Post-Matric Scholarship Scheme 2026 : विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरु केली आहे त्या योजनेचे नाव पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना असे आहे. घरची आर्थिक स्थिती पाहून विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली.
10 वी नंतरचे शिक्षण (11 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर व विविध व्यावसायिक अभ्यासक्रम) इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण हा कमी होत आहे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण व विना अडथळा शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
जर तुम्ही ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ही योजना खास तुमच्यासाठीच आहे. या योजनेमुळे तुमच्या शिक्षणाचा खर्च हा वाचतो आणि तुम्ही शिक्षण घेऊ शकता. या योजनेची अर्ज प्रक्रिया, अर्ज प्रक्रियेसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र आणि वयोमर्यादा याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे खालील लेखांमध्ये देण्यात आली आहे.
Post-Matric Scholarship Scheme 2026 : योजनेचा उद्देश
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2026 या योजनेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य :10 वी नंतरचे शिक्षण उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही कारण आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागते. म्हणून विद्यार्थ्यांना आर्थिक फार सहन करता शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे.
- शिक्षणातील गळती रोखणे : गरिबीमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे माध्यमिक शिक्षणानंतर शाळा महाविद्यालय सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे, आणि शिक्षणात सातत्य राखणे.
- समान संधी उपलब्ध करून देणे : समाजामधील सर्व मागासवर्गीय आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या समान संधी मिळवून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये प्रगत व व्यावसायिक शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे, जेणेकरून ते त्या व्यवसायामध्ये चांगले करिअर घडू शकेल आणि सक्षम बनू शकतील.
Post-Matric Scholarship Scheme 2026 :पात्रता – Eligibility
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2026 यासाठी आवश्यक असलेली पात्रता खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- विद्यार्थी दहावी (SSC) परीक्ष па उत्तीर्ण असावा आणि पुढील उच्च शिक्षणासाठी म्हणजेच इयत्ता ११ वी, १२ वी, पदवी (Graduation), पदव्युत्तर (Post-Graduation) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त तांत्रिक व व्यावसायिक (Technical & Professional) अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आणि कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व स्त्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न हे शासन नियमानुसार निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना विद्यालया मधील कमीत कमी 75% किंवा नियमानुसार आवश्यक असणारी हजेरी असणे आवश्यक ठरते.
- विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम शासनाकडून किंवा संबंधित शासकीय मंडळाकडून मान्यताप्राप्त असणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थी या पूर्वीच्या शिक्षणात उत्तीर्ण झालेल्या किंवा खंड पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमानुसार निकष लागू असतात.
Post-Matric Scholarship Scheme 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2026 योजनेचा अर्ज करत असताना अर्जुनदार विद्यार्थ्यांकडे खालील कागदपत्रांची यादी असणे बंधनकारक आहे.
- ओळख पटवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि आधार कार्ड हे मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे.
- रहिवासी दाखला (Domicile Certificate) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- मागील वर्षातील गुणपत्रिका 10वी, 11वी आणि आधीच्या सेमिस्टर ची मार्कशीट असणे आवश्यक असते.
- चालू शैक्षणिक वर्षांमधील महाविद्यालयाची फी पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला (Income Certificate)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल झालेला चेक असणे अनिवार्य आहे.
- सक्षम अधिकारी याद्वारे प्रमाणित केलेला उत्पन्नाचे स्वाक्षरी पान किंवा स्वयंपाक घोषणापत्र असावी लागते.
वPost-Matric Scholarship Scheme 2026 : योमर्यादा – Age Limit
| शैक्षणिक स्तर | वयोमर्यादा निकष |
| इयत्ता ११ वी आणि १२ वी साधारणपणे | १६ ते १९ वर्षे वयोगट. |
| पदवी अभ्यासक्रम (Graduation) | १८ ते २३ वर्षे वयोगट (अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत). |
| पदव्युत्तर अभ्यासक्रम (Post-Graduation) | विशिष्ट उच्च शिक्षणासाठी कमाल वयोमर्यादेची अट सहसा नसते, अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमांनुसार लागू. |
| तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Courses) | संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय इ.) प्रवेश परीक्षांच्या नियमांवर आधारित. |
Post-Matric Scholarship Scheme 2026 : अर्ज प्रक्रिया
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2026 खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आली आहे.
- सर्वप्रथम रजिस्टर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- पोर्टलवर गेल्यानंतर Applicant Registration या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती टाकून नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड मिळेल त्यांचा वापर करून लॉगिन करू शकता.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, पत्ता, जात, उत्पन्न आणि शैक्षणिक तपशील स्पष्ट आणि अचूक भरणे अनिवार्य आहे, माहिती चुकीची असल्यास अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही किंवा रद्द होऊ शकतो.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यानंतर My Scheme या पर्यायांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे Social Justice and Special Assistance Department किंवा संबंधित विभागांतर्गत येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही योजना शोधा आणि Apply या बटन वर क्लिक करा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामध्ये सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर भविष्यासाठी अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्या सोबत ठेवा.
- अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र आणि अर्जाची प्रिंट आउट काढून आणि सर्व कागदपत्रांसह कॉलेजमध्ये जमा करा.
- वरील सर्व कागदपत्रे कॉलेज जमा केल्याशिवाय तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “उद्योगिनी योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/udyogini-yojana-2026/