Shetkari Karj Mukti Yojana 2026 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक कर्जमुक्त योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. त्यापैकी हे एक शेतकरी कर्जमाफी पहिली यादी 2026 यादी जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेमुळे कर्जारी झालेली शेतकरी अनिल कर्जाचा भार असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा मार्ग सोयीस्कर यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या याद्या, लाभार्थीची निवड प्रक्रिया, जिल्हानिहाय स्वरूप यांची सर्व माहिती तुम्हाला खालील लेखांमध्ये मिळून जाईल.
Shetkari Karj Mukti Yojana 2026 : शेतकरी कर्जमाफी पहिली यादी म्हणजे काय?
शेतकरी कर्जमाफी पहिली यादी जाहीर म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी कर्जमुक्त योजना या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली पहिली यादी जाहीर करणे.
- पात्र शेतकऱ्यांची नावे : जा शेतकरी बांधण्याचे कर्ज शासनाने ठरवलेल्या नियमानुसार माफ होणार आहे किंवा माफ झालेली आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांची यादी.
- निधी वाटपाची सुरुवात : यादी जाहीर झाल्यानंतर शासनाकडून संबंधित बँकेमध्ये निधी वर्ग करण्यास सुरू होते, यामुळे पात्र शेतकऱ्यांचा कर्जाचा भार कमी होण्यास मदत होते.
- टप्प्याटप्प्याने प्रक्रिया : एका वेळी सर्व शेतकऱ्यांची नावे यादी मध्ये जाहीर करणे शक्य नाही, यामुळे शासन पहिली यादी जाहीर करून त्या प्रक्रियेची प्रतिकृती सुरुवात करते.
कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकतो ?
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये किंवा आगामी याद्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा म्हणजे कोणत्या निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होऊ शकतो हे खालील प्रमाणे पहा:
- शेतकऱ्यांकडे ठरवलेल्या मर्यादित शेत जमीन असलेले म्हणजे आर्थिक दृष्ट्या गरज आहे अशा शेतकऱ्यांचा पहिल्या यादीमध्ये समावेश होऊ शकतो.
- शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीपर्यंत ज्यांचे पीक कर्ज किंवा अल्पमुदत कर्ज थकले आहेत असे शेतकरी.
- जे शेतकरी विशेष प्रोत्साहन पर योजनेचा अंतर्गत नियमित किंवा तारखेच्या आत कर्ज फिरले आहेत अशा शेतकऱ्यांचा सुद्धा यादीमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
- बँक खाते आधार कार्डशी आणि पी एम किसान किंवा शासनाच्या कोणत्याही पोर्टल वर डेटा शी जोडलेला आहे असे शेतकरी पहिल्या यादीमध्ये जोडू शकता.
- ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या ॲग्रीस्टॅक पोर्टेबल आपली नोंदणी आणि जमिनीची नोंदणी पूर्ण केली आहे.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 योजनाचा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची यादी आहे.
- ओळख पटवण्यासाठी शेतकऱ्यांचे स्वतःचे आधार कार्ड.
- ज्या बँक खात्याशी कर्ज आहे किंवा कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे त्या बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स.
- शेत जमीन मालकीची आहे याचा पुरावा पाहण्यासाठी ७/१२ (सातबारा) आणि ८-अ (8-A) उतारा
- बँकेने दिलेले कर्ज खाते क्रमांक बाकीचे कागदपत्र
- आधार कार्डची आणि बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- ॲग्रीस्टॅक / फार्मर रजिस्ट्री पावती
लाभार्थ्याने पहिली यादी कशी तपासावी ?
शेतकरी कर्जमाफी याची पहिली यादी तपासण्यासाठी खालील पद्धत वापरावी.
- शासनाने किंवा संबंधित सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या तेथे कर्जमाफी पहिली यादी किंवा लाभार्थी यादी यापैकी कुठल्याही पर्यायावर क्लिक करा.
- तिथे तुम्ही तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचे नाव टाका त्यावरून यादी पाहता येते.
- तुमच्या ग्रामपंचाय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात येते, तुम्ही तेथे जाऊन पाहू शकता.
- तुमच्या जवळ असलेले आपले सरकार केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र तिथे जाऊन या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन यादी पाहू शकता.
- तुमच्या बँकेमधून किंवा शेतकरी सहकारी सोसायटी मधून कर्ज घेतली आहे त्या शाखेमध्ये संपर्क साधून तुम्ही पाहू शकता.
| महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेत स्थळ : | येथे क्लिक करा |
| आपले सरकार अधिकृत पोर्टल : | येथे क्लिक करा |
| ॲग्रीस्टॅक / फार्मर रजिस्ट्री पोर्टल : | येथे क्लिक करा |
यादी मध्ये नाव नसल्यास काय करावे ?
शेतकरी कर्जमाफी च्या पहिले यादीमध्ये आपले नाव नसेल तर तुम्ही पुढील प्रक्रिया काय करावे.
- पहिले यादी मध्ये फक्त एका प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामधील यादी शेतकऱ्यांसाठी असते. अनेक वेळा कागदपत्राची पडताळणी किंवा आयकर आणि इतर माहितीचे प्रमाणीकरण उरले असल्यामुळे नागपूरच्या यादीमध्ये जाऊ शकते, घाबरण्याची गरज नाही.
- तुम्ही ज्या बँकेमधून किंवा शेतकरी सहकारी सोसायटी मधून कर्ज घेतले आहे त्या शाखेमध्ये व्यवस्थापकांशी संपर्क साधून तुमचे नाव पहिल्या यादीमध्ये का आले नाही याचे कारण विचारू शकता.
- तुमची बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे की नाही याची खात्री करा. या कारणामुळे अनेक वेळात तुमचे नाव यादीमध्ये यायचे राहू शकते.
- शासनाकडून टप्प्याटप्प्याने पुढील सुधारित आणि विस्तृत याद्या जाहीर केल्या जातात.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे गांडूळ खत उत्पादन योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/vermicompost-production-unit-scheme-2026/