Fruit Orchard Plantation Scheme 2026 फळबाग लागवड योजना 2026 याला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेही म्हणतात. योजना ही महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी आहे अर्जदार महाराष्ट्रात राज्यातला आसवा. ही योजना शेतकऱ्यांचे वार्षीक उत्पन्न दुपट्ट आणि फादेशीर व्हावे म्हणून राबवण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ जो शेतकरी घेऊ शकला नाही, त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जे अनुदान शेतकऱ्यांना मिळते ते अनुदान तीन वर्षांच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत जाते. शेतकऱ्यांना या योजनेमुळे फळबाग लागवडीला प्रोत्साहन मिळते आणि शासनाकडून आर्थिक मदत (१००% अनुदान) पण मिळते.या योजनमध्ये १६ पेक्षा जास्त फळपिकांचा समावेश होतो.
योजनेचा उद्देश काय आहे?
१. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते कारण, फळबाग उभी राहिली की अनेकवर्ष शेतकरी त्यातून शाश्वत उत्पन्न काडू शकतो, फळबाग लागवड ही फायदेशीर ठरते सर्व पिंकाच्या तुलनेत.
२. पिकांमध्ये विविधता आणणे (Crop Diversification)
हवामानातील बदलामुळे कापूस, सोयाबीन, ऊस यांसारख्या पिकांना नुकसान जास्त होऊ शकते. शेतामध्ये वरील पिकासोबत फळबाग लागवड केली तर शेतीमध्ये विविधता येते.
३. मग्रारोहयो (MGNREGA) च्या तांत्रिक अडचणी दूर करण
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जाचक अटींमुळे (उदा. जॉब कार्ड किंवा मजुरीचे नियम) फळबाग लागवडीचा लाभ घेता येत नव्हता, तर आता या Fruit Orchard Plantation Scheme 2026-27 फळबाग लागवड योजनेमुळे शासकीय मदत मिळवून देणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
४. रोजगाराच्या संधी निर्माण करणे
रोजगाराची संधी फळबाग लागवडी मुळे निर्माण होते, फळबाग लागवडीसाठी, छाटणी, फळांची काढणी अशा कामासाठी शेतकऱ्यांना रोजगार हवे असतात आणि कामासाठी ग्रामीण भागातील लोक शहरांमध्ये येत होते ते कमी होतात.
५. पर्यावरण संवर्धन आणि जमीन सुधारणा
मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होते यामुळे वातावरणात शुद्ध होते.
फळझाडांच्या लागवडीमुळे त्यांची मुळे जमिनीची धूप कमी करतात.
कमी कष्टात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्याला आर्थिक मदत होते व समृद्धी मिळते.
मिळणारे अनुदान
Fruit Orchard Plantation Scheme 2026-27 फळबाग लागवड योजने अंतर्गत मिळणारे अनुधन हे १००% आहे अपनि हे अनधन तीन वर्षांच्या टप्प्यात तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार दिले जाते.
१. अनुदानाचे टप्पे (३ वर्षांचे नियोजन)
- ५०% रक्कम ही खड्डे खोदणे, रासायनिक खते, दर्जेदार रोपे आणि प्रत्यक्ष लागवड करण्यासाठी पहिल्या वर्षी दिले जाते.
- दुसऱ्या वर्षी ३०% रक्कम ही झाडांची जोपासना, खते आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी मिळते व यासाठी एक अट असते लावलेली किमान ९०% झाडे बागयतीसाठी किंवा ५०% झाडे कोरडवाहूसाठी जिवंत असावी लागतान.
- तिसऱ्या वर्षी देखील झाडे जगण्याचे प्रमाण वरीलप्रमाणेच टिकवून ठेवल्यास उर्वरित २०% अनुदान दिले जाते
२. फळपिकानुसार अंदाजित अनुदान मर्यादा
- आंबा (कलमी) ₹ १,५०,००० ते ₹ ४,००,००० पर्यंत (घनतानुसार)
- काजू ₹ १,२०,००० ते ₹ १,५०,०००
- पेरू ₹ १,७०,००० ते ₹ ३,५०,००० (अति सघन लागवड)
- डाळिंब ₹ २,००,००० ते ₹ २,२०,०००
- सीताफळ ₹ १,५०,००० ते ₹ १,७०,०००
- संत्रा / मोसंबी ₹ १,६०,००० ते ₹ १,८०,०००
- ड्रॅगन फ्रूट ₹ ६,००,००० ते ₹ ८,००,००० पर्यंत (पोल व इतर साहित्यासह)
कोणत्या फळपिकांसाठी योजना?
- आंबा
- डाळिंब
- पेरू
- संत्रा / मोसंबी
- लिंबू
- इतर फलोत्पादन पिके
पात्रता ( Eligibility )
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- किमान ०.१० हेक्टर ते कमाल १० हेक्टरपर्यंत.
- अल्प, अत्यल्प भूधारक, महिला, दिव्यांग आणि अनुसूचित जाती/जमाती मधील शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते
- जमीन शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर असावी. ७/१२ आणि ८-अ उतारा सादर करणे आवश्यक आहे
- जर जमीन संयुक्त कुटुंबाच्या नावावर असेल, तर इतर खातेदारांचे संमतीपत्र (NOC) लागते.
- फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच (Drip Irrigation) असणे अनिवार्य आहे. जर नसेल, तर तसे हमीपत्र द्यावे लागते की लागवडीसोबत ठिबकची व्यवस्था केली जाईल.
- फळबागीसाठी पाणी असणे आवश्यक आहे (विहीर, शेततळे)
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक ( आधाराशी लिंक असलेले पासबूक)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचा दाखला
- दिव्यांग प्रमाणपत्र (असेल तर)
- ठिबक सिंचन हमीपत्र
- अल्प/अत्यल्प भूधारक प्रमाणपत्र
- संमतीपत्र
- संयुक्त कुटुंब घोषणापत्र
- रोपे खरेदीची पावती
- विहीर/पाणी स्त्रोत नोंद
- ७/१२ उतारा ( फळबाग लागवड करणार असलेल्या क्षेत्राची नोंद असावी.)
- ८-अ उतारा
- चतु:सीमा नकाशा
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- सर्वात आधी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: mahadbt.maharashtra.gov.in
- आधार क्रमांक टाका व ‘युजर आयडी’ (User ID) व ‘पासवर्ड’ तयार करा.
- लॉगिन केल्यानंतर ‘अर्ज करा’ (Apply) या बटणावर क्लिक करा.
- फलोत्पादन पर्याय निवडा
- या विभागात ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ हा पर्याय निवडा
- तुमच्या जमिनीचा तपशील भरा
- तुम्हाला ज्या फळपिकाची लागवड करायची आहे, ते पीक निवडा
- लागवडीचे अंतर (Spacing) आणि क्षेत्र निवडा
- कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा
- फी भरल्यानंतर अर्जाची पोचपावती (Acknowledgement Receipt) डाऊनलोड करून जतन करून ठेवा .
सूचना ( Disclaimer )
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Fruit Orchard Plantation Scheme 2026 या अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
येथे गायगोठा अनुदान योजनेची अधीक माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/cowshed-subsidy-scheme-2026/