PM Vishwakarma Yojana 2026 (पीएम विश्वकर्मा योजना) ही योजना केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०२३ रोजी पारंपारिक कारागिरांना त्यांच्या कौशल्याला जागतिक ओळख मिळवी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सध्याच्या काळात बदलत्या युगानूसार आधुनिक तंत्रज्ञान, भांडवलाची कमतरता आणि योग्य बाजारपेठ भेटणे कठीण झाले आहे यामूळे हा वर्ग प्रवाघपासून थोडासा मागे पडत जात आहे.
भारत देशामध्ये संस्कृतीमध्ये पारंपारिक कारागीर तसेच शिल्पकारांचे योगदान भूतकाळात अत्यंत महत्त्वाचे राहिले गेले आहे. सूतार, लोहार, कुंभार, शिंपी, गवंडी यांसारखे कलाकार आपल्या हाताची कला दाखवत ग्रामीण आणि शहरी भागातील गरजा पूर्ण करतात. या योजने अंतर्गत कारागिरांना समाजात आणि बाजारात नवीन प्रतिष्ठा मिळू शकते. या योजनेअंतर्गत या कारागिरांना फक्त आर्थिक मदत मिळवून देणे इतकेच नाही तर, भाराताचा पारंपरिक वारसा जिंवत ठेवणे, आणि त्यांच्या कौशल्याला मान देणे हा हेतू आहे.
योजनेचा उद्देश
PM Vishwakarma Yojana 2026 (पीएम विश्वकर्मा योजना) या योजनेचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची मोठं प्रमाणात गरज आहे, यामुळे कारागीरांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन साधनाचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या कामाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणे.
- अनेक कारागीर आपल्या गरीब परिस्थितीमुळे त्यांचे कामाचे व्यवसाय वाढवू शकत नाहीत किंवा त्यांना महागडे कर्ज घ्यावे लागते या समस्येचा निवारा म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला अतिशय कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक मदत पोहोचवणे हा उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत ला भारताला विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन त्यांना अधिकृत ओळख मिळवून देणे यामुळे त्यांना समाजात सन्मान मिळतो.
- कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंनाविकण्यासाठी स्थानिक आणि बाजारपेठ हवी असते ते उपलब्ध करून देणे. बाजारपेठ उपलब्ध करून देण्याने त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत करून देणे.
- कारागिरांना डिजिटल व्यवहाराशी जोडणे, जेणेकरून व्यवसाय त्यांचा व्यवसाय आधुनिक काळाशी जोडला जाईल यासाठी सरकाराकडून डिजिटल दमन घेवानी वर इन्सेंटिव्ह देखील देण्यात येणार आहे.
पात्रता (Eligibility)
- अर्जदार हा सरकार आणि निश्चित केलेल्या 18 पारंपारिक क्षेत्रांपैकी निदान एका व्यवसायामध्ये प्रत्यक्ष कार्यरत असावा. उदा. सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, गवंडी, न्हावी, धोबी इ.
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेण्यात येतो.
- अर्जदार व्यक्ती असंघटित क्षेत्रातील स्वररोजगार करणारा असावा.
- अर्ज करणारा व्यक्ती किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती कोणतीही सरकारी नोकरी करत नसावेत.
- अर्जदाराने या अगोदर गेला पाच वर्षे केंद्रीय किंवा राज्य सरकाराच्या कोणतेही व्यावसायिक कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- PM Vishwakarma Yojana 2026 (पीएम विश्वकर्मा योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील अटी व नियम पूर्ण सावित किंवा मान्य असावेत.
आवश्यक कागदपत्रे (Requried Documents)
PM Vishwakarma Yojana 2026 (पीएम विश्वकर्मा योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खलील कागदपत्रे असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्रे काढून घ्या.
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्ड ची लिंक आहे
- बँक पासबुक (या योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते)
- रेशन कार्ड
- अर्जदाराची पासपोर्ट साईज फोटो (अर्ज फॉर्म मध्ये लावण्यासाठी)
- तुम्ही करत असलेल्या 18 व्यवसायांपैकी एक व्यवसायाची माहिती देणे आवश्यक आहे.
या योजनेचे 18 व्यवसाय कोणते?
- सुतार (Carpenter)
- लोहार (Blacksmith)
- अस्त्र बनवणारे (Armourer)
- हातोडा आणि टूलकिट निर्माता (Hammer and Tool Kit Maker)
- गवंडी (Mason)
- नाव बनवणारे (Boat Maker)
- कुंभार (Potter)
- सोनार (Goldsmith)
- मूर्तिकार/शिल्पकार (Sculptor/Stone Breaker)
- चांभार/शूमेकर (Cobbler/Shoe-smith)
- झाडू/चटई/टोपली विणणारे (Basket/Mat/Broom Maker/Coir Weaver)
- गुळ्या आणि खेळणी बनवणारे (Doll & Toy Maker)
- शिंपी (Tailor)
- न्हावी (Barber)
- धोबी (Washerman)
- माळी/हार बनवणारे (Garland Maker)
- कुलूप बनवणारे (Locksmith)
- मासेमारीचे जाळे विणणारे (Fishing Net Maker)
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
PM Vishwakarma Yojana 2026 (पीएम विश्वकर्मा योजना) या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज कसा करावा आणि कुठे करावयाची संपूर्ण माहिती खाली प्रमाणे दिली आहे:
१. अर्जी कुठे करावा?
- आपले सरकार सेवा केंद्र आणि महा ई सेवा केंद्रया दोन्हींपैकी कोणतेही एक स्थळावर जावे लागेल.
- अर्जदारा सोबत आधार कार्ड, लिंक असलेला मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि बँक पासबुक असणे अनिवार्य आहे.
- CSC चालक पीएम विश्वकर्मा पोर्टलवर Login करेल आणि तुमची माहिती भरून तुमच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल.
- 18 व्यवसाय पैकी कोणत्याही एक तुम्ही करत असलेल्या व्यवसायाची निवड करून फॉर्मवर सबमिट केली जाईल, या नंतर तुम्हाली अर्ज क्रमांक (Application Number) मिळेल.
२. अर्ज मंजुरीचे ३ टप्पे
- तुम्ही तो व्यवसाय खरच करत आहेत का याची खात्री ग्रामीण भागातील ग्रामसेवक किंवा सरपंच आणि शहरी भागातील नगरपालिका किंवा महानगरपालिका याची खात्री करतात आणि अर्ज पुढे पाठवतो.
- तुमच्या हाताची तपासणी हे जिल्हा पातळीवरील कमिटी करते.
- तुमचे नावे योजनेच्या मुख्य यादी मध्ये समाविष्ट होते जे अंतिम मजुरी मुख्य समिती द्वारा दिली जाते.
या योजनेचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही ही लिंक पाहू शकता pmvishwakarma.gov.in
महत्त्वाची सूचना
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Vishwakarma Yojana 2026 (विश्वकर्मा योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
थे तुम्ही “महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/maharashtra-scholarship-scheme-2026/