ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026) महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीतील कामासाठी कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर आणि विविध शेती अवजारांसाठी या योजनेची सुरुवात केली आहे. शेतामधील कामे योगाने आणि जास्त उत्पादनाने व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर यंत्रांच्या खरेदीवर अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे जिथे शेतामधील कमी जास्त असतात आणि ते कमी करण्यासाठी जास्त वेळ लागतो या योजनेद्वारे आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीसाठी उपयुक्त यंत्रांसाठी महाराष्ट्र शासन अनुदान देत आहे.
शेतामध्ये यंत्रांचा वापर का करावा?- शेतातील सर्व कामे वेळ वेळी होतील, पिकांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही आणि उत्पादन हे वाढू शकते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी अर्ज प्रक्रिया ही महाडीबीटी या पोर्टल द्वारे रागवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया कशी केली जाते?, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये पाहू शकता:
योजनेचा उद्देश
ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे पाहू शकतात:
- शेतीचे यांत्रिकीकरण : शेतामधील कामे जसे नांगरणी, पेरणी आणि मशागत करणे हे कामे वेळेत होतील आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सारखे आधुनिक यंत्रसामुग्री घेण्यासाठी प्रोत्साहन करणे.
- उत्पादन खर्च कमी करणे : यंत्राचा वापर केल्यामुळे मजुरीवरील खर्च कमी होतो आणि वेळेची बचत होते याच ठिकाणी पारंपरिक मशागतीच्या पद्धतीपेक्षा यंत्रांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकतो.
- उत्पादकता वाढवणे : वेळेवर मशागत आणि पेरणी झाल्यामुळे पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.
- लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत : आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नाही ते शक्य होण्यासाठी या अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक रक्कम शेतकऱ्यांना देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- श्रमशक्तीची कमतरता भरून काढणे : ग्रामीण भागांमध्ये मजुरांची उपलब्धता कमी होत असल्याने यंत्रणाच्या वापराद्वारे शेतामधील कामेगाने होऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे (Required Document)
ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्राची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- ओळख पटवण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.
- जमिनीचा ७/१२ उतारा चालू वर्षाचा आणि अद्ययावत असावा
- जमिनीचा मालकी पुरावा म्हणून ८-अ चा दाखला असणे अनिवार्य आहे.
- जर जे मी सामायिक असेल तर खातेदारांची ना हरकत प्रमाणपत्र आणि संमती पत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या नावाने असलेले बँक खाते परंतु ते खाते आधार कार्ड ची लिंक असणे बंधनकारक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- स्वयंघोषणा पत्र
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
पात्रता (Eligibility)
ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026) या योजनेसाठी कर्जदाराकडे खालील दिलेली पात्रता असेल तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जतारा महाराष्ट्र रहिवासी असावा.
- शेतकऱ्यांचे स्वतःचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे आणि ते बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे कारण अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.
- कशी ताराच्या नावावर स्वतःची शेत जमीन असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व विविध यंत्रांसाठी मागील दहा वर्षांमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर कसे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
- महिला शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सीमांत आणि लघु या प्रबर्गातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते महाडीबीटी द्वारे भरलेला अर्ज ग्राह्य धरला जातो.
- सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या mahadbt.maharashtra.gov.in
- यानंतर नवीन अर्जदार नोंदणी (New Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करा
- तुमचं नाव आणि आधार नंबर टाकून नोंदणी करून घ्या नोंदणी केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मेल किंवा तयार करावा लागेल.
- पासवर्ड आणि युजरनेमचा वापर करून लॉगीन करून घ्या.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि बँक तपशील काळजीपूर्वक भरा. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही यामुळे माहिती भरताना अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- यानंतर पोर्टल वरील कृषी विभाग या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या योजनेची निवड करा आणि तुम्हाला ज्या यंत्रासाठी अनुदान हवे आहे त्याची निवड करून घ्या.
- त्यानंतर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- यानंतर अर्जाची छाननी कृषी विभागामार्फत केली जाते.
अर्जा नंतरची प्रक्रिया
ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026):-
अर्जाची संख्या जास्त असेल तर लाभारतीची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येते.
निवड झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत पोर्टल वारे किंवा एसएमएस द्वारे पूर्वसंमतीपत्र मिळते.
हे पत्र मिळायला शिकाय कुठल्याही प्रकारची खरेदी करू नका खरेदी केल्यानंतर अनुदान मिळत नाही.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेता कडून यंत्र खरेदी करून घ्या परंतु विक्रेता हा शासनमान्य विक्रेता असावा लागतो.
खरेदी करून झाल्यानंतर खरेदीचे बिल आणि यंत्रणा चे फोटो अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी लागतात.
अनुदान (Subsidy)
| शेतकरी प्रवर्ग | अनुदानाची टक्केवारी | कमाल अनुदान मर्यादा |
| सर्वसाधारण शेतकरी (General) | 40% | 75,000 – 1,25,000 |
| SC / ST / महिला शेतकरी | 50% | 1,00,000 – 2,40,000 |
| लहान व अल्पभूधारक शेतकरी | 40% – 50% | प्रवर्गाप्रमाणे बदलू शकते |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 (Tractor Subsidy Scheme 2026)या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “शेतकरी अपघात विमा योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/farmer-accident-insurance-scheme/