Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना) ही योजना भारत सरकारने ऑगस्ट १९९८ रोजी सुरू केली. शेतकऱ्यांना कर्जमधून सुटका करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. भारत देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, अनेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत परंतु शेती करण्यासाठी केवळ कष्टच करून भागत नाही, तर शेती करण्यासाठी वेळेवर पुरीचे पैसे ही असणे अत्यंत महत्त्वाचे असते. बियाणे, खते आणि शेतीसाठी तंत्रज्ञान इतर शेती साहित्यासाठी पैसे लागत असत, परंतु पुरेसे पैसे शेतकऱ्यांकडे नसतात त्यामुळे शेतकरी सावकाराकडून कर्ज व्याजासहत पैसे काढतात. आणि असेच कर्जाच्या जाळ्यात अडकत जातात, यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो.
Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 :- या सर्व गोष्टी लक्षात घेऊन करा आणि शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आर्थिक मदत आणि कर्जपुरवठा करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. १९९८ रोजी सुरू करण्यात आलेली योजना आजच्या काळात अत्यंत मोलाची क्रांतिकारी योजना ठरली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणात कागदपत्रे ही लागत नाहीत अत्यंत कमी कागदपत्रांमध्ये तुम्ही या योजनेमध्ये कर्ज उपलब्ध करू शकता. कर्ज किती काढता येते? या योजनेचा अर्ज कसा करावा? या योजनेसाठी लागणारे कागदपत्र? पात्रता व निवड प्रक्रिया खालील लेखांमध्ये दिली गेली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना) या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणामध्ये दिली आहेत:
१. कर्ज मर्यादा (Enhanced Limits)
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा आता २.०० लाख करण्यात आली आहे. या अगोदर कर्जाची मर्यादा ही १.६० लाख होती.
- आणि अल्पमुदतीच्या पीक कर्जाची मर्यादा ५.०० लाख पर्यंत करण्यात आली आहे.
- आजच्या काळात महागाई वाढत असल्याने खते-बियाणे यांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन बँक प्रत्येक वर्षी क्रेडिट मर्यादेत १०% वाढ करू शकतो.
२. अत्यंत कमी व्याजदर (Affordable Interest Rates)
- बँकेचा मूळ व्याजदर हा ९% आहे.
- शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून २% व्याजाची सूट मिळत जाते ज्यामुळे व्याजदर हा ७% होतो त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
- मी शेतकरी कर्ज काढल्यानंतर दिलेले किंवा ठरवलेल्या वेळेत किंवा वेळेच्या अगोदर कर्जाची परतफेड करतात त्यांना व्याजात आणखी ३% सूट मिळत जाते.
- वेळेवर किंवा वेळेच्या आधी खर्च फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष सुभाष दार हा अत्यंत कमी म्हणजेच ४% एवढ्याच लागतो.
३. कार्डची दीर्घ मुदत (Validity)
- केसीसी खात्याची मुदत वाढ सुधारित नियमानुसार सहा वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जात आहे. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांनी पिकाची कापणी झाल्यानंतर खात्याचे नूतनीकरण करणे अनिवार्य आहे.
४. बहुउद्देशीय कर्ज सुविधा (All-in-One Credit)
- केसीसी अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा वापर खालील दिलेल्या गोष्टीसाठी ही करता येतो:
- पीक काढल्यानंतरचा खर्च
- कुटुंबासाठी लागणारा खर्च आणि घरगुती गरजा
- शेतीची यंत्रसामग्रीची दुरुस्ती व देखभाल जसे की ट्रॅक्टर..
- आता व्यवसाय करण्यासाठी ५ लाख पर्यंतचे भांडवल या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे व्यवसाय म्हणजे दुग्धव्यवसाय, पशुपालन, शेळी-मेंढी पालन आणि मत्स्यव्यवसाय कसे व्यवसाय.
५. डिजिटल आणि सुलभ बँकिंग (Digital Access)
- केसीसी कार्ड एटीएम कार्ड प्रमाणे शेतकऱ्यांना दिले जाते. पैसे काढण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे पैसे काढण्यासाठी बँक खात्यात जाण्याचे आवश्यकता नाही, खात्यांच्या दुकानातील पीओएस मशीन किंवा मोबाईल बँकिंग द्वारे लागेल तेव्हा पैसे काढू शकतात.
- तुमचे क्रेडिट कार्ड digilocker या ॲपमध्ये डिजिटल स्वरूपात तुम्ही साठवून ठेवू शकता.
६. विम्याचे कवच (Inbuilt Insurance)
- ज्यांच्याकडे केसीसी कार्ड आहे पिक विमा सह वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण काही बँक द्वारे दिले जाते. यामध्ये अपंगत व किंवा दुर्दैवी मृत्यू झाल्यास आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात.
पात्रता (Eligibility)
- जो शेतकरी स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीवर वैयक्तिक किंवा इतर भागीदारी सह शेती करतो.
- जे शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीवर भाड्याने शेती करतात किंवा कराराने घेऊन शेती करतात.
- शेतकरी जमीन मालकासोबत पिकाच्या वाटणी वर शेती करतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो परंतु घोषणापत्र असावे लागते.
- शेतकरी, भाडेत पर शेती करणारे किंवा बटाईदार हे सर्व एकत्र येऊन बचत गट किंवा संयुक्त जबाबदारी गट या योजनेअंतर्गत सगळे मिळून अर्ज मिळू शकतात.
- ज्यांच्याकडे दुधाचे जनावर आहेत म्हणजेच गाई किंवा म्हशी पाळणारे शेतकरी आणि त्यांच्या संस्था (गाई म्हशी)
- पशुपालन करणारे शेतकरी
- कुक्कुटपालन करणारे किंवा पक्षी पाळणारे शेतकरी.
- मत्स्यपालन, सागरी मासेमारी करणारे मच्छीमार आणि त्यांच्याकडे स्वतःची किंमत भाड्याने घेतलेले तलाब किंवा बोट आहेत असे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार शेतकऱ्यांचे वय १८ वर्षे ते ७५ वर्षे असणे अनिवार्य आहे.
Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील अटी व नियम मान्य असणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना) या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्ज दाराकडे खालील सर्व कागदपत्रे हसणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स , पासपोर्ट
- वीज बिल किंवा रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र (पत्त्याचा पुरावा बघण्यासाठी)
- जमिनीचा ७/१२ उतारा जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले.
- ८-अ उतारा एकूण किती जमीन आहे शेतकऱ्यांच्या नावावर यासाठी.
- फेरफार उतारा (Mutation Entry)
- भाडेपट्टा किंवा संमतीपत्र (Lease Agreement)
- चालू हंगामाचा पेरा पत्रक (नमुना नं. ८)
- दूध व्यवसाय किंवा पोटरी असल्यास प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या आणि जावेचा पुरावा लागतो.
- मासेमारी करणारे नागरिक त्या तलावाचा मालकी हक्क किंवा परवाना किंवा बोट नोंदणी प्रमाणपत्र लागते.
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते पासबुक
- नॉन-डिफॉल्ट घोषणापत्र
अर्ज प्रक्रिया ( How to Apply)
Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो.
१. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया (बँक द्वारे)
- तुमच्या बँक मध्ये आधीपासून बचत खाते किंवा तुम्हाला PM-KISAN या योजनेची हप्ते मिळतात त्या बँकेची भेट घ्या.
- बँकेचा अकाउंट वरून किसान क्रेडिट कार्ड Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 या योजनेचा अर्ज मिळवा.
- खर्चामध्ये दिलेली तुमची माहिती भरून घ्या (नाव, पत्ता, आधार नंबर) आणि याच बरोबर चालू हंगामातील पिकांची माहिती सर्व माहिती अचूक भरा
- अर्जासोबत तुमचे कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो जोडा.
- अर्ज भरून झाल्यानंतर परत पासून घ्या सर्व माहिती अचूक आहे का. यानंतर कर्ज अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा करा.
- बँक अधिकारी तुम्ही दिलेल्या अर्जाची, कागदपत्राची आणि जमिनीची तपशील पडताळणी करतो. सर्व माहिती योग्य असेल .तर तीन ते चार दिवसात तुमची केसीसी कर्ज मंजूर केली जाते.मी तुम्हाला RuPay KCC Card मिळून जाते.
२. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- तुम्ही ज्या बँक खात्यातून कर्ज घेऊ इच्छित असाल त्या बँक खात्याच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या pmkisan.gov.in
- वेबसाईट वरती Agri Loan’ किंवा ‘Kisan Credit Card हा पर्याय निवडा
- सुटलाय ऑनलाईन यावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका आणि नोंदणी करा.
- तुमच्यासमोर अर्ज येईल त्या अर्जामध्ये तुमची सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
- सर्व माहिती व कागदपत्रे बरोबर आहेत का आता तपासा आणि अर्ज सबमिट करा
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन संदर्भ क्रमांक (Application Reference Number) मिळतो ज्याद्वारे तुम्ही अर्जाची स्थिती कधीही तपासू शकतो, क्रमांक जतून ठेवा.
किसान क्रेडिट कार्डद्वारे कोणते खर्च करता येतात?
Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना) या योजनेअंतर्गत खालील पिकांसाठी खर्च करता येतो.
- शेतीचा हंगामी खर्च : बियाणे आणि खते, कीटकनाशके, मजुरी आणि मशागत, पाणी आणि वीज बिल
- पीक काढणीनंतरचा खर्च : वाहतूक खर्च, पॅकेजिंग आणि साठवणूक
- घरगुती आणि कौटुंबिक गरजा : घरखर्च, शिक्षण आणि आरोग्य
- शेतीची देखभाल आणि शेतीपूरक व्यवसाय : यंत्रसामग्रीची दुरुस्ती, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन आणि मत्स्यव्यवसाय

Disclaimer : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Kisan Credit Card (KCC) Scheme 2026 (किसान क्रेडिट कार्ड योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे अटल पेन्शन योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/atal-pension-yojana-2026/