PM Awas Yojana Gramin 2026 (पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण) ही योजना केंद्र सरकारने ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी आणि गरीब, बेघर लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. अगोदर ही योजना मर्यादित काळासाठी होती परंतु आपल्या देशातील वाढती लोकसंख्या आणि अजूनही काही कुटुंब घरांपासून वंचित आहेत ही गोष्ट लक्षात घेता भारतातील सर्व कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे आणि सन्मानाने जगता यावे म्हणून वर्ष 2026 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. आता या योजनेमध्ये फक्त सिमेंट आणि विटांचे घर उभे करणे एवढेच नाही तर बदलत्या काळानुसार घरामध्ये बीज जोडणी, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छालय आणि एलपीजी गॅस कनेक्शन यांसारखे सर्व मूलभूत सुविधा छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान सुधारावे प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे सुरक्षित घर मिळावे हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेचा उद्देश:
PM Awas Yojana Gramin 2026 (पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण) या योजनेचा उद्देश केवळ गरिबांना घर बांधून देणे एवढाच नाही तर ग्रामीण भागातील सर्व वंचित कुटुंबांना एक सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेले स्वतःचे घर मिळवून देणे हा आहे. या योजनेचे प्रमुख उद्देशखालील प्रमाणे दिले आहेत:
- ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सर्व हवामानात टिकणारे पक्के घर बनवून देणे हा उद्देश आहे. कारण ग्रामीण भागातील लोक अजूनही बेघर आहेत किंवा मातीच्या, गवताच्या, कच्च्या राहत आहेत, परंतु हे सर्व कुटुंबांसाठी सोयचे नाही.
- लाभार्थ्याला केवळ चार भिंतीचे घर न देता त्या घरामध्ये सर्व सुखसुविधा (स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, मोफत वीज जोडणी, एलपीजी गॅस कनेक्शन) उपलब्ध करून देणे हा आहे.
- ग्रामीण भागातील सर्व महिलांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षासाठी घराची मालकी ही प्रामुख्याने कुटुंबातील महिलेच्या नावावर किंवा दोघे ही पती-पत्नीच्या संयुक्त नावावर दिली जाणार आहे.
- घर बांधकामाच्या प्रत्येक गोष्टींसाठी पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल करण्यात आली आहे, कारण या योजनेचा एकही रुपया बाया जाऊ नये.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगारांना संधीही निर्माण होते कारण घर बांधकामासाठी मजूर लागतात, मजुरीचे पैसे हेला भारताला मनरेगा (MGNREGA) अंतर्गत मिळतात.
- या योजनेमुळे लहान मुलांचे आणि महिलांचे आरोग्यविषयक समस्या कमी होतात कारण कच्च्या घरामध्ये राहिल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
अर्ज कोण करू शकतो?
PM Awas Yojana Gramin 2026 (पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण) या योजनेचा अर्ज कोण करू शकतो हे खाली प्रमाणे दिली आहे:
- ज्या कुटुंबाकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही.
- ज्या कुटुंबाकडे सध्या फक्त एक किंवा दोन भिंतीच्या खोल्या आहेत किंवा घर कच्चे आहे (ज्यांच्या भिंती आणि छप्पर माती, बांबू ,गवत किंवा प्लास्टिकचे आहे)
- ज्या घरात कमवता पुरुष नाही आणि कुटुंबाचा मुख्य कारभार ही महिला सांभाळते.
- अशा कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सदस्य दिव्यांग आहेत किंवा कमवणारी सक्षम व्यक्ती नाही.
- अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती अशा कुटुंबांना यात प्राधान्य दिले जाते.
- जे कुटुंबे नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेली आहेत.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड (कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे)
- मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड
- रेशन कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे त्यावरती असावीत)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) (तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असावी)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- बँक पासबुक (पासबुक च्या पहिल्या पानावरील स्पष्ट दिसत असलेली झेरॉक्स)
- जागेच्या पुरावासाठी ७/१२ उतारा, ८-अ चा उतारा किंवा ग्रामपंचायतीचा मालमत्ता पत्रक
- जागा स्वतःच्या नावावरून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे तर संमती पत्र असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार ज्या घरात राहतो त्या घराचा स्पष्ट फोटो.
- अर्जदाराचे पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- मनरेगा जॉब कार्ड (MGNREGA Job Card)
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र (असेल तर)
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
PM Awas Yojana Gramin 2026 (पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही दोन पद्धतीने असते ऑनलाईन आणि ऑफलाईन. अर्ज कसा करावा दोन्ही पद्धतीने खाली दिले आहे:
1. ऑनलाइन पद्धत :
- ऑनलाइन पद्धत :सर्वात अगोदर ग्रामीण किंवा सीएससी ऑपरेटर च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या pmayg.nic.in
- नवीन रजिस्ट्रेशन अंतर्गत अर्जदाराचा आधार नंबर टाकून पडताळणी केली जाते
- नंतर अर्जदाराची वैयक्तिक माहिती ( नाव, पत्ता, मोबाईल नंबर) बँक खात्याचे तपशील आणि मनरेगा जॉब कार्ड नंबर टाकला जातो
- सध्याचा तुमच्या कच्च्या घराचा फोटो अपलोड केला
- जातो
- अर्ज सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन आयडी जनरेट होतो जतन करून ठेवा
2. ऑफलाइन पद्धत :
- ऑफलाइन पद्धत : तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज मिळवा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती (नाव,पत्ता, कुटुंबाच्या तपशील आणि बँक खात्याचा तपशील) अचूक भरा
- सर्व आवश्यक के कागदपत्रे भरलेला अर्ज सोबत जोडा आणि तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकाकडे जमा करा
सूचना (Disclaimer)
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Awas Yojana Gramin 2026 (पंतप्रधान आवास योजना ग्रामीण) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
येथे तुम्ही भव्य योजना 2026 या योजनेची माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/bhavya-scheme-2026/