महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्याबाबत नवीन नियम 2026 (Maharashtra Agricultural Land Lease) :- महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पडीक जमिनीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी शेत जमीन भाडपट्ट्याने देण्यासाठीच नवीन निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या नियमांमुळे शेत जमिनीचा मालक आणि भाडेकरू शेतकरी या दोघांच्या हिताचे रक्षण केले जाईल आणि विशेष म्हणजे भाडेकरू शेतकऱ्यांना कोण हक्काची भीती न घालता त्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असणारे कर्ज, पिक विमा आणि सरकारी योजनेचा लाभ मिळवून देणे हा या नियमाचा मुख्य हेतू आहे.
या नियमामुळे कृषी अर्थव्यवस्थेला एक नवीन गती मिळेल आणि ही एक पारदर्शक आणि फायदेशीर व्यवस्था ठरेल. हा निर्णय का याचे नियम काय आणि अगोदर चे नियम काय होते? आत्ताचे नियमामध्ये काय बदल झाले आहे? याची सर्व माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये समझेल.
नवीन नियमाचे उद्देश
महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्याबाबत नवीन नियम 2026 (Maharashtra Agricultural Land Lease) या नियमाचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे पाहू शकतात :
- शेतजमिनीचा इष्टतम वापर : पडीक शेती परवडत नाही मंजुरांची कमतरता असल्याने. अशा जमिनी उत्पादक देऊ शकतील आणि त्यांना उत्पादक शेतीखाली आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- भाडेकरू शेतकऱ्यांना संरक्षण आणि सबलीकरण : अगोदरच्या नियमांमध्ये मालकी हक्काची जमीन जाण्याची भीती असल्याने अनेक मानव जमीन भाड्याने देण्यास घाबरत होते. परंतु आता नवीन नियमांमुळे तीबीटी दूर झाली आणि कायदेशी संरक्षण देण्यात आले आहे.
- पारदर्शक व्यवहार : नवीन नियमामुळे आता पूर्ण व्यवहार पारंपरिक पद्धतीने होणार आहे. शेती भाडपट्ट्यांचे व्यवहार अधिकृत आणि नोंदणीकृत असावेत, यामुळे भविष्यातील वाद होणार माहित आणि ग्रामीण भागात जमिनीचा एक संघटित बाजारपेठ निर्माण होईल.
- गुंतवणुकीला चालना : या नवीन नियमामुळे जमीन भाड्याने घेणारा शेतकरी जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित होईल.
- कुळ हक्काचा संभ्रम दूर करणे : या नवीन नियमामुळे तरतुदीमुळे भाडे करू शेतकऱ्याला जमिनीवर कोणताही मानकी हक्क किंवा कुळ हक्क प्राप्त होणार नाही हे स्पष्ट करून जमीन मालकांना सुरक्षित ठेवणे आहे या नवीन नियमांमध्ये.
- वाद निवारण : शेत जमीन मालक आणि भाडेकरू यामध्ये वाद होणार नाही; महसूल यंत्रणेच्या माध्यमातून भाडेपट्टा शी संबंधित वाद त्वरित आणि स्थानिक पातळीवर निकाली काढणे, यामुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा होणार नाही किंवा कमी होईल.
नवीन नियमाची यादी
Maharashtra Agricultural Land Lease :-
- आता तोंडी करार कायदेशीर मानला जाणार नाही. भाडपट्टा हा केवळ लेखी आणि रीतसर नोंदणी कृत असणे अनिवार्य आहे.
- भाडेकरू शेतकऱ्याला जमिनीवर कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क किंवा कुळ हक्क मिळणार नाही.
- करार संपल्यानंतर म्हणजेच करार करतेवेळी जो काळ/तारीख दिली आहे ते संपल्यानंतर जमिनीचा ताबा कोणत्याही कायदेश अडचणी शिवाय मूळ मालकीकडेच राहील.
- नोंदणी करारामुळे भाडेकरू शेतकऱ्यांना पीक कर्ज, पिक विमा आणि विविध कृषी अनुदान योजनेचा लाभ मिळणे कठीण जाणार नाही.
- भाडेकरू शेतकरी ही जमीन तिसऱ्या कोणालाही कोणत्याही व्यक्तीला पोट-भाडेपट्ट्याने देता येणार नाही.
- जर शेठ चवी अनुसूचित जमातीतील व्यक्तीची असेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्ण परवानगी घेतलेल्याशिवाय जमीन भाड्याने देऊ शकत नाही.
- भाडेकरू आणि मालक यांच्यातील वाद निर्माण झाल्यास वाद सोडवण्यासाठी तहसीलदार हे सक्षम प्राधिकारी असणार आहेत. त्यांना तीन महिन्याच्या आत निर्णय सांगणे अनिवार्य आहे.
- करार करताना भाड्याचे स्वरूप, कालावधी आणि जमिनीची सविस्तर माहिती नमूद करणे बंधनकारक केले आहे.
- भाडपट्ट्याचा कालावधी हा मालक आणि भाडेकरू यांच्या परस्पर संमतीने केला जाईल, परंतु तो कायद्याच्या मर्यादित असणे अनिवार्य आहे.
- घाड पट्टा वाला बाबत दिवाणी न्यायालयाचा हस्तक्षेप मर्यादित केला असून महसूल विभागामार्फत हे वाद मीटरण्यावर भर दिला जाईल.
कोण शेतजमीन भाडपट्ट्याने देऊ शकतो?
महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्याबाबत नवीन नियम 2026 (Maharashtra Agricultural Land Lease) या नियमांतर्गत शेती जमीन भाडपट्ट्याने कोण देऊ शकतो याची माहिती खालील प्रमाण आहे.
- ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे किंवा ज्यांची नावे ७/१२ कुत्र्यावर शेत जमीन मालक म्हणून आहेत, असे शेतमालक शेत जमीन झाड कटिंग देऊ शकतात.
- जर शेत जमीन संयुक्त नावावर असेल, तर तुम्ही सर्व खातेदारांची संमती घेऊन जमीन भाडपट्ट्यांनी देऊ शकतो.
- शेत जमीन धारण करणाऱ्या नोंदणीकृत संस्था त्यांच्या जमिनी नियमानुसार भाडपट्टाने देऊ शकतात.
- वारसा हक्काने मिळालेली किंवा वडीलोपार्जित जमीन मिळाली आहे, जागर संबंधित व्यक्तीचे कायदेशीर मालकी हक्क आहेत अशी शेत जमीन भाड्याने देऊ शकता.
- शेतमजूर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची असेल तर ती जमीन भाड्याने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी असणे अनिवार्य आहे.
- चिंचोली भाड्याने देण्यासाठी जमिनीचे ७/१२ उतारे, ८-अ चा उतारा आणि जमिनीवर कोणत्याही प्रकारचा कायदेशीरवाद नाही याची खात्री करणे अनिवार्य आहे.
भाडपट्टा करार कसा करावा?
महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्याबाबत नवीन नियम 2026 (Maharashtra Agricultural Land Lease) या नवीन नियमांतर्गत भाडपट्टा करार कसा करावा? याची सविस्तर माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.
कराराचा मसुदा (Drafting) तयार करणे
- जमिनीची माहिती : क्षेत्रफळ, गाव, गट क्रमांक, तालुका आणि जिल्हा.
- भाड्याची रक्कम (वार्षिक भाडे किती असे आणि ते कधी द्यायचे नमूद केले असणे अनिवार्य आहे)
- कालावधी (कराराची सुरुवात आणि समाप्तीची तारीख लिहावी)
- जमिनीचा वापर (तीन शेत जमीन फक्त शेतीसाठीच वापरली जाईल हे स्पष्ट लिहिणे अनिवार्य आहे)
- इतर अटी (पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी, पिकांचा मालक कोण असेल आणि वाद झाल्यास कायदेशीर प्रक्रिया काय असेल हे पण लिहिलेले असावे)
- स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्क : महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार ठरलेल्या भाड्यांचे रकमेवर लागू असलेले मुद्रांक शुल्क भरून स्टॅम्प पेपरवर कारनामा प्रिंट करून देणे.
- दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी (Registration) : हा करार दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- कराराच्या वेळी जमीन मालक, भाडेकरू आणि दोन साक्षीदार असणे अनिवार्य असते.
- नोंदणी फीस आणि मुद्रांक शुल्क भरल्यानंतर कराराची नोंदणी पूर्ण होईल.
- गाव दप्तरी नोंद (पीक पाहणी) : नोंदणी कृत करार पूर्ण झाल्यानंतर त्या आधारे गावातील तलाठ्याकडे जाऊन ‘ई-पीक पाहणी’ अधिकृत पोर्टल वर किंवा महसूल नोंदणीमध्ये भाडेकरू शेतकऱ्याचे नाव कष्टकरी नोंदून घेतली जाईल. नोंदणी केल्यामुळे भाडेकरूंना सरकारी योजनेचा लाभ घेणे सोपे होईल.
- शेत जमीन भाडेपट्ट्याबाबतचे अधिकृत माहितीसाठी आणि नियमावली बघण्यासाठी तुम्ही समोरील अधिकृत संकेतस्थळाचा वापर करू शकता : https://www.maharashtra.gov.in
भाडेकरू शेतकऱ्याच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या
Maharashtra Agricultural Land Lease :-
भाडेकरू शेतकऱ्याचा अधिकार
- नोंदणीकृत करार केल्यामुळे भाडेकरू शेतकरी पीक कर्ज, पिक विमा आणि तसे सरकारी कृषी अनुदान योजनेसाठी कायदेशीररित्या अर्ज करू शकतो.
- करारानुसार पिकवलेल्या पिकांवर पूर्ण अधिकार हा भाडेकरूचाच असतो.
- करारामध्ये किंवा जमिनीच्या व्यवहारात बाबत काही वाद निर्माण झाल्यास, तू तहसीलदार कार्यालयात मांडण्याचा आणि त्यावर वेळेत निर्णय मिळवण्याचा अधिकार हा भाडेकरूला आहे.
- जमीन मालक भाडेकरूला तोपर्यंत यखल करू शकत नाही, जो पर्यंत कराराचा कालावधी सुरू झाला.
भाडेकरू शेतकऱ्यांच्या जबाबदाऱ्या
महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्याबाबत नवीन नियम 2026 (Maharashtra Agricultural Land Lease) :-
- करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे ठरलेली भाड्याची रक्कम किंवा पिकातील हिस्सा जमीन मालकास वेळ देणे बंधनकारक आहे.
- जमिनीचा कस कमी होणार नाही आणि जमिनीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे हे भाडे गुरूचे काम आहे आणि भाडेकरुची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे.
- भाडेकरू ला दिलेली जमीन हा कोणात तिसऱ्या व्यक्तीला पुन्हा भाड्याने देऊ शकणार नाही. हे कायद्याने प्रतिबंधित आहे.
- जमिनीचा वापर फक्त कृषी कामासाठीच करणे अनिवार्य आहे. निवासी किंवा व्यवसाय कारणांसाठी जमिनीचा वापर करू शकणार नाही.
- करारा मधील अटी व शर्यतीचे कठोरपणे पालन करणे भाडेकरू शेतकऱ्याचे जबाबदारी आहे. करार संपल्यानंतर जमिनीचा ताबा कोणत्याही वाद निर्माण न करता मलकाकडे सुपूर्द करणे.
- पीक पाहणी किंवा महसूल नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर सादर करणे.
करारासाठी आवश्यक कागदपत्रे
Maharashtra Agricultural Land Lease :-
जमिनीच्या मालकाची कागदपत्रे
- ७/१२ उतारा (7/12 Extract)
- ८-अ उतारा (8-A Extract)
- जमिनीचा नकाशा
- मालकी हक्क प्रमाणपत्र
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
भाडेकरू शेतकऱ्याची कागदपत्रे
- शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- प्रतिज्ञापत्र (Affidavit)

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्याबाबत नवीन नियम 2026 (Maharashtra Agricultural Land Lease) याचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “महा आयडी योजना” सर्व माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/mahaid-scheme-2026/