Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) Best For Students

Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) ही योजना महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सुटू नये अशा गोष्टी लक्षात घेऊन या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा लाभ विद्यार्थी शालेय स्तरावरील प्रथम शिक्षणापासून ते उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि परदेशातील उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेमधून विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती हे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला आर्थिक बळ मिळते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैशांची गरज भासणार नाही आणि ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकते.

योजनेचा उद्देश :

Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) या योजनेचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी. या योजनेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • काही विद्यार्थ्यांना आपली आर्थिक परिस्थिती बघून त्यांचे शिक्षण त्यांना मध्येच सोडावे लागते त्यांचे स्वप्न तिथेच तुटतात अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे शिक्षण संपूर्ण व्हावे असा या योजनेचा उद्देश आहे.
  • मुलांच्या शिक्षणामुळे पालकांचा आर्थिक स्थान कमी करणे कारण या योजनेच्या शिष्यवृत्ती मधून विद्यार्थ्यांचे उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची शुल्क भरली जाऊ शकते.
  • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग मी मुक्त जाती व भटक्या जमाती या सर्व विद्यार्थ्यांना समाजाबरोबर प्रगतीची संधी देणे.
  • खुल्ला प्रवर्गातील (मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, जैन, पारशी) कुटुंब आर्थिकदृष्ट्या मागे आहेत अशा घटकांतील विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी आर्थिक मदत मिळवून देणे.
  • शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जास्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांना आपल्या देशातच नव्हे तर परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासनाचा मुख्य हेतू आहे.
  • या योजनेद्वारे मिळणारे शिष्यवृत्ती हे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. याद्वारे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालण असा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

अर्ज कोण करू शकतो?

Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील अटी पाहून घ्या:

  • विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
  • प्रवेश हा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया याद्वारे झालेला असावा.
  • खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी: ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपर्यंत किंवा यापेक्षा कमी आहे अशी विद्यार्थी “राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती” या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • अनुसूचित जाती (SC): विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखांपर्यंत असेल तर १००% मी सवलत आणि भत्ता मिळतो. आणि जर उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त असेल तर “फ्रिशिप” मिळते.
  • अनुसूचित जमाती (ST): विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापर्यंत असेल तर विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती साठी पात्र ठरू शकतो.
  • ​इतर मागासवर्ग (OBC), व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC): विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.५ लाखापर्यंत असेल तर पूर्ण शिष्यवृत्ती मिळते. आणि उत्पन्न हे १.५ लाख ते ₹८ लाखांच्या मध्ये असेल तर फ्रिशिप मिळते.

आवश्यक कागदपत्रे (Requried Documents)

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ( आधार कार्ड के मोबाईल नंबर ची लिंक असणे अनिवार्य आहे )
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate) (विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • शैक्षणिक गुणपत्रिका (Marksheets)
  • शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  • कॉलेजमध्ये फी भरण्याची पावती
  • कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate)
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड (कुटुंबातील अपत्यांची संख्या तपासण्यासाठी)
  • SC, ST, OBC, VJNT, SBC : जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate),
  • ब. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EBC / Open Category) : स्वयंघोषणा प्रमाणपत्र,
  • वसतिगृह प्रमाणपत्र (Hostel Certificate)

Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने असते. या योजनेचा विद्यार्थीही भरू शकतो. अर्ज कसा भरावा खालील प्रमाणे दिले आहे:

  • सर्वात अगोदर या संकेतस्थळावर भेट द्या mahadbt.maharashtra.gov.in
  • मुख्य पानावर New Applicant Registration या बटन वर क्लिक करा
  • नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, युजरनेम, पासवर्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका
  • तुमच्या मोबाईलवरती ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन करा.
  • नोंदणी झाल्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • लॉगिन केल्यानंतर सर्वात अगोदर ‘Aadhar Bank Link Status’ किंवा आधार क्रमांक करायला सांगितले जाईल.
  • तुमचा आधार नंबर टाकून मोबाईल वरती OTP द्वारे ते प्रमाणित करा ( आधार नंबर ची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी येईल)
  • आता तुमची प्रोफाइल तयार करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरा ( नाव, जन्मतारीख, पत्ता, जात आणि वार्षिक उत्पन्न)
  • तुमचा कायमचा आणि सध्याचा पत्ता टाका
  • पालकांचा व्यवसाय काय आहे आणि नोकरीची माहिती भरा
  • १० वी, १२ वी किंवा मागील वर्षाचे गुण विद्यापीठांचे नाव आणि उत्तीर्ण झालेले वर्ष टाका
  • चालू कॉलेज मधील तुम्ही ज्या कोर्सला प्रवेश घेतला आहे त्याची संपूर्ण माहिती भरा
  • वसतिगृह तपशील (Hostel Details) माहिती भरा
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर डाव्या बाजूला ‘All Schemes’ हा पर्याय निवडून
  • तुमच्या प्रवर्गाशी संबंधित विभाग निवडा
  • तुम्हाला लागू होणाऱ्या योजनेची निवड करा
  • योजनेची माहिती समोर आल्यानंतर ‘Apply’ बटन दाबा
  • तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची पूच पावती जतन करून ठेवा.
  • सर्वात महत्त्वाचे अर्ज भरल्यानंतर सर्व कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र कॉलेजमध्ये जमा करा जमा केल्यानंतरच शिष्यवृत्ती तुमच्या खातात जमा होते.

सूचना (Disclaimer)

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Maharashtra Scholarship Scheme 2026 (महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2026 त्याची पूर्ण माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/pm-awas-yojana-urban-2026/