“State Bank of India FD SCHEME” ही योजना मोठी रक्कम गुंतवायची आहे त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. यामध्ये थोडासा बद्दल आहे या योजनेमध्ये नियमित FD पेक्षा जास्त व्याज मिळते. लक्षात द्या ही FD ‘Non-Callable’ असते म्हणजे यात मुदतीपूर्वी पैसे तुम्हाला काढता येत नाहीत. सूविधा कर्जासाठी पण असणार आहे, तुम्ही तुमच्या FD वरती गरज पडल्यास ९०% पर्यंत कर्ज काडू शकता. आणि State Bank of India FD Scheme यामध्ये ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हर FD मध्ये गुंतवणूक केली असेल तर ‘कलम 80C’ अंतर्गत दीड लाखांपर्यंत कर सवलत मिळू शकते. तुमच्याकडे चांगला उपाय आहे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर ५ वर्षांपेक्ष जास्त कालावधीची FD करणे तुम्हाला जास्त फायद्याचे ठरू शकते, असे कशावरून, कारण सध्या त्यावर ७.०५% पर्यंत व्याज मिळत आहे.
मिळणारे फायदे
“State Bank of India FD Scheme ” या योजनेमुळे होणारे फायदे:
- देशातील सार्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजे SBI बँक यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षितच असणार.
- महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जो व्याजदार सांगितला जातो तो मुदत संपेपर्यंत तसाच राहतो, आणि यामुळे शेअर बाजारातील चढ- उतारांचा FD वर कुठल्याही प्रकारचा परिणाम घेत नाही.
- ज्येष्ठ नागरिकांना ‘SBI WeCare’ योजने अंतर्गत ५ वर्षावरील ठेवींवर अतिरिक्त व्याज मिळतो.
- आता तुम्ही काही क्षणातच नवीन FD उघडू आणि बंद करू शकता, एवढेच नव्हे तर कर्ज ही काडू शकता SBI च्या ‘YONO App’ द्वारे
- मुदत संपल्यनंतरही तुम्ही बॅकेत जाऊ शकला नाही तरीही तुमचे पैसे सुरक्षित राहतील कारण तुमची FD त्या कालावधीसाठी आपोआपच नुनीकरण केली जाते जेणेकरून तुमच्या व्याजाचे नुकसान होत नाही.
- मुदतीपूर्व पैसे काढता येऊ शकतात परंतु दंड भरू तुम्ही पैसे काढू शकता.
पात्रता काय असणार?
वैयक्तिक पात्रता : जर तुम्ही भारतीय नागरीक असताल स्वतःचे खाते उघाडू शकता यात अडचण येणार नाही.
जर तुम्हाला दोन खाते किंवा यावूनही अधीक खाते म्हणजेच संयुक्त खाते अनेक व्यक्ती मिळून, उघडायचे असेल ते तुम्हाला उघडता येऊ शकतात.
अगदी वयाच्या १० व्या वर्षापासून खाते उघडता येते.
जर तुमच्या मुलाचे वय १० वर्षांहूनही अधिक असेल तर तुमच्या देखरेखीखाली तुमच्या मुलाच्या नावाने खाते उघडू शकता.
तुमच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती HUF च्या नावाने गुंतवणूक करू शकतो.
संस्थात्मक पात्रता : भार्गादारी संस्था (Partenership Firms) या state Bank of India FD Scheme मध्ये गुंतवणूक करू शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांनाही या FD मध्ये गुंतवणुक करण्याची परवानगी आहे.
आवश्यक कागदपत्रे
खालीलपैकी कोणतेही एक असणे गरजेचे आहे:
- आधार कार्ड (सर्वात महत्त्वाचे)
- पॅन कार्ड (मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी अनिवार्य)
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन्स
जर तुम्याकडे वरील कागदपत्रामध्ये सध्याचा पत्ता नसेल तर तुम्ही खालीलपैकी एक पुरावा द्यावा लागतो::
- वीज बिल (नजीकच्या ३ महिन्यांतील)
- टेलिफोन बिल (लँडलाईन)
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
इतर आवश्यक गोष्टी
- फोटो: अलीकडील पासपोर्ट आकाराचे २ रंगीत फोटो.
- बँक खाते तपशील: जर तुमचे SBI मध्ये आधीच बचत खाते असेल, तर फक्त एक अर्ज भरून किंवा YONO App द्वारे कोणत्याही नवीन कागदपत्राशिवाय FD उघडता येते.
- वारसदार (Nominee) माहिती: वारसदार म्हणून ज्याचे नाव लावायचे आहे, त्यांचे नाव आणि पत्ता.
State Bank of India FD Scheme खाते कसे उघडावे?
State Bank of India FD चे खाते दोन पद्धतीने घडता येतात ऑनलाईन आणि ऑफलाइन.
ऑनलाइन पद्धत (SBI YONO ॲपद्वारे)
- YONO App मध्ये लॉगिन करा
- Deposits असा पर्याय दिसेल मुख्य स्क्रीनवर त्या पर्यायावर क्लिक करा.
- Fixed Deposit निवडा आणि खाली असलेल्या ‘Open Fixed Deposit’ वर क्लिक करा.
- तुम्हाला गुंतवायची रक्कम (किमान १,००० रुपये) टाका.
- त्यानंतर कालावधी (tenure) निवडा ( उदा. १ वर्ष – ५ वर्षे)
- व्याज कधी हवे आहे? (मासिक, त्रैमासिक किंवा मुदत संपल्यावर) तो पर्याय निवडा
- तुम्ही नवीन नाव जोडर किंवा तुमचा वारसदार (Nominee) निवडा
- नियम व अटी मान्य करून ‘Confirm’ करा. अशा प्रकारे तुमचे खाते उघडे होईल.
ऑफलाइन पद्धत (बँकेच्या शाखेत जाऊन)
- तुमच्या जवळच्या SBI शाखेत जा.
- तेथील अधिकाऱ्याकडून ‘FD Application Form’ मागा
- अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी भरा.
- अर्जासोबत तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स जोडा
- दोन पासपोर्ट साईज फोटो जोडा
- गुंतवणुकीसाठी तुम्ही रोख रक्कम (ठराविक मर्यादेपर्यंत) देऊ शकता किंवा तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चेक देऊ शकता.
- अर्ज जमा केल्यानंतर बँक तुम्हाला एक ‘FD Receipt’ (पावती) देईल, ती जपून ठेवा.
महत्त्वाची टीप:
पॅन कार्ड देणे कधी महत्त्वाचे आहे? जर तुमची गुंतवणूक 50,000 पेक्षा जास्त असेल. जर पॅन कार्ड नसेल तर बँक व्याजावर जास्त दराने (20 %) टॅक्स कापू शकते.
तुम्हाला व्याजावर टॅक्स वाचवायचा असेल, आणि तुमचे वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा (Taxable Limit) कमी असेल, तर तुम्हाला प्रत्येक वर्षी सामन्य नागरिकांसाठी Form 15G किंवा ज्येष्ट नागरिकांसाठी 15 H भरू देणे अनिवार्य आहे.
Disclaimer:
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा खाते उघडणे या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे खाते उघडण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.