PM Internship Scheme 2026 – विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त संधी (Apply Now)

PM Internship Scheme 2026 प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे तरुणांची चिंता थोडी कमी होणार आहे, कारण केंद्र सरकारनी अशा तरुणांसाठी योजना निवडली आहे जे बेरोजगार तरुण म्हणजेच सुशिक्षित आहेत परंतू काही काम नाही, पैसे कमवण्याचा कोणताही मार्ग नाही अशा तरुणांना आता मिळणार आहे इंटर्नशिप या इंटर्नशिपचा जे लाभ घेतील त्यांना कामाचा अनुभव+ मिळणार पैसे. ( फक्त बेरोजगारच नाही तर सर्व 18- 30 वयोगटातील तरुणांनासाठी ही योजना लागू होते). PM Internship Scheme 2026 या योजने अंतर्गत जे इंटर्नशिप यशस्वी झाल्यानंतर भारत सरकार आणि संबंधित कंपनीचे अधिकृत प्रमाणपत्र मिळते याचा वापर भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी मोठा फायदा होतो. तुम्ही आत्ताच अर्ज करा व कामाचा अनुभव + पैसे कमवण्याची संधी गमावू नका.

मिळणारे फायदे

१. आर्थिक फायदे :

  • तुम्हाला दरमहा एकूण ९,००० रुपये मासिक विद्यावेतन (Monthly Stipend ) देते. यातले ८,१०० रुपये तुमच्या बँक खात्यात DBT व्दारे केंद्र साकार देते. आणि ९०० रुपये तुम्ही जिथे इंटर्नशिप करता ( संबंधित कंपनी ) त्यांच्या CSR फंडातून देते.
  • इंटर्नशिप सुरू झाल्यानंतर सरकारकडून एकदाच आकस्मिक खर्चासाठी तुम्हाला ६,००० रुपये दिले जातात.

२. व्यावसायिक फायदे :

  • तुम्हांला थेट टाटा, रिलायन्स, एचडीएफसी बँक अशा ठिकाणी कामाचा अनुभव घेण्यात येतो. आणि एवढेच नव्हे तर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट कार्यपद्धती शिकायला मिळाले.
  • इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळते आणि भाविष्यात नोकरी साठी रिझ्युमे ( Resume) ची किंमत वाढवते व नोकरी मळण्यास मदत करते.

मुख्य उद्देश काय?

  • देशातील बेरोजगारी कमी करणे
  • PM Internship Scheme 2026 ही योजना फ्रेशर्सना भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी साधून आणते
  • तरुणांना नवीन तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, व्यावसायिक शिष्टाचार (Professional Ethics) शिकायला मिळतात.
  • तरुणांना भविष्यातील रोजगारासाठी सक्षम करणे.
  • ग्रामीण भागातील तरुणांना टाटा, रिलायन्स, एचडीएफसी यांसारख्या मोठ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते.

पात्रता

  • अर्जदार १८ ते २५ वयोगटातील असावा.
  • १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असावी.
  • ITI किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक.
  • कोणतीही पदवीधर (Graduate) B.A., B.Sc., B.Com., B.E., B.Tech., B.Pharma इत्यादी.
  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदार कोणत्याही नोकरीत पूर्णवेळ नसावा (लक्षात ठेवा) .

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड ( मोबाईनंबर आधारशी लिंक असवा )
  • पॅन कार्ड
  • 10 वी आणि 12 वी ची मार्कशीट / प्रमाणपत्र
  • पदवी किंवा डिप्लोमाचे मार्कशीट/प्रमाणपत्र (तुम्ही उत्तीर्ण असलेल्या शेवटच्या परीक्षेचे प्रमाणपत्र)
  • कॉलेज सोडल्याचा दाखला (LC)
  • बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रिझ्युमे (Resume/CV) (पोर्टलवर माहिती भरल्यावर तो आपोआप तयार होतो).

अर्ज कोण करू शकत नाही?

  • वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही.
  • तुमच्या कुटुंबातील सदस्य (आई/वडील/जोडीदार) सरकारी नोकरीत असेल तर अर्ज करू शकत नाही.
  • IIT, IIM, IISER मधून शिक्षण घेतलेले किंवा Master’s (MA, MSc, MBA, PhD), CA, CS किंवा MBBS केलेली मुले या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • तुम्ही यापूर्वी केंद्र सरकारची कोणतीही मोठी स्किल ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप योजना पूर्ण केली असेल तर अर्ज करू शकत नाही

अर्ज कसा करावा?

१. अधिकृत पोर्टलला भेट द्या :

  • सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा: pminternship.mca.gov.in

२. नोंदणी ( Registration )

  • नोंदणी ( Registration )
  • वेबसाइटवर ‘Register’ या बटणावर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर टाका जो तुमच्या आधार कार्डाशी लिंक आहे.
  • तुमच्या नंबरवर एक OTP येईल, तो टाकून पडताळणी (Verify) करा

३. प्रोफाईल तयार करा (Profile Creation)

  • वैयक्तिक तपशील: नाव, पत्ता, जन्म तारीख इ.
  • ​आधार ई-केवायसी (E-KYC): तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय करा.
  • ​शैक्षणिक माहिती: १०वी, १२वी, पदवी किंवा डिप्लोमाचे मार्कशीट आणि इतर तपशील अपलोड करा.
  • तुम्हाला कोणती कामे येतात (उदा. टायपिंग, कोडिंग, मार्केटिंग इ.) ते नमूद करा. या माहितीवरून तुमचा एक डिजिटल रिझ्युमे (Resume) आपोआप तयार होईल.

महत्त्वाच्या टिप्स:

PM Internship Scheme 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची शुल्क (Fees) नाही, ही प्रक्रिया मोफत आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेलीच द्या तरच तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील.

सूचना (Disclaimer)


या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.