National Scholarship Portal 2026 : नॅशनल स्कॉलरशिप योजना 2026 | गुणवंत विद्यार्थ्यांसाठी Best संधी!

National Scholarship Portal 2026 : भारत सरकारने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डिजिटल योजना सुरू केली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवासाला आर्थिक बळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना एक सिंगल विंडोज सिस्टिम असून जिच्या माध्यमांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध सरकारी संस्थांच्या अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि होत करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी आणि आर्थिक अडचण दूर करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्र, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये दिली आहे.

National Scholarship Portal 2026 : योजनेचा उद्देश

नॅशनल स्कॉलरशिप योजना 2026 या मुख्य उद्देश खालीलप्रमाणे पाहू शकता:

  • आर्थिक सहाय्य प्रदान करणे : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे किंवा गरिबीमुळे ज्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्पणवी लागते अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत सरकार करणार आहे.
  • समान संधी उपलब्ध करून देणे : समाजामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि विशेष प्रतिनिधी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संवाद संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा मुख्य वाटा आहे.
  • गळती प्रमाण कमी करणे : शालेय आणि उच्च शिक्षणात दरम्यान आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांची होणारी शाळा किंवा कॉलेज कमी करण्यात यावे यासाठी योजना सुरू केली आहे.
  • गुणवत्तेला प्रोत्साहन देणे : होतकरू आणि उच्च गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रस्तावित करणे आणि त्यांना करेल घडवण्यासाठी प्रेरित करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  • पारदर्शक आणि सुलभ प्रणाली निर्माण करणे : शिष्यवृत्ती वितरणा मधील मध्यसंस्था डीबीटी द्वारे डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करून देणे जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी उपयोगी येतील.

National Scholarship Portal 2026 : पात्रता – Eligibility

नॅशनल स्कॉलरशिप योजना 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.

  • विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असावा.
  • ​हा अभ्यासक्रम इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी, १२ वी, पदवी (Graduation), पदव्युत्तर (Post-Graduation) किंवा तांत्रिक/व्यावसायिक (Technical/Professional) कोर्सेसपैकी असावा.
  • या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये कमीत कमी 50% गुण की मातून अधिक असणे अनिवार्य आहे.
  • हर्षदा कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे ₹२.५ लाख ते ₹४.५ लाख या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड हे बँक शी लिंक असणे अनिवार्य आहे.
  • ​शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यार्थी एका वेळी एक मेरिट-आधारित आणि एक किंवा अधिक कल्याणकारी (Welfare-आधारित) छात्रवृत्ती योजनांचा लाभ नियम व अटींच्या अधीन राहून घेऊ शकतात.

National Scholarship Portal 2026 : आवश्यक कागदपत्रे – Rerquired Documents

नॅशनल स्कॉलरशिप योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता पडते.

  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड
  • मागील परीक्षेची गुणपत्रिका (बंदिस्त मी सध्याच्या वर्गाची कथा त्या आधीच्या वर्षाची किंवा सत्राची गुणपत्रिका असणे बंधनकारक आहे)
  • शाळेमध्ये असाल तर शाळेचे आणि महाविद्यालय मध्ये असाल तर महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र (Bonafide Certificate)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत
  • चालू शैक्षणिक वर्षामध्ये कॉलेज किंवा शाळेची फी भरण्याची पावती
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर
  • टीप : शैक्षणिक परिषद 2026-27 पासून आधार फेस ऑथेंटिकेशन’ (Aadhaar Face Authentication) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अर्ज भरत असताना तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ‘Aadhaar FaceRD’ आप असणे आणि चेहरा स्कॅन करणे आवश्यक असू शकते.

National Scholarship Portal 2026 : अनुदान – Subsidy

शिष्यवृत्तीचे प्रकारअनुदानाची रक्कम (अंदाजे)
इयत्ता ९ वी आणि १० वी Pre-Matric Scholarship (पूर्व-मॅट्रिक)₹१,००० ते ₹६,००० प्रतिवर्ष
Post-Matric Scholarship (उत्तर-मॅट्रिक)₹७,००० ते ₹१५,०००
Post-Matric / Merit-based₹१०,००० ते ₹२०,००० प्रतिवर्ष
Professional Courses₹२०,००० ते ₹३०,००० प्रतिवर्ष
Technical Education Scholarships₹५०,००० प्रतिवर्ष

National Scholarship Portal 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

नॅशनल स्कॉलरशिप योजना 2026 या योजनेची अर्थ प्रक्रिया तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • सर्वप्रथम तुम्ही नॅशनल स्कॉलरशिप योजना च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • यानंतर मुख्य पानावर गेल्यावर ‘Register / OTR’ किंवा ‘Apply for Scholarship’ या या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला आधार कार्डची माहिती आणि अंधाराशी लिंक असलेला मोबाईल नंबर चा वापर करून नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर मिळेल त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या योग्य योजना ची यादी दिसेल. यादीमधील तुम्हाला हवी असेल ती योजना निवडू शकता.
  • तुमची पात्रता तपासून योग्य योजनेवर क्लिक करा.
  • अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील (शाळा/कॉलेजचे नाव, मागील गुण इ.) आणि बँक खात्याचा तपशील काळजीपूर्वक आणि अचूक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे (आयडी प्रूफ, मार्कशीट, उत्पन्न दाखला, फी पावती आणि बँक पासबुक) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अगोदर सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जा प्रिंट आउट काढून ठेवा. अर्ज यशस्वी पूर्ण सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन आयडी मिळेल तोही जपून ठेवा.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
National Scholarship Portal 2026 feature image
National Scholarship Portal 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “पोस्ट मॅट्रिक्स स्कॉलरशिप योजना 2026” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/post-matric-scholarship-scheme-2026/