प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) सर्व शेतकऱ्यांसाठी Best मार्गदर्शन|आत्ताच अर्ज करा

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) ही योजना शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी २०१६ मध्ये सुरू करण्यात आली आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, परंतु शेती हे हवामानावर अवलंबून असते. काही वेळा गारपीट अवकाळी पाऊस दुष्काळ किंवा पुर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि उत्पन्न निघत नाही यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होऊ शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनेची सुरुवात केली. ही योजना फक्त शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढत नाही तर शेतकऱ्यांमध्ये जोखीम उचलण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मनात विकसित करण्याचा प्रयत्न करते.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ द्यायचा असेल तर खालील माहिती तुमच्यासाठीच आहे लागरणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि योजनेचे उद्देश, मिळणारे अनुदान या लेखांमध्ये पुढील प्रमाणे आहे.

योजनेचे उद्देश

ज्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी योजनेचे उद्देश खालील प्रमाणे दिले आहेत:

  • नैसर्गिक आपत्तीमुळे (दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, गारपीट, भूस्खलन) नुकसान झाल्यानंतर शेतकरी खचून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि विमा संरक्षण उपलब्ध करून देणे.
  • पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतो व पुढील हंगामात शेती करण्यासाठी अडचण येऊ शकते, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार त्यांचे उत्पन्न स्थिर ठेवून त्यांना पुढील हंगामी शेतीसाठी अडचण येऊ नये म्हणून.
  • या योजनेमागील सर्वात प्रमुख उद्देश कृषी क्षेत्रासाठी बँकेकडून मिळणारा कर्जपुरवठा सुरळीत चालू ठेवणे. जेणेकरून पीक वाया गेल्यास शेतकरी कर्जबाजारी होणार नाही बँकेचे कर्ज थकणार नाही.
  • ग्रामीण भागातील सर्व शेती व्यवसायातील आर्थिक जोखीम कमी करून शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक आधार पोहोचवणे.

पात्रता व अटी

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या पात्रता आणि अटी अर्जदाराला मान्य असाव्या लागतात.

पात्रता (Eligibility)

  • भारतातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत (जमीनमालक, भाडेतत्त्वार शेती करणारे अशे सर्व)
  • अधिसूचित केलेल्या क्षेत्रात अधिसूचित पिके म्हणजेच खरीप आणि रब्बी हंगामातील पिके, तसेच बागायती/व्यावसायिक पिके घेणारी शेतकरी या योजनेचा अर्ज करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले आहे, असे शेतकरी या योजनेसाठी ऐच्छिक करण्यात आले आहेत.
  • शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर ७/१२ उतारा, जमिनीचे कागदपत्र, आधार कार्ड आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे.

अटी

  • ही योजना केवळ राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या भावासाठी विशिष्ट पिकांसाठी लागू आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी विविध वेळेच्या आत प्रीमियम भरणे अनिवार्य आहे.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला किंवा संबंधित कृषी विभागाला ७२ तासांच्या आत कळवणे अनिवार्य आहे.
  • नुकसान किती झाले व कुठे झाले हे अचूक समजण्यासाठी नुकसानीचे फोटो किंवा व्हिडिओ जियो-टॅग केलेल असावे.
  • अर्जदाराची बँक खाते आधार कार्ड ची लिंक असणे अनिवार्य आहे कारण अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे अर्जदाराकडे असणे अनिवार्य आहे.

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड , मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड.
  • ७/१२ उतारा (7/12 Extract)
  • ​८-अ चा उतारा
  • पीक पेरा प्रमाणपत्र
  • भाडेकरारनामा (असाल तर)
  • बँक पासबुक
  • बँक खाते आधार लिंक
  • कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र (कर्जदार शेतकऱ्यांसाठी)
  • वरील सर्व कागदपत्राच्या फोटो कॉपी
  • चालू असलेला मोबाईल नंबर

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे दिली आहे.

  • सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या pmfby.gov.in
  • मुख्य पानावर ‘Farmer Corner’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे नाव आधार नंबर मोबाईल नंबर आणि पत्ता ही सर्व माहिती अचूक भरा. याद्वारे तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल ते टाकून नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा
  • Application’ किंवा ‘Enrollment’ हा पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा जिल्हा, तालुका, गाव, बँकेचे तपशील आणि जमिनीचा गट क्रमांक काळजीपूर्वक भरा.
  • यानंतर पेरणी केलेली पीक आणि पेरणीची तारीख लिहा.
  • सांगितलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड करताना तुमच्या जवळ असलेल्या सातबारा आणि पीक पेरा प्रमाणपत्राची जुळत आहे का तपासा.
  • यानंतर प्रीमीयम रक्कम दर्शविली जाते. ते पाहूण ऑनलाईन पेमेंट द्वारे तुम्ही प्रीमियम भरू शकता.
  • प्रीमियम भरून झाल्यानंतर तुम्हाला Application Reference Number भेटेल जतन करून ठेवा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रत आणि पावती डाउनलोड करून ठेवा.

ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर :

जवळची बँक शाखा : सर्वप्रथम जिथे तुमचे पीक कर्ज आहे त्या बँक मध्ये जाऊन पिक विम्यासाठी अर्ज करा.
आपले सरकार सेवा केंद्र : तुमच्या भागातील अधिकृत कॉमन सर्विस सेंटर वर जा आणि नाममात्र शुल्क देऊन नोंदणी करा.

अनुदान

पिकाचा प्रकारशेतकऱ्यांचा प्रीमियम दर
खरीप पिके२.०%
रब्बी पिके१.५%
व्यावसायिक/बागवानी पिके५.०%

टिप : सरकारद्वारे अधिसूचित केलेल्या शासन निर्णयानुसार या दरांमध्ये किंवा अटींमध्ये वेळ वेळी बदल होऊ शकतो.

७/१२ वर पीक पेरा नोंदणी कशी करावी

प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) :-

  • प्ले स्टोअर e-Peek Pahani Ver 2.0 हा ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या
  • ॲप उघडल्यानंतर सर्वप्रथम तुमचे गाव, जिल्हा आणि तालुका निवडा.
  • तुमचे खाते क्रमात निवडा
  • तुमचा नोंदणी केलेला मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
  • यानंतर पीक माहिती नोंदवा
  • जमिनीचा गट क्रमांक निवडा
  • पिकाचा प्रकार टाका, पिकाचे नाव, लागवडीची तारीख आणि क्षेत्राचा तपशील
  • तुमच्या शेतातील पिकाचा फोटो काढून घ्या ॲपमधील कॅमेरा वापरून, लोकेशन’ (GPS/Location) सुरू ठेवणे आवश्यक आहे.
  • माहिती सबमिट करा.
  • माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026 feature image
प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026)

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री फसल विमा योजना 2026 (Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “प्रधानमंत्री जन धन योजना 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pradhan-mantri-jan-dhan-yojana-pmjdy-2026/