आत्ता मिळणार निवृत्तीनंतरही पैसे! आता तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारने उत्तम उपाय निवडला आहे ते म्हणजेच “नवीन संचन योजना”(National Pension System) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर मिळणार हमखास पेन्शन काळजी मिटली. नवीन संचन योजनेमुळे वृद्धापकाळात आर्थिक आधार म्हणून ही योजन लागू करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर बचतीची सवय लागते तसेच देशातील पेन्शन व्यवस्था मजबूत बनते. खत्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी तुमच्या NPS खात्याचा PRAN( Permanant Retirement Account Number) असा unique नंबर असतो.
कोणासाठी ही योजना बेस्ट आहे ?
नवीन संचन योजना 2026 (National Pension System) ही योजना ज्यांच्याकडे पेन्शन सुविधा उपलब्ध नाहीत, जर तुम्ही खासगी नोकरी करत असाल किंवा तुमचा छोटा व्यवसाय आहे, तुम्ही तरुण गुंतवणूकदार असला तर ही योजना तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.
नवीन संचन योजनेची वैशिष्ट्ये :
- अगदी 1,000 रुपयेपासून गुंतवणूक सुरू करता येते
- दीर्घकालीन बचत होते
- निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा वाढते
- तुमचे खाते हे ऑनलाइनच उघडता येते
- कर सवलतीचा फायदा होतो
- विविध फंडांमध्ये गुंतवणूक करता येते
मिळणारे फायदे
- नवीन संचन योजनेमुळे मिळणारे फायदे:
- नियमित पेन्शन भेटेल
- आर्थिक सुरक्षितता वाढेल
- कर बचत होईल
- चक्रवाढ व्याजाचा फायदा होणार तुमच्यानंतर कुटुंबासाठी भविष्यतील सुरक्षितता वाढेल
- महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीनंतर तणाव कमी होईल
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- PAN कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँक खाते
- फोटो आणि स्वाक्षरी
- वय मर्यादा- 18-70 वर्षे
NPS खाते कसे उघडावे?
- अधिकृत NPS वेबसाईटवर जा
- Registration करा माहिती भरा
- वैयक्तिक माहिती अचुक भरा
- दिलेली KYC पूर्ण करा
- पहिली रक्कम जमा करा (१,००० पासून सुरू)
- तुम्हाला PRAN नंबर मिळेल ( लक्षात ठेवा)
खात्याचे प्रकार
१. Tier-I: हे मुख्य पेन्शन खाते आहे. यातून निवृत्तीपर्यंत पैसे काढता येत नाहीत (काही अटींसह सूट). यावर प्राप्तिकरात (Income Tax) सवलत मिळते.
२. Tier-II: हे एक ऐच्छिक (Voluntary) बचत खाते आहे. तुमच्याकडे Tier-I खाते असेल तरच हे उघडता येते आणि यातून तुम्ही कधीही पैसे काढू शकता.
NPS कसे काम करते?
गुंतवणुकीची प्रक्रिया (Accumulation Phase): तुम्ही जी रक्कम दरमहा किंवा वर्षाला जमा करता ती रक्कम खात्यामध्ये तशीच राहत नाही तर त्याची गुंतवणुक केली जाते. ही रक्कम वेशवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवली जाते.
तुमचे पैसे कुठे गुंतवले जातात? (Asset Classes): तुमचा पैसाहा सरकारी रोख, बॉड्स, शेअर बाजार यामध्ये गुंतवला जातो. तुम्ही स्वतः ठरवू तुमचा पैसा किती शेअर बाजारात असावा. ( यासाठी तुम्हाला शेअर मार्केट यावे अशी अट नाही कसलीही शंका न ठेवता तुम्ही गुंतवणुक करू शकता)
अधिक माहिती:
Asset E (Equity): शेअर बाजारात गुंतवणूक (जास्तीत जास्त परताव्यासाठी).
Asset C (Corporate Debt): कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक.
Asset G (Government Securities): सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक (सुरक्षिततेसाठी)
फंड मॅनेजर्सची भूमिका: तुमचे पैसे या योजनेमध्ये सुरक्षीत ठेवण्यासाठी सरकारने “पेन्शन फंड मॅनेजर्स” (उदा. SBI, LIC, HDFC, ICICI) असे नमलेले असतात यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही.
चक्रवाढ व्याजाचा फायदा (Power of Compounding): तुम्ही या नवीन संचय योजनेमध्ये जेवढ्या लवकर गुंतवणुक कराल तेवढ्या लवकर तुम्हाला तेवढाच जास्त फायदा होईल. या गुंतवणुक मध्ये व्याजही मिळते, अशप्रकारे निवृत्तीपर्यंत ( Retirement )मोठी रक्कम तायार होईल.
निवृत्तीच्या वेळी काय होते? (At the age of 60): . ६० व्या वर्षी तुमचे NPS खाते मॅच्युअर होते. ६०% तुम्ही ही रक्कम एकाक वेळी काढू शकता ही रक्कम करमुक्त (Tax Free) असते. ४०% ही रक्कम तुम्हाला अनिवार्यपणे ‘ॲन्युइटी’ (Annuity) मध्ये गुंतवावी लागते. यातून तुम्हाला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते
Permanent Retirement Account Number (PRAN)
‘PRAN’ म्हणजे Permanent Retirement Account Number (कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक) होय.
NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) मध्ये नोंदणी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा एक १२ अंकी युनिक ओळख क्रमांक दिला जातो. या क्रमांकाबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- कायमस्वरूपी ओळख: आधार किंवा पॅन कार्डप्रमाणेच PRAN क्रमांक एकदाच दिला जातो आणि तो आयुष्यभर बदलत नाही.
- नोकरी बदलली तरी तोच: तुम्ही तुमची नोकरी बदलली किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलात, तरी तुमचा हा क्रमांक तोच राहतो.
- प्रवेशाचे साधन: तुमच्या NPS खात्यात जमा असलेली रक्कम पाहण्यासाठी, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी किंवा पेन्शन संबंधित इतर कामांसाठी हा क्रमांक अनिवार्य असतो.
- कार्ड स्वरूप: खाते उघडल्यानंतर तुम्हाला पीएफआरडीए (PFRDA) कडून एक प्रत्यक्ष (Physical) कार्ड मिळते, ज्यावर तुमचा फोटो, नाव आणि PRAN क्रमांक असतो.
- नोंदणीनंतरची प्रक्रिया: तुम्ही जेव्हा अधिकृत NPS पोर्टलवर नोंदणी आणि KYC पूर्ण करून पहिली रक्कम जमा करता, त्यानंतर हा क्रमांक जनरेट होतो.