“CowShed Subsidy Scheme 2026 म्हणजेच गाय-गोठा अनुदान योजना २०२६” ही योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाव्दारे राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची चिंता जनावरांनसाठी थोड्या प्रमाणात आता दूर होणार. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि जनावरांना सुखाची सावली म्हणजेच पक्के गोठे उपलब्ध करून देणे असा उद्देश आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील रहिवासी घेऊ शकतो. या योजनेसाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आणि कमीत कमी 2 जनावरे असणे अनिवार्य आहे. या अनुदान द्वारे बांधण्यात येणारा गोठा हा पक्का गोठा सिमेंटचा असणार आहे. हा गोठा बांधताना शेतकऱ्यांने लक्षात ठेवावे जनावरांना चारा खाण्यासाठी गव्हाण, मूत्र साठवण्यासाठी टाकी, पाण्यासाठी हौद अशा सोयी असल्या, तरच अनुदानाची रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होते.
मुख्य उद्देश काय?
- पूर्वी कच्चे गोठे असल्याने चिखल व्हायचा त्यामुळे आणि अस्वच्छता असल्याने जनावरांना आजार होयचे, पक्का गोठा असल्याने पावसापासून व आजारापासून जानवरांची सूटका होते व आरोग्य स्वस्थ राहते.
- जनावरांचे आरोग्य चांगले राहते स्वच्छ पर्यावरणात राहतात यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्या दूधात वाढ होते आणि याचा फायदा शेतकऱ्यास होतो.
- CowShed Subsidy Scheme 2026 या योजनेमुळे स्वच्छता आणि खत व्यवस्थापन टिकून राहते कसे? कारण, गोठ्यामध्ये पक्की जागा आहे शेण गोळा करण्यासाठी आणि मूत्र साठवण्यासाठी टाकी, जर तुम्ही मूत्र आणि शेण एकत्र केले तर शेतात वापरण्यायोग्य शेण खत तयार होतो.
- शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्टया सक्षम होतात दुग्ध व्यावसाय वाढतो जेणेकरून शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढते.
पात्रता काय असणार?
- अर्जदार महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावा.
- ही योजना ग्रामपंचायतीमार्फत राबवली जाते म्हणून अर्जदार ग्रामीण भागातील असावा.
- किमान २ जानवरे स्वतःच्या मालकीची असणे अनिवार्य आहे.
- आर्जदारकडे स्वतःच्या नावावर गोठा बांधण्यासाठी पुरेशी जमीन असणे अनिवार्य आहे.
- जागा ७/१२ उताऱ्यावर नोंदणीकृत असावी.
- अर्जदाराकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (MGNREGA) वैध जॉब कार्ड असावे.
- कुठल्याही प्रकारे अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान घेतलेले नसावे.
- अर्जदाराकडे आधीच सिमेंटचा गोठा नसावा.
- अगोदर संधी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना मिळते.
- शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती असलेल्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाते.
म्हत्त्वाची अट: Cow Shed Subsidy Scheme 2026 या योजनेमध्ये प्रत्येकी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो एक जॉब कार्ड असेल तर एक गोठा दिला जातो. जर तुमच्या जनावराला कानात बिल्ला असेल तर पारता सिद्ध करणे सोपे जात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड: अर्जासोबत आधार कार्डची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे.
- मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स ( अनुदान खात्यात जमा होण्यासाठी)
- ७/१२ उतारा (जमिनीचा अद्ययावत उतारा)
- ८-अ उतारा (तुमच्या नावावर असलेल्या एकूण जमिनीचा दाखला)
- जर जमीन कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर असेल, तर त्यांचे ‘संमती पत्र’ किंवा ना हरकत प्रमाणपत्र (NOC).
- तुमच्याकडे किमान २ जनावरे (गाय किंवा म्हैस) असल्याचा पशुधन विकास अधिकाऱ्याचा (Doctor) दाखला.
- जनावरांच्या कानात लावलेल्या बिल्ल्याचा (Tag) नंबर अर्जात नमूद करावा लागतो. (असेल तर)
- मनरेगा जॉब कार्ड (नसेल तर ग्रामपंचायतीत अर्ज करून ते मिळवता येते).
CowShed Subsidy Scheme 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे ग्रामसेवकाकडे किंवा रोजगार सेवकाकडे जमा करा. CowShed Subsidy Scheme 2026 या योजनेचे time to time updates पाहण्यासाठी http://MahaDBT Portal हे Website वापरावी
अर्ज कसा भरावा?
१. अर्जाचा सुरुवातीचा भाग
- प्रति: हा अर्ज ‘मा. सरपंच / ग्रामसेवक, ग्रामपंचायत [तुमच्या गावाचे नाव]’ यांना उद्देशून असतो.
- अर्जदाराचे नाव: तुमचे पूर्ण नाव (आधार कार्डवर आहे तसे) स्पष्ट अक्षरात लिहा.
- पत्ता: तुमचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर टाका.
२. तांत्रिक माहिती (सर्वात महत्त्वाचा भाग)
- जनावरांची संख्या लिहा. (उदा. ३ गायी, २ म्हशी).
- गोठा ज्या जागेवर बांधायचा आहे, त्या जमिनीचा ७/१२ गट नंबर किंवा घराचा नमुना ८ (ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक) अचूक लिहा.
- जॉब कार्डचा १२ अंकी नंबर तिथे लिहावा लागतो.
३. काय लाभ हवा आहे? (पर्याय निवडा)
- अनेक पर्याय असू शकतात जसे, शेळी पालन, कुक्कुटपालन, गायगोठा गाययगोठा हा पर्याय निवडा.
४. जोडावयाची कागदपत्रे (चेकलिस्ट)
- ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारा.
- आधार कार्डची झेरॉक्स.
- बँक पासबुकची झेरॉक्स (पैसे जमा होण्यासाठी).
- पशुवैद्यकीय डॉक्टरांचा दाखला (जनावरे असल्याचा पुरावा).
- शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र (अर्जासोबत जो नमुना मिळेल त्यावर स्वाक्षरी करा).
सूचना (Disclaimer)
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
*येथे तुम्ही PM Internship Scheme 2026 (प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना) याबद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता = http://येथे तुम्ही PM Internship Scheme 2026 (प्रधानमंत्री इंटर्नशिप https://totalyojana.com/pm-internship-scheme-2026/