Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागेल त्याला शेततळे योजना) ही योजना महाराष्ट्र शासन कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या चांगल्या हितासाठी या योजनेची सुरुवात केली. महाराष्ट्र राज्यात एकूण जवळपास ८०% क्षत्रिय हे पावसाच्या पानावर अवलंबून आहे पाण्याशिवाय शेतीमध्ये पीक येत नाही. हवामान बदलामुळे पावसाचे नक्की सांगता येत नाही, दुष्काळी परिस्थिती असल्याने अशा गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते कारण जेव्हा पिकांना पाणी हवे असते त्यावेळी पिकांना पाणी मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पिक त्यांना मिळत नाही.
या समस्येवर चांगला तोडगा म्हणून “मागेल त्याला शेतळे योजना (Magen Tyala Shettatle Yojana 2026)” ही योजना सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे. पावसाळ्यामध्ये वाहणारे अतिरिक्त पाणी ते वाया न जाऊ देता शेततळे करून शेतामध्येच ठेवणे जेणेकरून दुष्काळी काळात पिकांसाठी वापर करता येतो.
योजनेची प्रमुख उद्दिष्टे
Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागील त्याला शेततळे योजना) या योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे सविस्तर लिहिले आहेत:
- पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकांना वेळेवर पाणी भेटत नाही यामुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर तोडगा म्हणून गरजेच्या वेळी पिकांना पाणी उपलब्ध करून देणे.
- पावसाच्या वेळी वाम जाणारे पाणी शेतातच अडवून त्या पाण्याची साठण करून दुष्काळी काळात पिकांसाठी वापर करणे.
- पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी फक्त खरीप हंगामावर अवलंबून राहतात, शेततळ्याचा वापर करून शेतकऱ्यांना हरभरा, गहू किंवा उन्हाळी पिक घेण्यासाठी सक्षम करणे.
- पाण्याची सोय झाल्यामुळे पिकांचे उत्पादक वाढते आणि यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढवण्यास मदत होते सोबतच जीवन मान सुधरवण्यास सुद्धा मदत होते.
- दुष्काळी काळात किंवा खंड पडणारा पाऊस अशा परिस्थितीतही शेती जिवंत ठेवणे गणित शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे.
- शेततळे केल्याने पावसाचे पाणी शेतामध्ये साठते आणि त्याचा फायदा आजूबाजूच्या विहिरी आणि कूपनलिंकाचे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते.
अनुदान किती मिळते ?
- कमल अनुदान हे शेततळ्यासाठी पूर्ण जेवढा खर्च होईल त्याच्या जवळपास ७०% ते ७५% किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपये एवढा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
- शेततळ्याचा आकार जर मोठा असेल ( ३० × ३० × ३ मीटर ) तर काही क्षेत्रात ७५,००० रुपये मिळू शकतात.
- जर शेततळ्याला प्लास्टिक अस्तरीकरण करायचे असेल तर साधारणपणे ७५,००० रुपये किंवा खर्च ५०% ते ७५% दिला जातो.
- यामुळे शेततळे आणि प्लास्टिक अस्तरीकरण या दोन्हींचा लाभ घेतल्या शेतकऱ्याला संपूर्ण खर्चामध्ये १,२५,००० ते १,५०,००० पर्यंत फायदा होऊ शकतो.
कोण पात्र ठरू शकतो ? (Eligibility)
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर किमान दीड एकर (०.६० हेक्टर) जमीन असणे आवश्यक आहे.
- ५ हेक्टर पेक्षा जास्त जमीन ७/१२ उताऱ्यावर असावी.
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा आणि शेततऱ्यासाठी जे जमीन आहे ते जमीन ही महाराष्ट्रातील असावी.
- शेतकऱ्यांनी या पूर्वी शासनाच्या कोणत्याही वैयक्तिक किंवा सामूहिक क्षेत्र याचा लाभ घेतला असेल, तर या योजनेचा लाख ते शेतकरी घेऊ शकत नाहीत.
- पुढील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळते : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसदार, दारिद्र्यरेषेखालील (BPL) धारक शेतकरी,महिला शेतकरी,अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकरी आणि अल्प व अल्पभूधारक शेतकरी.
वरील आटी व नियम ज्या शेतकऱ्यांना मान्य असतील ते शेतकरी Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागील त्याला शेततळे योजना) या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- ७/१२ (Satbara) उतारा ( जमिनीची मालकी तपासण्यासाठी आणि स्वाक्षरी असलेला ७/१२ उतारा)
- ८-अ (8-A) उतारा (कर्जदाराच्या नावावर एकूण किती जमीन आहे तपासण्यासाठी)
- शेतकऱ्यांचे स्वतःचे आधार कार्ड
- बँक पासबुक (Bank Passbook) (बंधन थेट बँक खात्याचे जमा होते)
- लागू असल्यास : दारिद्र्यरेषेखालील (BPL) प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate), आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसदार असल्याचा पुरावा, सहमती पत्र (Consent Letter)
- Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागील त्याला शेततळे योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे स्पष्ट व वाचता येतील अशी असावीत सर्व कागदपत्रावरील आधार कार्डावरील नाव सारखे असावे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागेल त्याला शेततळे योजना) या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरला जातो. अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करू शकता :
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या mahadbt.maharashtra.gov.in
- जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन नसेल केले तर नवीन अर्जुन नोंदणी हा पर्याय क्लिक करा
- तुमची वैयक्तिक माहिती भरा ( नाव, युजर आयडी आणि मोबाईल नंबर) तुमच्या मोबाईल द्वारे ओटीपी येईल ते टाकून नोंदणी करा.
- जर तुमचे बँक खाते अगोदर असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाका व लॉगिन करा.
- लग्न झाल्यानंतर माझे प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा सोबतच बँक खात्याचा तपशील अचूक भरा.
- जमिनीचा तपशील अचूक भरा.
- प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर अर्ज करा हा पर्याय क्लिक करा
- या नंतर विभागाची यादी तीसरी त्यापैकी कृषी विभाग (Agriculture Department) यादीतील हा पर्याय निवडा
- सिंचन साधने आणि सुविधा’ (Irrigation Facilities) या घटकासमोरील “बाब निवडा” हा पर्याय निवडा
- मुख्य घटकांमध्ये “वैयक्तिक शेततळे” या पर्यायवर क्लिक करा
- शेततळ्याचा आकार निवडा आणि जतन करून ठेवा
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर ‘मेक पेमेंट’ पर्याय निवडा.
- अर्ज भरून झाल्यानंतर शासनाने नमूद केलेली शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
- यानंतर अर्ज सबमिट करून तुमच्या अर्जाची पावती जतन करून ठेवा.
अर्जाची स्थिती कशी तपासावी?
Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागेल त्याला शेततळे योजना) या योजनेची अर्ज स्थिती तपासण्यासाठी खालील माहिती पाहू शकता
- सर्वात अगोदर या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या : mahadbt.maharashtra.gov.in
- लॉगिन करा तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन होते.
- लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूस मेनू मध्ये “माझे अर्ज” दिसून येईल ते पर्याय निवडा
- यानंतर तुम्हाला तुम्ही अर्ज केलेल्या योजनेचे नाव अनिता समोर अर्जाची परिस्थिती दिसे (Under Scrutiny (छाननी अंतर्गत), Approved / Pre-Sanctioned (पूर्वसंमती मिळाली), Rejected (अर्ज बाद झाला) आणि Sent Back to Applicant (अर्ज दुरुस्तीसाठी परत आला)

Disclaimer
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Magel Tyala Shettatle Yojana 2026 (मागील त्याला शेततळे योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येते “पंतप्रधान उज्वल योजना” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-ujjwal-yojana-2026/