E-Shram Card Scheme 2026 (ई-श्रम कार्ड योजना) कामगारांसाठी Best मार्गदर्शक (Apply Now)

E-Shram Card Scheme 2026 (ई-श्रम कार्ड योजना) ही योजना भारत सरकार श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. भारत देशात अर्थव्यवस्थे मध्ये आणि विकासामध्ये अरुंगठित क्षेत्रामधील कामगारांचे अत्यंत मोठे योगदान आहे. परंतू हे कामगार सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनेच्या लाभ घेऊ शकत नाही कारण योग्य माहिती पण योग्य नोंदणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे हे कामगार योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. ह्या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी या योजनेची सुरुवात केली.

योजनेअंतर्गत ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कामगाराला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असलेले ई श्रम कार्ड दिले जाते हे दिलेले कार्ड पूर्ण देशामध्ये वैध असते, याद्वारे कामगारांना त्यांची ओळख मिळते, आणि महत्त्वाचे म्हणजे भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आपत्यकालीन परिस्थितीमध्ये सरकारला तुमच्या पर्यंत डायरेक्ट आर्थिक मदत आणि इतर कोणतेही लाभ पोहोचण्यामध्ये मदत मिळते.

योजनेचे उद्देश

E-Shram Card Scheme 2026 (ई-श्रम कार्ड योजना) योजना सरकारने अनेक गोष्टी लक्षात घेऊन सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • योजनेद्वारे देशातील बांधकाम मजूर, फेरीवाले, घरगुती कामगार, शेतमजूर या सर्व असंघटित कामगारांची एकाच केंद्रीय पोर्टल नोंदणी करून त्यांचा आर्थिक माहिती संच तयार करणे.
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजना कामगारांसाठी आहेत ते या योजनेची माहिती या कार्डाच्या माध्यमातून सर्व कामगारापर्यंत पोहोचवणे.
  • भविष्यासाठी कोणत्याही प्रकारचे अपत्यकालीन परिस्थिती आल्यास राष्ट्रीय आपत्ती आल्यास कामगारांना त्यांच्या खात्यात पैसे (आर्थिक मदत) त्वरित पोहोचवणे.
  • अनेक कामगार रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात अशा कामगारांना रोजगाराची आणि कौशल्याची माहिती या कार्डद्वारे सांगणे जेणेकरून त्या भागातील रोजगारांच्या नवीन संधी त्या कामगारास मिळतील.
  • कामगारांच्या स्किल (कौशल्याचा) चा डेटा ठेवून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार स्किल इंडिया अशा उपक्रमांशी जोडून त्यांना रोजगाराच्या चांगल्या संध्या मिळवून देणे.

कोण पात्र आहे (Eligibility)

भारत देशातील कोणताही कामगार जो असंगठित क्षेत्रात काम करत आहे. खालील कामगार यामध्ये येतात.

  • शेतमजूर, लहान आणि भूमीहीन शेतकरी, पशुपालक, मच्छीमार.
  • गवंडी, वीटभट्टी कामगार, सुतार, प्लंबर, पेंटर, लोहार आणि इतर मजूर.
  • घरकाम करणारे (बाई/कामगार), स्वयंपाकी, धोबी, रखवालदार.
  • भाजी आणि फळ विक्रेते, रस्त्यावरील छोटे दुकानदार, चहावाले, टपरीचालक.
  • ऑटो/टॅक्सी चालक, ट्रक चालक, तसेच झोमॅटो, स्विगी, ओला, उबर यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करणारे डिलिव्हरी बॉईज आणि रायडर्स (Gig/Platform Workers).
  • टेलर (शिंपी), न्हावी (सलोन कामगार), मोची, विडी कामगार, हातमाग विणकर, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका.
  • अर्ज कामगाराचे वय १६ ते ५९ वर्षे यामध्ये असावे
  • वरील अटी अर्जदाराला मानवी असतील तर या E-Shram Card Scheme 2026 (ई-श्रम कार्ड योजना) योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

E-Shram Card Scheme 2026 (ई-श्रम कार्ड योजना) या योजनेसाठी खाली कागदपत्रे असणे अनिवार्य आहे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबरचं आधार कार्डाची लिंक असलेला
  • बँक खाते : सरकारा कडून मिळणारे आर्थिक मदत हे अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

ई-श्रम कार्डसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

  • सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या eshram.gov.in
  • मुख्य पानावर “Register on eShram” या पर्यायावर क्लिक करा
  • या नंतर आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
  • कॅप्चा कोड स्क्रीनवर येऊन जाईल ते असं भरा
  • मी तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यामध्ये NO निवडा आणि Send OTP’ या पर्यायावर किस करा
  • तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी सबमिट करा
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका
  • खालील पर्यायांपैकी ओटीपी हा पर्याय निवडा परत कॅप्चा भरून ‘Submit’ करा.
  • तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वरती परत ओटीपी येईल.
  • या नंतर तुमची वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक अचूक भरा
  • तुमचे शिक्षण किती झाले आहे आणि तुमचे अंदाजिक मासिक उत्पन्न लिहा.
  • तुम्ही जे काम करते ते निवडा (तिथेच लिस्ट दिलेली असते त्यामधील तुमचे काम निवडा)
  • तुमचे बँक खाते क्रमांक दोन वेळ तिथे टाका, बँक धारकाचा नाम आणि बँकेचा IFSC Code टाकून सर्च करा.
  • सर्व माहिती अचूक भरली आहे का हे तपासण्यासाठी Preview वर क्लिक करा
  • सर्व माहिती तपासून झाल्यास सबमिट वर क्लिक करा
  • यु ए एन (UAN) असा १२ अंकी नंबर दिसेल ते डाऊनलोड करा या नंतर त्यांची प्रिंट काढून ठेवा
E-Shram Card Scheme 2026 feature image
E-Shram Card Scheme 2026 अंतर्गत कामगारांसाठी आर्थिक मदत

ई-श्रम कार्डचे लाभ कोणाला मिळतात?

  • शेती आणि ग्रामीण भागातील मजूर (शेतमजूर आणि कंत्राटी कामगार, पशुपालक आणि दूग्ध व्यवसायिक, मच्छीमार )
  • बांधकाम क्षेत्रातील कामगार (गवंडी, मजूर आणि हेल्पर)
  • सेवा आणि वाहतूक क्षेत्रातील कामगार (ऑटो, टॅक्सी आणि ट्रक चालक/क्लीनर, हॉटेल, ढाबा किंवा कँटीनमधील कामगार)
  • छोटे व्यावसायिक आणि कारागीर (रस्त्यावरील फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेते, शिंपी (Tailor), न्हावी (सलोन कामगार) आणि मोची,
  • ​विडी कामगार, हातमाग विणकर आणि कुंभार)
  • आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील मानधनी कर्मचारी

ई श्रम कार्ड डाउनलोड कसे करावे

  • सर्वात आधी या अधिकृत वेबसाईट वर जा : eshram.gov.in
  • Already Registered हा पर्यायावर क्लिक करा
  • मुख्य पानावर Already Registered किंवा Update असे पर्याय येतील त्या पर्यायाला क्लिक करा
  • अगोदरचा मोबाईल नंबर टाकला होता ते टाका
  • यानंतर कोड येईल तो भरा
  • Send OTP’ वर क्लिक करा ओटीपी आल्यास ओटीपी टाकून सबमिट करा
  • आधार नंबर टाका आणि परत ओटीपी ऑप्शन निवडा कॅप्चा भरून सबमिट करा परत ओटीपी येईल
  • माहिती अपडेट करण्यासाठी अपडेट प्रोफाइल आणि ​Download UAN Card कार्ड डाउनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय येतील
  • Download UAN Card हा पर्याय निवडा
  • या नंतर तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूस Download UAN Card यावर क्लिक करा ते तुम्ही पीडीएफ स्वरूपात सेव्ह करू शकता

महत्त्वाची सूचना

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे E-Shram Card Scheme 2026) (ई-श्रम कार्ड योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येते मोफत वीज आणि सोडणार पॅनल साठी योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-surya-ghar-muft-bijli-yojana-2026/