Mukhyamantri Tirth Darshan Scheme 2026 (मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना) ही योजना ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय ६० वर्ष किंवा ६० पेक्षा अधिक आहे यांना राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्श मिळावे म्हणून सहाय्य विभागामार्फत आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील एकून १३९ हून अधिक धार्मिक स्थळांचे दर्शन होणार आहे. या योजनेमध्ये प्रवास, भोजन, यहा- नाश्ता, राहण्यासाठी शासन प्रत्येक व्यक्ती साठी कमाल ३०,००० रुपये स्वतः करणार आहे. लाभार्थ्याचे वय ७५ पेक्षा जास्त असेल त्यांच्या मदतीस एक व्यक्ती सोबत ठेवण्याच्या अनुमती सरकारने दिली आहे परंतू त्या व्यक्ती चे वय २१ ते ५० असले पाहिजे. आपल्या भारत देशात ज्येष्ठ नागरिकांना देवाचे रूप मानले जाते.
या योजनेचा उद्देश काय?
Mukhyamantri Tirth Darshan Scheme 2026 (मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना) ही योजना सुरू करण्यासाठी मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- अनेक ज्येष्ठ नागरिकांना पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते परंतू पैसे नसतात, अधार नसतो, गरिबी मुळे ते इच्छा तशीच मनामध्ये राहते तेच इच्छा पूर्ण करण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना आपल पूर्ण आयुष्य कुटुंब एकजूट करण्यात, घर उभ करण्यात, घरची जिम्मेदारी असते यात स्वतः साठी वेळ च मिळत नाही अश्याच गोष्टींचा विचार करून शासनानी ही योजना सुरू केली आहे.
- ही योजना सर्व धर्मासाठी आहे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन त्यांच्या संबंधित पवित्र स्थळांना भेट देण्याची संधी या योजने द्वारे मिळते.
- अनेक ज्येष्ठ नागरिक व्योमानानुसार एकटेपणा येतो या योजनेमुळे अनेक लोकांसोबत प्रवास करण्याची संधी मिळते, नवीन ठिकाणे पहायला मिळतात मन शांत होते अशाप्रकारे आरोग्य सुधारते.
पात्रता
- अर्जदार हा ६० वर्ष किंवा ६०वून अधिक असावे लागते.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार शारिरिक दृष्टीने सक्षम असावा
- अर्जदाराला मोठा किंवा गंभीर आजार नसावा वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधा कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड किंवा जन्म दाखला
- रहिवासा प्रमाणपत्र ( अर्जदार हा महाराष्ट्रातील असावा)
- उत्पन्नाचा दाखला ( तहसीलदार ने दिलेला असावा)
- पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र( हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेच्या १५ दिवस आधीपर्यंतचे असावे).
- पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जदाराचा
- बॅक पासबुकची प्रत
- चालू असेलेला मोबई नंबर
- स्वयंघोषणा पत्र
- जर अर्जदाराचे वय ७५ पेक्षा अधीक आहे आणि त्याच्यासोबत त्यांची देखरेख करण्यासाठी जाणार असेल तर त्याचे आधार कार्ड, वयाचा पुरावा (२१ ते ५०) आणि वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागते.
अर्ज कसा भरावा
Mukhyamantri Tirth Darshan Scheme 2026 (मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना) या योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील माहिती पहा:
- सर्वात आधी या पोर्टलला भेट द्या: http://mahadbt.maharashtra.gov.in
- तुमचा चालू मोबाईल नंबर तिथे टाका नंतर OTP येईल लॉगिन करा.
- अर्जामध्ये नाव, पत्ता, वय, रेशनकार्ड नंबर हे सर्व अचूक भरा
- तीर्थक्षेत्राची निवड करा.
- कागदपत्रे अपलोड करा नमूद केलेले
- अर्ज सबमिट करा अश्या प्रकारे अर्ज पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
ज्यांना ऑनलाईन जनत नाही ते ऑफलाईन अर्ज भरू शकतात.
- तुमच्या तालुक्यातील तहसीलदा कार्यालय मधून किंवा ग्रामपंचायत/नहानगरपालिका या कार्यालयातून या योजनेच फॉर्म मोफत मिळवा.
- तुमची संपूर्ण माहिता त्या फॉर्म मध्ये अचूक भरा.
- कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा
- फॉर्म भरून झाल्यानंतर संबंधि सहाय्यक आयुक्त य कार्यालियात किंवा शसनान ठरवून दिलेल्य स्थानि केंद्रात जमा करा.
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन ऑफलाईन केलेल्या अर्जाची तपासनी केली जाते शासकीय अधिकाऱ्यांमार्फत.
- वय व सर्व कागदपत्रे तपासली जातात पात्र अर्जदारांची यादी तयार होते.
- या प्रक्रियेमध्ये ज्यांची निवड झाली आहे जो जेष्ठ नागरिक आहे त्यांना प्राधान्य दिल जाते
- नागरिकांची निवड झाली आहे हे तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर द्वारे कळवले जाते.
- नंतर प्रवासाचा तारीख, रेल्वे/ बसचे वेळापत्रक आणि इतर गोष्टीच्या सूचना दिल्या जातात.
महत्त्वाच्या सूचना
- प्रवासाला जाते वेळेस डॉक्टरांकडून मिळालेले प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate) मूळ प्रतीत जवळ असावे.
- जर तुम्हाला रक्तदाब( BP) , अस्थमा या सारखे आजार असतील तर त्याचे नियमित औषधे प्रवास संपे पर्यंत पुरावीत असे सोबत.
- प्रवासा दरम्यान लागणारी औषध स्वतः पाशी ठेवा.
- ओळखपत्र (आधार कार्ड)
- मोबईल आणि मोबईल चार्ज (मोबाइल हा फॉर्म मध्ये दिलेल्या नंबर चा असावा )
- शासनाकडून मिळालेले प्रवसाचे पास किंवा तिकीट सुरक्षित असावेत
- सोबत जास्त जड सामान घेऊन जाणे टाळा नंतर त्रास होईल अशा वस्तू टाळा
- तीर्थक्षेत्राचा हवमानाचा अंदाज घेऊन त्यानुसार कपडे सोबत ठेवा
- प्रवासात सोने चांदीच्या वस्तू किंवा मोठी रक्कम सोबत ठेवू नका चोरीला गेल्यास यास शासन जबाबदार राहणार नाही.
सूचना
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळ Mukhyamantri Tirth Darshan Scheme 2026 (मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
येथे तुम्ही सुकन्या समृद्धी योजना ची अधिक माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/sukanya-samriddhi-scheme-2026/