प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) Best मार्गदर्शक|आत्ताच अर्ज करा

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) ही योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्याद्वारे चालवण्यात येते. या योजनेचा मूळ उद्देश म्हणजे कोरोना महामारी च्या संकटानंतर गरीबा आणि रस्त्यावरील लहान व्यवसायिकांना पुन्हा अगोदर सारखे जगता यावे आणि सन्मानाने उभे करण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली. या योजनेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये कर्ज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आश्वासन देण्याची गरज नाही. आणि कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्याला व्याजामध्ये ७% पर्यंत अनुदान मिळते आणि डिजिटल व्यवहारांमध्ये कॅश बॅक देण्यात येते.

PM SVANidhi Yojana 2026 :- शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर गाड्या लावणारे, चहाच्या टपऱ्या वाले, भाजी फळे विक्री करणारे, मोची आणि इतर लहान फेरीवाल्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणे हा या योजनेतमागचा प्रमुख उद्देश आहे. छोटे व्यावसायिक आत्मनिर्भर व्हावेत आणि त्यांना पैशामुळे सावकारांच्या पुढे हात पसरवायची गरज पडू नये, कर्जामधून मुक्त व्हावे, म्हण या योजनेची सुरुवात कोरोना महामारी संपल्यानंतर करण्यात आली होती परंतु केंद्र सरकारने या योजनेमध्ये वाढ करून देण्यात आली आहे आता ही योजना मार्च २०३० पर्यंत चालू राहणार आहे.

योजनेचे उद्देश

प्रधानमंत्री स्वनिधी योजना (PM SVANidhi Yojana 2026) या योजनेचे उद्देश खालील प्रमाणे सविस्तर लिहिलेले आहेत:

  • स्वस्त खेळते भांडवल (Working Capital) उपलब्ध करून देणे : आर्थिक संकटामुळे ज्याचे व्यवसाय बंद पडले होते, त्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सावकारांकडे किंवा बँकेत पैशासाठी जाण्याची आवश्यकता नाही कारण या योजनेअंतर्गत सहजपणे १५,००० ते ५०,००० पर्यंत अनुदान उपलब्ध करून देणे.
  • सावकारी पाशातून मुक्तता करणे : बँकेमधून कर्ज मिळाले नसल्यामुळे अनेक लहान विक्रेते स्थानिक सावकारांकडून मोठ्या प्रमाणात व्याज दराने पैसे घेत असतात आणि कर्जामध्ये अडकतात. या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायकरांना कमी व्याजात आणि शासकीय सुरक्षित कर्ज देणार आहे आणि सावकार यांच्या जातातून मुक्त करून देणे हाय या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
  • कोणत्याही हमीशिवाय (Collateral-Free) कर्ज देणे : छोट्या व्यवसायदाराकडे बँकेत तारण ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मालमत्ता किंवा गॅरेंटर नसतो. यामुळे या योजनेअंतर्गत सरकार कुठल्याही प्रकारचे आश्वासन द्या असे म्हणत नाही, यामुळे गरिबातील गरीब व्यक्ती नाही या योजनेचे कर्ज मिळू शकते
  • डिजिटल व्यवहारांना (Digital Banking) प्रोत्साहन देणे : या योजनेअंतर्गत नवीन तरतूद काढली आहे ज्यामुळे देशातील छोटे दुकानदार डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडले जाते म्हणजे ग्राहकांकडून UPI (Google Pay, PhonePe, Paytm) द्वारे पैसे घेतील त्यांनी असे केले तर सरकाराकडून जर हा कॅशबॅक दुकानदारांना दिला जातो.
  • वेळेवर कर्ज फेडण्याची सवय लावणे (Financial Discipline) : या योजनेअंतर्गत जो कर्ज काढला आहे तो कर्ज वेळेवर किंवा वेळेच्या आत कर्ज फेडला तर लाभार्थ्याला सरकार ७% व्याज सवलत देते. आणि या माध्यमांमधून वेळेवर कर्ज फेडण्याची सवयही लागते.
  • औपचारिक अर्थव्यवस्थेत समाविष्ट करणे : या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात येते आणि त्यांना वेंडिंग सर्टिफिकेट (Certificate of Vending) देण्यात येते आणि ओळखपत्र दिले जाते यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय अधिकृतपणे आणि सन्मानाने चालवण्यास मदत होते.

अर्ज कोण करू शकतो?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) या योजनेचा अर्ज कोण करू शकतो आणि या योजनेच्या अटी व नियम खालीलप्रमाणे दिले आहेत:

पुढील विक्रेते पात्र ठरतात: ​

  • भाजीपाला आणि फळ विक्रेते
  • चहाची टपरी, नाष्टा किंवा खाऊची गाडी असणारे
  • तयार कपडे, होजिअरी किंवा रेडीमेड कपड्याचे दुकान असणारे.
  • चांभार (मोची), न्हावी (सलून/हेअर ड्रेसर), आणि धोबी
  • ​फुले, हार आणि पूजा साहित्य विक्रेते
  • खेळणी, प्लास्टिकचे सामान, घरगुती भांडी आणि स्टेशनरी असणारे
  • पानाच्या टपऱ्या आणि किरकोळ किराणा माल विक्रेते

आवश्यक अटी आणि नियम

  • नगरपरिषद महानगरपालिका किंवा टाऊन वेटिंग कमिटीने जारी केलेले प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वेक्षणात ज्यांचे नाव समाविष्ट आहे ते या योजनेसाठी पात्र ठरू शकता.
  • ज्या अर्जदाराकडे नाव सर्वेक्षणात नसेल किंवा तुमच्याकडे ओळखपत्र नसेल, तर तुम्ही स्थानिक नगरसेवक, पालिका अधिकारी किंवा टाऊन वेटिंग कमिटीकडून लोकल वेंडर असल्याची शिफारस पत्र मिळवून अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे वय १८ किंवा १८ वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराची स्वतःची बँक खाते असावे आणि आधार नंबर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असावा.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जदाराकडे असावे.

  • आधार कार्ड हा मोबाईल नंबर शी लिंक कसावा.
  • मतदार ओळखपत्र
  • व्यवसायाचा पुरावा (Street Vendor Proof) सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी एक प्रमाणपत्र असावे : वेंडिंग प्रमाणपत्र (Certificate of Vending – CoV), फेरीवाला ओळखपत्र (Vendor ID Card) आणि शिफारस पत्र (Letter of Recommendation – LoR)
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी (PM SVANidhi Yojana 2026) खर्च करायची प्रक्रिया खालील प्रमाणे दिली आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्ही “PM SVANidhi Yojana 2026” या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या pmsvanidhi.mohua.gov.in
  • मुख्य पानावर तुम्हाला Apply Loan ₹15,000 (पहिल्या कर्जासाठी), Apply Loan ₹25,000 (दुसऱ्या कर्जासाठी) किंवा Apply Loan ₹50,000 (तिसऱ्या कर्जासाठी) असे पर्याय दिसतील, तुम्ही या अगोदर अर्ज केल्यानंतर पहिल्यांदा करत असेल तर Apply Loan ₹15,000 या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा चालू मोबाईल नंबर टाका मोबाईल द्वारे OTP येईल.
  • तो ओटीपी टाकून लॉगिन करा.
  • या नंतर तुम्हाला तुमचे नगरपालिकेच्या सर्वेक्षणात आहे का? हे विचारले जाईल.
  • त्यानुसार तुमची कॅटेगिरी निवडा जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर Letter Recommendation हा पर्याय निवडा व पुढे जा
  • तुमचा आधार नंबर टाका आणि Verify with OTP हा पर्याय निवडा. तुमच्या आधाराशी मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरती ओटीपी येईल आणि पडतानी पूर्ण होईल.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवरती फॉर्म उघडेल. तुमची वैयक्तिक माहिती, घराचा पत्ता, व्यवसायाचे ठिकाण आणि तुमच्या बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरा.
  • यानंतर बँक निवडा च्या बँकेकडून तुम्हाला कर्ज हवे त्या बँकेचे नाव आणि शाखा निवडा.
  • कागदपत्रे अपलोड करा (पासपोर्ट साईज फोटो आणि वेंडिंग सर्टिफिकेट किंवा शिफारस पत्र)
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती संपूर्ण अचूक आहे का बघा. आणि सबमिट या बटणावर क्लिक करा. अर्ज संपूर्ण यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर तुम्हाला एक एप्लीकेशन नंबर मिळेल तो जतन करून ठेवा.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया महा-ई-सेवा केंद्र (CSC Center) द्वारे

  • महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी (CSC) केंद्रावर भेटा तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल आणि व्यवसायाचा पुरावा सोबतचला पाहिजे.
  • तिथे तुमचे ऑनलाइन पद्धतीने अत्यंत कमी पैशांमध्ये भरून देतील.

मिळणारे अनुदान

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान खालीलप्रमाणे सविस्तर लिहिले आहे:

अनुदान कसे मिळते?: बँकेला तुम्ही पूर्ण व्याज द्यावे लागत नाही. तुम्ही वेळेवर हप्ते भरले किंवा वेळेच्या हात हप्ते भरले, प्रतीक तीन महिन्यांनी ७% व्याजाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
जर तुम्ही व्याजाचे हप्ते भरण्यात उशीर केला तर त्या महिन्याचे व्याज अनुदान मिळत नाही. यामुळे वेळेवर हप्ते भरले तर फायदेशीर ठरू शकते.

डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅक अनुदान

  • दुकानदार जेव्हा तुमच्या दुकानावर ग्राहकाकडून Google Pay, PhonePe, Paytm, BHIM किंवा RuPay वारे पैसे घेतो तेव्हा दुकानदाराला दरमहा १०० पर्यंतचा कॅशबॅक मिळून जातो.
  • जर तुम्ही डिजिटल व्यवहार केला तर तुम्हाला वर्षभरात एकूण १,२०० पर्यंत अनुदान मिळू शकते.
PM SVANidhi Yojana 2026 feature image
प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) या योजनेअंतर्गत छोटे व्यवसाय असणाऱ्यांना मिळणार अनुदान!

Disclaimer (महत्त्वाची सूचना) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2026 (PM SVANidhi Yojana 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येते “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026 ” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-matru-vandana-yojana-2026/