प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी भारतातील सर्व कुटुंबांना औपचारिक बँकिंग प्रणाली सोबत जोडण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबांना बचत खाते, बँकिंग सेवा, पतपुरवठा, विमा आणि पेन्शन अशा गोष्टींबाबत आर्थिक सुविधांचा मिळावा हा आहे. आतापर्यंतच्या लोकांनी आणखीही या योजनेचा लाभ घेतला नाही त्यांच्यासाठी खालील संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली असून या योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे त्याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
योजनेचा उद्देश
प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) या योजनेचे प्रमुख उदेदश खालीलप्रमाणे दिले आहेत:
- वित्तीय समावेशन (Financial Inclusion) : भारतातील सर्व नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहचवणे, ज्यांच्याकडे बँकिंग सुविधा नाहीत आणि अशा गरिबांना आणि गरजू व्यक्तींपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे.
- या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किंवा मदत लाभार्थ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जाते. यामुळे भ्रष्टाचार कमी होतो किंवा भ्रष्टाचाराला आळा बसतो.
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे कमी आहे अशा कुटुंबांना बचतीसाठी प्रोत्साहन करणे आणि अशा कुटुंबांना बचत खात्याची सुविधाही उपलब्ध करून देणे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा तातडीची मदत मिळवून देणे आणि विमा संरक्षणाचे नागरिकांना आर्थिक सुरक्षा देणे.
- देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन आणि विमा अशा बँकिंग प्रणालीशी सोडून सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे.
- देशातील गरीब कुटुंबांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी बँकिंग प्रणालीच्या प्रमुख प्रवाहात आणणे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
पात्रता (Eligiblity)
प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी पात्रता काय असते आणि नियम कोणते असतात ? याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनधन खाते हे तोच व्यक्ती उघडू शकतो ज्यांच्याकडे अगोदर कोणत्याही प्रकारचे कोणत्याही बँकेचे बँक खाते नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- १० वर्षाचा मुलगा आपल्या पालकांच्या देखरेखीखाली जनधन चे खाते उघडू शकतो.
आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
- आधार कार्ड नसेल तर मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड (PAN Card), पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License), मनरेगा जॉब कार्ड (MGNREGA Job Card) किंवा राज्य सरकार जारी केलेले ओळखपत्र फोटो असलेले.
- जर तुमच्याकडे वरीलपैकी कुठलेही कागदपत्रे नाहीत तर बँक अधिकारी तुमची पडताळणी करून लघु खाते उघडू शकतो.
- यासाठी तुम्ही बँक समोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो
- पासपोर्ट आकाराचा फोटो
मिळणारे अनुदान
प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) या योजनेअंतर्गत लाभारताला मिळणारे अनुदान हे खालील प्रमाणे सविस्तर दिले आहे.
| लाभाचा प्रकार | विवरण | स्वरूप |
| थेट लाभ हस्तांतरण | केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे पैसे | बँक खात्यात जमा |
| अपघात विमा | २ लाख रुपयांपर्यंतचा विमा | दावा केल्यावर |
| ओव्हरड्राफ्ट सुविधा | पात्रतेनुसार १०,००० रुपयांपर्यंत अपत्यकालीन मदत | कर्जाच्या स्वरूपात |
| सामाजिक सुरक्षा योजना | पेन्शन (APY), जीवन विमा (PMJJBY) | खात्यातून ऑटो-डेबिट |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) या योजनेची प्रक्रिया दोन दोन पद्धतीने केली जाते खालील प्रमाणे याची सविस्तर माहिती दिली आहे.
ऑफलाइन प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कोणत्याही खाजगी बँकेच्या शाखे भेट द्या.
- या बँकेमधून प्रधानमंत्री जनधन योजना या योजने साठी फॉर्म मोफत मिळवा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरा (नाव, पत्ता, मोबाईल नंबर, व्यवसायची माहिती आणि वारसदार)
- अर्जासोबत सांगितलेली आवश्यक कागदपत्रे जोडा दोन पासपोर्ट साईजचा फोटो.
- भरलेला अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे बँक मध्ये जमा करा.
बँक मित्र द्वारे अर्ज करणे
- तुम्ही तुमच्या बँक मित्र त्यांच्याशी संपर्क साधून खाते उघडू शकता.
- खाते उघडण्यासाठी बँक मित्राकडे बायोमेट्रिक उपकरण असते त्याद्वारे खाते उघडले जाते.
- तुमच्या आधार कार्ड च्या साह्याने तुमची ओळख पटवून खाते उघडले जाऊ शकते.
ऑनलाइन अर्ज
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या pmjdy.gov.in
- फॉर्म विभागामध्ये फोनची भाषा निवडा हिंदी किंवा इंग्रजी
- फॉर्म ची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळ असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन जमा करून घ्या.
- फॉर्म भरताना सोमवार तुमची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा करायला विसरू नका.
- कर्ज मध्ये तुमची सर्व माहिती अचूक असावी चुकीची असल्यानंतर अर्ज रद्द होऊ शकतो.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री जनधन योजना 2026 (Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “आयुष्यमान भारत योजना 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/ayushman-bharat-yojana-2026