PM Awas Yojana Urban 2026 (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी) ही योजना भारत सरकारने सर्वांच्या हितासाठी, गरीब, बेघर अशा कुटुंबासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. २५ जून २०१५ रोजी भारत सरकारने या मोहिनीची सुरुवात केली. भारतातील वाढत्या शहरीकरणामुळे शरणकडे स्थलांतर होणाऱ्या गरीब बेघर आणि झोपड्यांमध्ये राहणारे कुटुंबाची संख्या वाढत आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना-शहरी या योजनेची सुरुवात केली. सर्वांसाठी घरे असावीत, सर्वांना सन्मानाने जगता यावे, सर्व कुटुंबी आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहावी या योजने मागचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांचं स्वप्न असतं आपले स्वतःचे घर असावे ते स्वप्न आता भारत सरकार पूर्ण करणार. फक्त घरच नव्हे तर त्या घरामध्ये सर्व सुख-सुविधा म्हणजे पिण्यासाठी पाणी, शौचालय, एलपीजी गॅस कनेक्शन अशा प्रकारचे सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.
योजनेचा उद्देश :
PM Awas Yojana Urban 2026 (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी) या योजनेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना स्वतःचे पक्के घर करून देणे हा या योजनेचा प्रथम आणि महत्त्वाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक गरीब कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा हा उद्देश आहे.
- शहरांमध्ये खाजगी विकासांच्या भागीदारीतून जमिनीचा योग्य वापर करून तिथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात घर बनवून देणे.
- भारत सरकार लाभार्थ्याला बँकेच्या गृहकर्जावर व्याजात सवलत देणार आहेत जेणेकरून नागरिकांना स्वतःचे घर खरेदी करताना किंवा बांधताना आर्थिक अडचण येऊ नये हा हेतू आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घराची मालकी कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावावर असणे अनिवार्य आहे, कारण पुढे चालून महिलांना असुरक्षित वाटू नये आणि समाजात आर्थिक सुरक्षा मिळते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला चार भिंतीच घरच नाही तर त्या घरामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, 24 तास वीज पुरवठा, स्वतंत्र शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची योग्य सोय आणि पर्यावरण पूरक ग्रहण निर्माण तंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टी देण्यात येणार आहेत.
पात्रता (Eligibility)
- अर्जदाराच्या नावावर भारतात कुठेही स्वतःचे पक्के घर असावे.
- अर्जदारांनी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने यापूर्वी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही ग्रहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- घराची मालकी ही महिलेच्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावावर असेल तर प्राधान्य मिळते.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न है ३ -६ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावी
- अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST), महिला किंवा दिव्यांग व्यक्ती अशा नागरिकांना प्राधान्य दिले जाते.
- सरकारांनी या योजनेसाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अर्जदार रहिवासी असावा.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड (अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे)
- मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड
- रेशन कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे)
- अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- सॅलरी स्लिप आणि फॉर्म १६ (पगारदार व्यक्तींसाठी)
- अर्जदाराच्या स्वतःचा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार असेल तर मागील दोन ते तीन वर्षाची आयटी रिटर्न (ITR)
- बीपीएल कार्ड किंवा संबंधी प्रमाणपत्र जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर
- ज्या जाग्यावर घर बांधायचे आहे त्या जागेचा ७/१२ उतारा किंवा मालमत्ता पत्रक
- खरेदीखत किंवा हक्क सोडपत्र
- घराचा नकाशा (Approved Building Plan) आणि अंदाजित खर्चाचे पत्रक
- बँक खात्याचे पासबुक (आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक )
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- स्वयंघोषणा पत्र (Affidavit / Self-Declaration)
PM Awas Yojana Urban 2026 (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी) या योजनेसाठी वरील सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तरस या योजनेचा अर्ज भरू शकता.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
PM Awas Yojana Urban 2026 (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी) या योजनेचा अर्ज हा दोन प्रकारे भरला जातो ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑनलाइन आणि ऑफलाइन भरण्याची अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे दिली आहे:
1.ऑनलाईन पद्धत
- सर्वात अगोदर या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या : pmaymis.gov.in
- मुख्य पेजवर असलेल्या ‘Citizen Assessment’ हा क्लिक करा व उघडा. यानंतर तिथे तुमचा योग्य घटक निवडा उदा. स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी किंवा गृहकर्जासाठी.
- तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाका त्यानंतर ‘check’ हे बटन दाबा
- नंतर फॉर्म येईल त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, सध्याच्या घराचा प्रकार, वार्षिक उत्पन्न आणि बँक खात्याचे तपशील सर्व माहिती अचूकपणे भरा
- आवश्यक की कागदपत्रे योग्य पद्धतीने स्कॅन करून अपलोड करा सांगितलेल्या साईज मध्ये
- कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर परत सर्व माहिती अचूक आहे का तपासा सबमिट बटनवर क्लिक करा
- यानंतर स्क्रीनवर Application ID दिसून येईल त्याची प्रिंट काढून ठेवा
2.ऑफलाईन पद्धत
- तुमच्या भागातील नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा नागरी विकास यंत्रणा या कार्यालयात भेट द्या.
- गृहनिर्माण विभाग किंवा PMAY कक्ष इथून योजनेचा अर्ज मोफत मिळवा
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
- त्या फॉर्म सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडा (कागदपत्रांवर सर्व माहिती व्यवस्थित दिसावी).
- भरलेला फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे त्याच कार्यालयात जमा करा सर्वात महत्त्वाचे अर्ज जमा केल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली पोचपावती जपून ठेवा.
मिळणारे अनुदान
PM Awas Yojana Urban 2026 (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी) या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून मिळणारे अनुदान खालीलप्रमाणे आहे:
- या योजनेअंतर्गत आर्थिक मदत हे २.५० लाख म्हणजेच २ लाख ५० हजर इतके मिळते
- केंद्र सरकारचा वाटा हा १.५० लाख इतका असतो
- राज्य सरकारचा वाटा १ लाख असतो ( हा वाटा प्रत्येक राज्यानुसार बदलू शकतो महाराष्ट्रात साधारणता १ लाख एवढा आहे)
- हे अनुदान लाभार्थ्याला एकदाच मिळत नाही तर बांधकामाच्या टप्प्यानुसार डायरेक्ट बँक खात्यात जमा केले जाते.
- केंद्र सरकारकडून १.५० लाख आणि राज्य सरकारकडून १ लाख असे सर्व अनुदान मिळून २.५० लाखापर्यंत मिळते यामुळे घराची किंमत कमी होते लाभार्थ्याला ते फायदेशीर ठरते.
- सबसिडी ६.५% एवढी मिळते यामध्ये २.६७ लाख रुपयांची सूट तुमच्या कर्जाच्या मुदलातून वजा होते ज्यामुळे मानसिक हप्ता कमी होतो.
सूचना (Disclaimer)
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Awas Yojana Urban 2026 (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2026” ची पूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-awas-yojana-gramin-2026/