Bhavya Scheme 2026 (भव्य योजना) ही योजना महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनमार्फत नागरिकांच्या विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत अनुदान आणि विविध सुविधा नागरिकांना दिल्या जातात. या योजनेचा मोठा फायदा शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि बेरोजगार युवक यांना होऊ शकतो. आजच्या काळात जागतिक स्तरावर मोठा बहुराष्ट्रीय कंपन्या चीन देशाला पर्याय म्हणून इतर दुसऱ्या देशांमध्ये स्वतःचे उत्पादन केंद्र करण्यासाठी उत्सुक आहेत. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ आणि तरुण मनुष्यबळ या सर्व गोष्टी भारताकडे असल्यामुळे भारताला या जागतिक शर्यतीत आघाडी मिळवण्याची सर्वात मोठी संधी आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून, केंद्र सरकार आणि उद्योग मंत्रालयाने “भव्य योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
योजना कोणासाठी आहे?
Bhavya Scheme 2026 (भव्य योजना) ही योजना कोणासाठी आहे खालीलप्रमाणे आहे:
१. देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदार
भारतामध्ये नवीन कारखाने किंवा कंपन्या सुरु करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे.
या योजनेमुळे त्यांना जमीन खरेदी वीज पाणी आणि सरकारी परवानग्यांसाठी लागणाऱ्या वेळेची बचत आणि डायरेक्ट उत्पादन सुरू करता येईल.
२. MSMEs (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) आणि स्टार्टअप्स
या योजनेमध्ये “प्लग-एंड-प्ले’ (Plug-and-Play)” ही सुविधा असल्याने कमी खर्च आणि कमी जोखीम मध्ये छोट्या कंपन्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा भेटून जातील.
३. देशातील सुशिक्षित आणि कुशल तरुण (रोजगार शोधणारे)
पूर्ण देशात 100 नवीन औद्योगिक पार्क असल्यामुळे विनिर्माण (Manufacturing), लॉजिस्टिक्स, आणि सेवा क्षेत्रात लाखो रोजगारांची गरज पडणार, याचा फायदा देशातील तरुणांना होईल.
४. औद्योगिक कामगार आणि मजूर
या योजनेची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औद्योगिक पार्क्सच्या म्हणजेच कामगारांसाठी गृहनिर्माण आणि आणखी मूलभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे कामगारांचे जीवनमान सुधारेल.
चॅलेंज-बेस्ड (स्पर्धेच्या आधारावर) राज्यांची निवड होणार असल्यामुळे, ज्या राज्यात हे पार्क असेल त्या राज्यांचा आर्थिक विकास अत्यंत वेगाने होण्याची शक्यता आहे आणि राज्याचा महसूल देखील वाडेल.
मिळणारे अनुदान
Bhavya Scheme 2026 (भव्य योजना) या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून पार्क विकसित करण्यासाठी आर्थिक मदत आणि अनुदान दिले जाते.
- पायाभूत सुविधांसाठी प्रति एकर अनुदान: केंद्र सरकार औद्योगिक पार्कसाठी रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी प्रक्रिया आणि इतर सुविधा विकसित करण्यासाठी प्रति एकर १ कोटी आर्थिक अनुदान देणार आहे.
- बाह्य कनेक्टिव्हिटीसाठी अतिरिक्त अनुदान: देशातील मुख्य वाहतूक व्यवस्थेशी औद्योगिक पार्क हे जोडले असणे महत्त्वाचे आहे.
- म्हणून, हे पार्क जवळच्या राष्ट्रीय महामार्गाशी (National Highway), रेल्वे स्टेशनशी किंवा बंदराशी जोडण्यासाठी जो खर्च आला आहे त्या एकूण परियोजना खर्चाच्या 25% पर्यंत अतिरिक्त अनुदान केंद्र सरकार देणार आहे.
- डोंगराळ आणि दुर्गम राज्यांसाठी विशेष सवलत: अशा मोठ्या प्रकल्पांसाठी खूप मोठी जमीन असणे आवश्यक्य असते. आणि डोंगराळ राज्य आणि दुर्गम भागांमध्ये उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ एकर जमिनीवर पार्क उभा करण्यास सरकाराकडून मंजुरी दिली जाईल आणि त्याच्यासाठी निधी दिला जाईल.
- राज्यांना आणि खाजगी भागीदारांना निधी: या योजनेसाठी लागणारा एकूण बचत हा ३३,६६० कोटी इतका आहे. हा निधी राज्यांच्या औद्योगिक विकास मंडळांना मॉडेल अंतर्गत निवडल्या गेलेल्या खाजगी विकासाला दिला जाईल जनी करून ते जागतिक दर्जाचे पार्क उभा करू शकते.
- उद्योजकांसाठी अप्रत्यक्ष आर्थिक लाभ: हे अनुदान जर एखाद्या कंपनीच्या बँक खात्यात जमा होणार नसेल तर कंपन्यांना मिळणारे गाडी किंवा जमिनी अतिशय सवलीच्या दरात असतील आणि सर्व मंजुरी यांसह मिळून जातील.
अर्ज कोण करू शकतो?
Bhavya Scheme 2026 (भव्य योजना या योजनेचा अर्ज हा दोन भागांमध्ये विभागला आहे एक म्हणजे औद्योगिक पार्क तयार करणे आणि दुसरा भाग म्हणजे त्याच पार्क मध्ये उद्योग सुरू करणे.
औद्योगिक पार्क करण्यासाठी अर्ज कोण करू शकतो?
- विविध राज्यांतील औद्योगिक विकास मंडळ उदा. महाराष्ट्रातील MIDC, उत्तर प्रदेशातील UPSIDA इ.
- केंद्र किंवा राज्य सरकारच्या मालकीची कंपनी.
- सरकार सोबत काम करण्यास तयार आहेत अशा PPP (Public-Private Partnership) या मॉडेल अंतर्गत आणि मोठ्या खाजगी कंपन्या परंतु ह्या पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्या असाव्या.
औद्योगिक पार्क मध्ये स्वतःचा कारखाना किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कोण अर्ज करू शकते?
- जालना सरकारच्या मंजुऱ्यांच्या त्रासाशिवाय व्यवसाय सुरू करायचा आहे आणि छोटे उद्योग कमी भांडवलात करायचे आहेत.
- नवउद्योजक ज्यांच्याकडे नवीन कल्पना आहेत किंवा ज्यांना थेट उत्पादन करायचे आहे.
- भारतातील मोठे औद्योगिक गट जालना नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरु करावयाचे आहेत.
- जागतिक कंपन्या ज्यांना इंडिया (Make in India) अंतर्गत गुंतवणूक करून आपले उत्पादन केंद्र उभरायचे आहेत.
आवश्यक कागदपत्रे
Bhavya Scheme 2026 (भव्य योजना) या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिले आहेत:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट
- उद्यम नोंदणी प्रमाणपत्र
- जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र
- जर भागीदारी संस्था असेल तर Partnership Deed
- प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर (Certificate of Incorporation, MOA (Memorandum of Association) आणि AOA (Articles of Association))
- Bank Statement (बँकेचे गेल्या ६ महिन्यांचे अकाउंट स्टेटमेंट)
- कंपनीचा किंवा प्रवर्तकांचा Income Tax Returns
- सविस्तर प्रकल्प अहवाल (Detailed Project Report – DPR) : तुमचा व्यवसाय करणार आहेत किंवा उत्पादन करणार आहात.प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च. या उद्योगामुळे किती लोकांना रोजगार मिळेल याची माहिती.
- जागेची आवश्यकता दर्शवणारा आराखडा
- वीज आणि पाण्याची आवश्यकता
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- औद्योगिक पार्क उभारणीसाठी अर्ज
- उद्योजक आणि कंपन्यांसाठी अर्ज
औद्योगिक पार्क उभारणीसाठी अर्ज
- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या किंवा राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (NICDC) च्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या
- अर्ज करताना जमिनीची, उपलब्धता, प्रस्तावित आराखडा, अंदाजित खर्च, आणि बाह्य दळणवळणाची सुविधा या बद्दलची सविस्तर अहवाल सादर करावे लागते. https://www.nsws.gov.in
उद्योजक आणि कंपन्यांसाठी अर्ज
- केंद्र सरकारच्या ‘नॅशनल सिंगल विंडो सिस्टम’ (NSWS) किंवा संबंधित राज्याच्या औद्योगिक पोर्टलवर अर्ज करण्यासाठी भेट द्या: हा अर्ज ऑनलाईन असतो
- अर्जामध्ये उद्योजकाला आपल्या कंपनीची माहिती, उत्पन्नाचा प्रकार, आवश्यक जमीन किंवा गाळ्याचे क्षेत्रफळ, लागणारी वीज पाणी आणि अंदाजीत गुंतवणूक याच्याबद्दल ची सर्व माहिती द्यावी लागते.
- हा प्लग-एंड-प्ले मॉडेल असल्यामुळे, अर्ज मंजूर होताच उद्योजकाला सर्व सरकारी परवानग्यांसह (उदा. पर्यावरण मंजुरी, बांधकाम नकाशा मंजुरी) तयार भूखंड किंवा गाळ्याचा ताबा मिळतो
सूचना (Disclaimer)
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Bhavya Scheme 2026 (भव्य योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे मोफत दोन पायलेट प्रशिक्षण योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/free-drone-pilot-training-scheme-2026/