MahaDBT Seed Scheme 2026 (महाडीबीटी बियाणे योजना) मोठे फायदे आणि सोपी अर्ज प्रक्रिया Best मार्गदर्शक

MahaDBT Seed Scheme 2026 (महाडीबीटी बियाणे योजना) ही योजना शेतक्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात याला आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केला जाते. परंतु शेती करणे जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे नाही थोडा शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आजच्या काळात सर्व वस्तू महागड्या झाल्य आहेत शेतामध्ये येणारे पिंक हे आपण वापरणाऱ्या बियाण्यांच्या दर्जावर अवलंबून असते. परंतु बाजारात विकल्या जाणाऱ्या बियांच्या किमतींमुळे अनेक शेतकरी खचून जाऊन छोट्या किंमतीमध्ये येणारे बी पिकासाठा वापरत आहेत. याचा परिणाम पिकावर पडतो, यामुळे उत्पन्न कमी होते. अश्या समस्या दूर व्हाळ्यात म्हणून ‘महाडीबीटी बियाणे योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेमुळे बियाणे चा काळाबाजर जास्त काळ चालणार नाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि कृषी उत्पादनात वाढ होईल असा या योजनेचा हेतू आहे.

योजनेचा उद्देश:

  • शेतकऱ्यांच्या पिकामध्ये वाढ करण्यासाठी सहज बियाणे उपलब्ध करूण देणे तेही गुणवत्त असलेली आणि प्रमाणित (Certified) व संकरित (Hybrid) असेलेली.
  • अनेक अल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी बियाणे घेणे शक्य व्हावे म्हणून बियाण्यांच्या किमतीवर ५०% आणि मर्यादित अनुदान मिळावं.
  • दर्जेदार बियाणे वापरले तर उत्पन्न ही वाढते आणि पिकांची उत्पादकता ही वाढते.
  • आता DB प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान मिळणार यामुळे काळाबाजर आणि भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही.
  • कमी खर्चामध्ये बियाणे मिळवून शेतकऱ्यांचे खर्च कमी होईल व उत्पन्न वाढेल.
  • कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले नवीन बियाणे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे.

योजने अंतर्गत मिळणारे बियाणे

महाडीबीटी बियाणे योजना अंतर्गत वेगवेगळ्या हंगामानुसार मिळाणारे बियाणे खाली आहेत:

  • खरीप हंगामातील बियाणे
  • सोयाबीन (सर्वात जास्त मागणी आणि सर्व ठिकाणी)
  • कापूस
  • भात (जास्त मागणी कोकणमध्ये असते)
  • ​मका ( जनावरांसाठी चारा आणि धान्य म्हणून पण उपयुक्त)
  • कडधान्ये (कडधान्ये म्हणजे तूर, मूग, उडीद)
  • भूईमूग, तीळ, आणि कारळे

रब्बी हंगामातील बियाणे

  • हरभरा ( प्रमुख कडधान्य )
  • गहू ( अधिक उत्पादन बागायती शेती मध्ये )
  • ज्वारी
  • मका आणि करडई ( इतर पिके )

शेतकरी ज्या जिल्ह्याचा असेल त्या हवामानानुसार त्या त्या हंगामात कृषी विभागाच्या नियमानुसार बियांण्याचे पर्याय उपलब्ध आहेत अधिक माहिती महाडीबीटी पोर्टल वर पाहू शकता.

मिळणारे अनुदान

“महाडीबीटी बियाणे योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना ३०% पासून १००% पर्यंत अनुदान (Subsidy) दिले जाते ते पिंकाच्या प्रकारानुसार आणि सरकारी योजनांच्या निकषांनुसा ठरवले जाते.

१. अनुदानाची टक्केवारी पाहता ५०% पर्यंत अनुदान दिले जाते.

  • कापूस आणि सोयाबीन= ४०% ते ६०% पर्यंत.
  • ​हरभरा, मूग, उडीद, तूर (कडधान्य)= ५०% ते ७५% पर्यंत.
  • ​भात आणि गहू= ३०% ते ५०% पर्यंत.

क्षेत्रफळ मर्यादा पाहता शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त २ हेक्टर म्हणजेच ५ एकर असेल तर अनुदानाचा लाभ घेता येतो.

बियाण्याच्या जाती पाहता नवीन सुधारित जातींच्या तुलनेत जुन्या जातींना कमी अनुदान आणि नवीन जातींना जास्त अनुदान दिले जाते

२. पीक प्रात्यक्षिके आणि मिनी कीट (१००% मोफत बियाणे)

  • अनुदानाची टक्केवारा पाहता या योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना १००% अनुदान दिले जाते.
  • क्षेत्रफळ मर्यादा पाहता बियाणे संच हे १ एकर किंवा ठरवून दिलेल्या मर्यादेतच दिले जाते.

पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राच असावा आणि सोबत रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असावे यासठी चालू वर्षातील ७/१२ उतारा आणि ८ अ असणे म्हत्वाचे आहे.
  • आधार कार्ड हे अर्जदाराकडे म्हणजेच शेतकऱ्यांकडे असणे अनिवार्य.
  • बँक पासबूक आधाराशी लिंक असावे
  • १ ते २ हेक्टरपर्यंत जमीन असेले तर त्यांना प्राधान्य दिले जाते
  • महिला आणि अनुसूचित जाती, जमाती यांना प्राधान्य व राखीव असते.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • चालू वर्षातील ७/१२ उतारा
  • ८- अ उतारा जमीन धारणा क्षेत्र तपासण्यासाठी
  • जातीचे प्रमाणपत्र

निवड झाल्यानंतर लागणारा

  • कागदपत्रे
  • बँक पासबुक
  • खरेदीचे पक्के बिल (Original Bill) ( GST बिल )
  • बियाण्याचे रिकामे वेष्टन/थैली
  • पूर्वसंमती पत्र (Pre-Sanction Letter)
  • स्वयंघोषणापत्र (Self Declaration)

अर्ज प्रक्रिया

  • सर्वात आगोदर अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: http://mahadbt.maharashtra.gov.in
  • पहिल्यांदाच वेवसाईटवर आला असाल तर “नवीन अर्जदार नोंदणी” (New Applicant Registration) क्लिक करा व आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका रजिस्ट्रेशन होईल.
  • आगोदर रजिस्ट्रेशन झाले असेल तर user ID आणि Passoword टाका लाँगिन करून घ्या
  • लॉगिन केल्यावर My Profile मध्ये जा
  • तिथे तुमची माहिती भरा ( पत्ता, बँक खात, तपशील)
  • ७/१२ आणि ८-अ उतारा यातील पूर्ण माहिती अचूक भरा.
  • प्रोफाईल वरील पूर्ण माहिती भरून झाल्यावर अर्ज करा हा पर्याय निवडा.
  • यानंतर पर्याय येतील त्यामध्ये “कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे, औषधे व खते” या समोर क्लिक करा
  • यानंतर नवीन फॉर्म येईल बियाणे, औषधे व खते” हा पर्याय निवडा.
  • यानंतर बियाणे वितरण हा पर्याय निवडा
  • तुम्हाला जे बियाणे हवे असतील ते निवडा आणि जतन करा.
  • निवडल्यानंतर परत मूख्य पानावर जाऊन अर्ज सादर करा Submit बटन दाबा
  • तुम्ही निवडलेल्या बियाणा प्राधान्य द्या
  • अर्ज Submit करण्यासाठी २३ रुपेचे ६० पैसे शुल्क ऑनलाईन द्या
  • शुल्क भरा व अर्जाची पावती डाउनलोड करा.

महत्त्वाच्या सूचना

  • लवकरात लवकर अर्ज करा कारण आता “आधी येईल त्याला प्राधान्य” अशा पद्धत चालू झाली आहे.
  • तुम्ही जो नंबर महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कराताना वापरला आहे तो नंबर चालू असावा याची दक्षता द्या
  • तुमची माहिती ही अचूक असेल तर तुम्हाला या योजनेच लाभा मिळू शकतो.

सूचना

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे महाडीबीटी बियाणे योजना हा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अधिक माहिती पाहू: https://totalyojana.com/mukhyamantri-tirth-darshan-scheme-2026/