी ही पात्रता नक्कीच तपासा
आवश्यक कायद पत्रे
- आधार कार्ड: (मोबाईल नंबर लिंक असलेले).
- रहिवासी पुरावा (Maharashtra Domicile)
- १० वी गुणपत्रिका/प्रमाणपत्र (वयाचा पुरावा म्हणून १० वीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते).
- १२ वीची गुणपत्रिका/प्रमाणपत्र
- पदवी (Graduation) गुणपत्रिका व प्रमाणपत्र: किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असल्याचे सिद्ध करण्यासाठी.
- पदव्युत्तर (Post-Graduation) प्रमाणपत्र: (जर झाले असेल तर).
- कामाचा अनुभव (सर्वात महत्त्वाचे)
- अनुभव प्रमाणपत्र (Work Experience Certificate): किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असल्याचे अधिकृत पत्र.
- यामध्ये कंपनीचे नाव, तुमचा हुद्दा (Designation) आणि कामाचा कालावधी स्पष्ट असावा.
- संगणक ज्ञान प्रमाणपत्र: (उदा. MS-CIT किंवा समकक्ष कोर्स).
- मराठी भाषेचे ज्ञान: १० वी किंवा १२ वी मध्ये मराठी विषय असल्यास त्याची गुणपत्रिका पुरावा म्हणून काम करते.
- पासपोर्ट साईज फोटो: अलीकडचा काढलेला आणि स्पष्ट बॅकग्राउंड असलेला.
- स्वाक्षरी (Signature): पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी स्कॅन करून.
मानधन (Salary) किती असणार?
मुख्यमंत्री फेलोशिप योजनमध्ये (CM Fellowship Maharashtra Scheme ) मिळणारे मानधन हे इतर इंटरशिपच्या तुलनेत आकर्षक आहे 2026 च्या नवीन नियमांनुसार फेलोजसाठी मानधाचे स्वरूप असे असेल:
- निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा एकूण ६१,५०० रुपये असे दिले जाणार आहेत . यामध्ये नियत मानधन हे 60,000 असे असणार आणि प्रवास भत्तर (Travel Allowance ) हा १,५०० असा दिला जाणार आहे
- मानधन हे दर महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या बँक खात्यात मिळून जाईल. आणि यासोबतच तुम्हाला सरकार फेलोजचा अपघाती विना देखील काढून देण्यात येईल.
- आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कामाच्या दरम्यात काही अपघात झाल्यास आर्थिक सुदक्षा म्हणून या मानधन सोबतच सरकार फेलोला ५ लाख रुपयापर्यंतच्या विम्याचे संरक्षण दिले जाईल.
इतर सवलती काय असणार ?
इतर सवलती म्हटले तर मुख्यमंत्री फेलोशिप योजना (CM Fellowship Maharashtra Scheme)या फेलोला वर्षभरातून 8 रजा मिळतील.
काही प्रमाणपत्र ही मिळतील हे फेलोशीप यशस्वी पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळते याची मुल्य हे खाजगी आणि सरकारी नोकरीत जास्त आहे शैक्षणिक बोनस देखील मिळेल IIT बॉम्बे या अभ्यासक्रमाचे शुल्क सरकार स्वतः भरते या मुख्यमंत्री फेलोशिप दरम्यान फेलोसाठी IIT बॉम्बेद्वारा शैक्षणिक अभ्यासक्रम ( Post Graduate Diploma/ Certificate ) राबवला जातो. आणि हे फेलोशिप एसएससी पार पडल्यास प्रमाणपत्र मिळते हे प्रमाणपत्र तुमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे ठरेल.
अर्ज कसे भरावे ?
- सर्वात आधी मुख्यमंत्री फेलोशिपच्या अधिकृत पोर्टलला mahcmfellowship.org भेट द्या
- नोंदणी करा New Registration वर क्लिक करा चालू मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा
- अर्ज भरा यातील सर्व माहिती शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील हा अचूक असावा यात काही चुकीची माहिती नसावी याची काळजी घ्या.
- कागदपत्रे अपलोड करा तुमचा फोटो, स्वाक्षरी व अनुभव प्रमाणपत्र (तुम्ही घेतलेला अनुभव) स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जासाठी ठराविक अर्ज फी भरा (ऑनलाइन पद्धतीने असेल तर)
- अर्ज भरून झाल्यानंतर तो सबमिट करा आणि भविष्यासाठी अर्जाची प्रिंट किंवा पीडीएफ जतन करून ठेवा.
अर्ज प्रक्रिया सुरू तारीख 8 मे 2026 असून शेवटची तारीख ही 27 मे 2026 (रात्री 11: 59 वाजेपर्यंत)
अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे “JPEG”या फॉरमॅटमध्ये तयार ठेवा जेणेकरून अर्ज भरताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कृपया अर्ज करण्यापूर्वी २०२६ ची अधिकृत जाहिरात तपासा, कारण अटी व शर्तींमध्ये बदल होऊ शकतो.
सूचना ( Disclaimer )
या लेखामध्ये दिलेली माहिती ही उपलब्ध अधिकृत माहिती व विविध स्रोतांवर आधारित आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे नियम, पात्रता, मानधन, अर्ज प्रक्रिया किंवा तारखांमध्ये शासनाकडून वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरील सूचना व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती फक्त अधिकृत पोर्टलवरच भरावी.