Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 | विद्यार्थ्यांसाठी Best संधी

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 : विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये उच्च शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे, परंतु काही आर्थिक अडचणीमुळे किंवा राहण्याच्या गैरसोयींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून पंचित राहतात शिक्षण घेऊ शकत नाहीत. ग्रामीण भागामधील किंवा दुर्गम भागांतील शहरांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याचा जीवना प्रश्नांमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यावर एक तोडगा काढला आहे म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांच्या व स्त्री शिक्षणाच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी हे नाव देण्यात आले. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना शहरात राहून आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी ही योजना एक संजीवनी ठरत आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक गरजा पूर्ण होतील. जर तुम्हालाही वाटते आपल्या शिक्षण पूर्ण व्हावे तर आत्ताच या योजनेचा अर्ज करून घ्या. अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये आहे.

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 :योजनेचा उद्देश

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 या योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • आर्थिक स्थैर्य आणि शैक्षणिक सातत्य : ग्रामीण जीवनात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरांमध्ये येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, जीवन आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक आधार देणे. अशा विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देऊन त्यांचे शिक्षणातील सातत्य ठेमणे हा या योजनेचा प्रथम उद्देश आहे.
  • वसतिगृहाची कमतरता दूर करणे : विद्यार्थ्यांसाठी शासकीय किंवा शासकीय अनुदानित वसतिगृहांमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार नाही. अशा वस्तीगृहात कृष्ण मिळालेल्या विद्यार्थ्या बाहेर आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सक्षम आणि चांगला पर्याय उपलब्ध करून देणे.
  • उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे : आर्थिक परिस्थितीमुळे किंवा राहण्याच्या गैरसोयीमुळे प्रतिभावंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित न राहू न देतात त्यांना प्रोत्साहन देणे.
  • ड्रॉपआऊट रेट (Dropout Rate) कमी करणे : आर्थिक टंचाईमुळे अनेक विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणादरम्यान शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतात ही अडचण दूर करून उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवणे.

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 : पात्रता – Eligibility

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडेखालील पात्रता असणे महत्त्वाचे आहे.

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेमध्ये कमीत कमी 60% उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम जसे की अभियांत्रिकी वैद्यकीय म्हणजे प्रवेश घेतला असावा.
  • संबंधित विद्यार्थ्याला शासकीय किंवा शासकीय अनुदानित वस्तीग्रह मध्ये प्रवेश मिळालेला नसावा लागतो.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाख रुपये किंवा यापेक्षा कमी असणे बंधनकारक असते.
  • महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमानुसार पुरेशी असणे अनिवार्य आहे.

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 :आवश्यक कागदपत्रे – Required Documents

सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेले कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • विद्यार्थ्यांची ओळख तपासण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • बँक खाते पासबुक : विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँड खाते आणि ते बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे अनिवार्य आहे. कारण या योजनेअंतर्गत चे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
  • ​जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)
  • 10 वी आणि 12 वी परीक्षा उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र.
  • ज्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात तेथील प्रवेश पावती किंवा बोनाफाईड असणे बंधनकारक आहे.
  • संबंधित शासकीय किंवा शासकीय अनुदानित वस्तीग्रह मध्ये प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला होता आणि जागा न मिळाल्यामुळे आता तिथे प्रवेश मिळाला नाही याचा पुराना / पत्र
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2020 या योजनेचे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असून याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्ही महाडीबीटी किंवा इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या mahadbt.maharashtra.gov.in
  • पोर्टल वर नवीन नोंदणी करण्यासाठी वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि पत्ता अचूक आणि काळजी पूर्वक भरा.
  • प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यानंतर ‘Other Backward Bahujan Welfare Department’ (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) या विभागाअंतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेची निवड करा.
  • अर्जा मधील सर्व आवश्यक कागदपत्रे (जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका, बँक पासबुक) स्कॅन करून योग्य साईजमध्ये अपलोड करा.
  • पर्जन मधील सर्व माहिती चूक असल्याची खात्री केल्यानंतर सबमिट करू शकता. कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येणार नाही.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने असेल तर भरून घ्या.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पोच पावती किंवा प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.
  • सर्वात महत्त्वाचे : ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे आपल्या महाविद्यालयांमध्ये जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही. महाविद्यालय स्तरावरून कर्ज मंजूर झाल्यानंतर तो पुढील कारवाईसाठी कल्याण विभागाकडे पाठवला जातो.
Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026 feature image
Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026

महत्त्वाची सूचना (Discliamer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही इथे परंपरागत कृषी विकास योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/paramparagat-krishi-vikas-yojana/