PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) Best मार्गदर्शक

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. शी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली होती. या योजनेसाठी लाभार्थ्याला सरकार ७५,००० कोटीं अंजाम जास्त निधी खर्च करत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येकाच्या घरोघर सौर ऊर्जा पॅनल बसून, दरमहा त्यांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवून देणे हा आहे. या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबाचा बिजेसाठी होणारा खर्च शून्य करून देणे.

सर्वसामान्य नागरिकांना विजेचे बिल महागडे वाटते त्यामुळे ते विजेचा पुरेपूर वापर न करता काही कामे करतात तर काही कामे राहून जातात अशा नागरिकांना वीज बिलातून दिलासा दिलासा देण्याचे काम ही योजना करत आहे. सर्व नागरिकांचा विचार करून सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या मागचा उद्देश म्हणजे १ कोटी कुटुंबाच्या करांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवणे.

योजनेचे उद्देश

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे की घरोघर सौर ऊर्जा पॅनल बसवून नागरिकांना विजयच्या महागड्या बिलापासून वाचवणे. या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहेत:

  • या योजनेमुळे नागरिकांचा मानसिक खर्च वाचतो सौर ऊर्जा पॅनल बसवल्याने खर्चाची मोठी बचत होते. यामुळे नागरिकांना या योजनेसाठी प्रवृत्त करणे.
  • या योजनेअंतर्गत नागरिकांना आत्मनिर्भर बनवणे म्हणजेच प्रत्येक घराला लागणारी स्वतःची वीज स्वतः निर्माण करण्यास सक्षम करणे. पारंपारिक ऊर्जा ही कोळसा आणि गॅस यांच्या वरून वीज निर्मितीची निर्भरता कमी करणे हा एक प्रमुख उद्देश आहे.
  • संपूर्ण भारत देशातील १ कोटी घरांवर ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर सिस्टीम बसवून या सौर ऊर्जेचा वापर प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • सौर ऊर्जेचा वापर केल्याने हवामानात मोठा बदल होऊ शकतो. कारण सौर ऊर्जा हा एक स्वच्छ स्त्रोत आहे, सौर ऊर्जेचा वापर केल्याने हरित ऊर्जेचे उत्पादन वाढते आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते.
  • या योजनेद्वारे नागरीक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार करू शकतात आणि नेट मीटररिग द्वारे सरकार वीज वितरण कंपन्यांना विकून जास्त उत्पादन मिळवण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकते.
  • मेक इन इंडिया या मोहिमेवर आणखी भर देणे हा प्रमुख उद्देश आहे, कारण या योजनेमध्ये भारत सरकारनेतयार केलेला सौर ऊर्जा पॅनल (Domestic Content Requirement मान्यताप्राप्त) हे वापरणे बंधनकारक आहे. यामुळे भारतातील सौर ऊर्जा उपकरणाच्या उत्पादनाला पाठिंबा मिळतो.
  • या योजनेद्वारे सौर पॅनल चे उत्पादन आणि इंस्टॉलेशनजोडणी करण्यासाठी 1 लाख तांत्रिक रोजगार यांना काम करण्याची संधी मिळवून देणे.

मिळणारे अनुदान

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे डायरेक्ट लाभारताच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा होते. अनुदर कसे मिळते याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे:

  • सोलर पॅनल पूर्णपणे बसून झाल्यानंतर आणि महावितरण द्वारे नेट मीटर जुळवून पूर्ण झाल्यानंतर व्हेंडरद्वारे त्या पोर्टल वरती माहिती अपलोड केली जाते.
  • सरकारी अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन तपासणी पूर्ण करून झाल्यावर.
  • ही तपासणी पूर्णपणे तपासून झाल्यानंतर साधारणता ३० दिवस पूर्ण होण्याच्या आत अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जाते.

पात्रता (Eligibility)

  • अर्जदार व्यक्ती हा भारताचा रहिवासी असावा
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावावर घर असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराच्या घरामध्ये वीज वितरण कंपनीचे चालू विज कनेक्शन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विज बिल हे अर्जदाराच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असावे.
  • अर्जदारांनी किंवा अर्जदाराच्या कुटुंबाने यापूर्वी कोणत्याही सोलर सबसिडी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • सोलर पॅनल्स बसवण्यासाठी घरावर पुरेशी मोकळी जागा असणे आवश्यक आहे. साधारणता : १ kW साठी: सुमारे १०० चौ. फूट जागा.
  • ​२ kW साठी: सुमारे २०० चौ. फूट जागा.
  • ​३ kW साठी: सुमारे ३०० चौ. फूट जागा.
  • घराच्या छतावर सूर्यप्रकाश हा चांगला असावा कुठल्याही प्रकारची सावली पडणारी जागा नसावी.
  • या योजनेचा अर्ज घरातील एकच सदस्य करू शकतो.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) अर्जदाराला या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी मान्य असाव्यात.

आवश्यक कागदपत्रे (Requried Dcouments)

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील महत्त्वाची कागदपत्रे दिले गेले आहेत:

  • चालू व्हीच कनेक्शन असलेले वीज बिल (सर्वात महत्त्वाचे आणि ही बीज बिल तुमच्या किंवा घरातील सदस्याच्या नावावर असावी)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक चा पहिल्या पानाची छाया प्रत ( बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे)
  • घराचा ७/१२ उतारा किंवा घरपट्टी पावती (घर स्वतःच्या मालकीचे आहे यासाठी)
  • आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे.

  • सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या pmsuryaghar.gov.in
  • मुख्य पानावर Apply for Rooftop Solar हा पर्याय क्लिक करा
  • तुमची प्राथमिक माहिती भरा तुमचे राज्य, वीज वितरण कंपनी आणि ग्राहक क्रमांक
  • या नंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल ते टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर Login करा तुमच्या ग्राहक क्रमांकाच्या आणि OTP साह्याने लॉगिन होईल
  • तुमच्या स्क्रीनवर ‘Rooftop Solar Application Form’ असे दिसेल
  • त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, घराचा पत्ता आणि किती किलो वॅट सोलार प्लांट बसवायचे आहे ते माहिती भरा सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • सगळे झाल्यानंतर नवीन तम वीज बिल स्कॅन करून किंवा त्याचा स्पष्ट फोटो काढून अपलोड करा
  • सर्व माहिती बरोबर आहे का तपासून सबमिट करा.

सोलर पॅनल इन्स्टॉलेशन (Installation)

  • मंजुरी मिळाल्यानंतर, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एजन्सी कडूनच (Empaneled Vendor) तुम्हाला तुमची सोलर सिस्टम बसून घ्यावी लागेल.
  • पोर्टलवर तुमच्या भागातील नोंदणीकृत व्हेंडर्सची यादी उपलब्ध असते त्यापैकी एकाची निवड करून तुम्ही त्याचा करार करू शकता.
  • व्हेंडर छतावर येऊन सोलर पॅनल ची आणि इतर सर्व उपकरणांची जोडणी पूर्ण करून देईल.

नेट मीटरिंगसाठी अर्ज

  • सोलर पॅनल बसून झाल्यानंतर, व्हेंडरद्वारे पोर्टल वर कार्यपूर्तीचा अहवाल अपलोड केला जातो यानंतर तुम्हाला नेट मीटर बसवण्यासाठी अर्ज करावा लागतो
  • महावितरणचे अधिकारी जिथे तुम्ही सोलर पॅनल बसवले आहे तिथे येऊन तपासणी करतात
  • घरातील पारंपारिक मीटर काढून त्या जागी नेट मीटर बसवण्यात येतो.
  • तपासणी पार पडल्यानंतर महावितरण द्वारे पोर्टलवर ‘Commissioning Certificate’ जारी करण्यात येतो.

महत्त्वाची सूचना

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2026 (मोफत वीज आणि सोलर पॅनलसाठी योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे लखपती दीदी योजना 2026 योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/lakhpati-didi-yojana-2026/