प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana 2026) ही योजना सामाजिक सुरक्षितेसाठी भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आली आहे. अचानक अपत्यकालीन अपघातामुळे पैशाची गरज भासते आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम येऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, शेतकरी कामगार, लघु व्यवसायिक तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिका घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाते. योजनेची अर्ज प्रक्रिया ही पारदर्शक आहे. कधी काय होईल याची खात्री कोणीही करू शकत नाही यामुळे विमा संरक्षण सर्व व्यक्तींजवळ असणे गरजेचे आहे कारण या योजनेमुळे व्यक्ती हा कमी खर्चात जास्त सुरक्षा प्रदान करतो.
योजनेचा उद्देश
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana 2026)या योजनेचा प्रमुख उद्देश खालील प्रमाणे दिला आहे.
- देशातील सर्वसामान्य व्यक्तींना कमी खर्चामध्ये अपघात विमा संरक्षण उपलब्ध करून देणे, अनेक वेळा अपघातांमुळे व्यक्तीचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व होऊ शकते ज्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट वाटते.
- या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकरी कामगार, स्वयंरोजगार, असंघटित क्षेत्रातील कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले अशा नागरिकांना विमा संरक्षण मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे.
- देशातील सर्व नागरिकांना विमा क्षेत्राशी जोडून सामाजिक सुरक्षा वाढवणे आणि अपघातामुळे उद्भवणाऱ्या अडचणींना मोठ्या प्रमाणात कमी करणे आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
- या योजनेअंतर्गत भारतातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ घेता यावा.
पात्रता (Eligibility)
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana 2026) या योजनेसाठी लागणारी पात्रता आणि नियम खालीलप्रमाणे सविस्तर लिहिले आहेत:
- अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
- अर्जुनदाराचे बँक खात्यामध्ये अकाउंट असणे अनिवार्य आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- या योजनेचा अर्ज शेतकरी, कामगार, छोटे व्यवसायिक, स्वयंरोजगार, खाजगी किंवा सरकारी कर्मचारी आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार करू शकतात.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न याची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही यामुळे कमी उत्पन्न असलेले किंवा मध्यमवर्गीय कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- अर्जदाराने बँकेला ऑटो-डेबिटची परवानगी देणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जदाराकडे असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुकची प्रत
- बचत बँक खात्याचा तपशील
- पॅन कार्ड (असल्यास)
- मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
- पत्ता पुरावा (आवश्यक असल्यास)
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana 2026) या योजनेचा अर्ज हा आधुनिक पद्धतीने भरला जातो ऑनलाईन आणि ऑफलाइन. दोन्ही प्रकारची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online)
- सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या बँक नेट बँकिंग पोर्टल किंवा मोबाईल ॲप मध्ये लॉगिन करा. https://jansuraksha.gov.in/forms-pmsby.aspx
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या तीने पैकी एक पर्याय दिसेल Insurence, Schemes किंवा Social Security Schemes या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
- योजनेची यादी दिसेल त्यामधील प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2026 हा पर्याय निवडा
- अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, आधार नंबर), बँक तपशील आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
- योजनेच्या अटी व शर्ती वाचून घ्या आणि त्यांना संमती द्या.
- अर्जाची शुल्क भरून घ्या.
- सर्व माहिती अचूक आहे का तपासून घ्या आणि सबमिट करा.
- अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रत काढून ठेवा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया (Offline)
- [7:56 am, 11/06/2026] Sak: सर्वात अगोदर तुमच्या जवळच्या बँक शाखेला भेट द्या.
- बँक मधील कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म मिळवा.
- अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार नंबर, मोबाईल नंबर) आणि बँक तपशील याची सर्व माहिती अचूक भरा.
- अर्ज सोबत आवश्यक्य कागदपत्रे जोडून घ्या.
- योजनेच्या अटी व शर्ती वाचा आणि प्रेमियमची रक्कम खात्यातून वजा करण्यासाठी संमती द्या.
- अर्ज भरल्यानंतर सर्व माहिती अचूक आहे का तपासा आणि आवश्यक्य कागदपत्र आणि अर्ज बँक अधिकाऱ्याकडे द्या.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/mukhyamantri-majhi-ladki-bahin-yojana-2026/