Free Drone Pilot Training Scheme 2026 (मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना) Best मार्गदर्शक (Apply Now)

Free Drone Pilot Training Scheme 2026 (मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना) या योजनेचा मुख्य हेतू शेतकरी कुटुंबातील आणि गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महागड्या असणारे ड्रोनचे प्रशिक्षण आता पूर्णपणे मोफत दिने जाणार आहे. ड्रोन हे आजच्या बदलत्या काळात अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे, एवढेच नव्हे तर ड्रोन हे कृषी क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी साधन म्हणून ओळखले जात आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन मोफत ड्रोन प्रशिक्षण घेऊन आपले भविष्य सुखाचे करावे कारण ग्रामीण आणि शहरी भागात ड्रोन पायलट ची मागणी मोठ्या भासू लागली आहे तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. ड्रोन मोफत प्रशिक्षण घेतल्यानंतर “नागरी विमानवाहतूक महासंचालनालय(DGCA)” याचा परवाना ( License ) मिळतो. या योजनेमुळे तरुण हे स्वावलंबी बनतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवीन गती मिळू शकते.

योजने चा उद्देश

Free Drone Pilot Training Scheme 2026 (मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना) न्याय योजनेचा उद्देशातील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे. या योजनेचे उद्देश खालील प्रमाणे आहेत:

  • ड्रोन क्षेत्रांमध्ये जास्त मागणी येत असल्याने सरकारने तरुणांना ड्रोन क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून त्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • साधारणता ड्रोण प्रशिक्षण घेणे सर्वसामान्य किंवा शेतकरी कुटुंबातील तरुणांना घेणे कठीण जातं कारण या प्रशिक्षण किंवा लायसन्स मिळवण्यासाठी १ ते दीड लाख रुपये पर्यंतचा खर्च येतो अडचण दूर करून पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देणे हा उद्देश आहे.
  • ड्रोन शेतीमध्ये वापरल्यानंतर उत्पादन खर्च कमी होतो, कारण कमी वेळामध्ये खत फवारणी किंवा कीटकनाशक फवारणी लवकर होते.
  • पाठीवर पंप घेऊन औषधी फवारणी करताना व्यक्तींना विषधाबा होण्याचा धोका असतो परंतु ड्रोन चा वापर करून फवारणी केल्यानंतर व्यक्तीचा संपर्क टळतो यामागील हा एक महत्त्वाचा उद्देश.
  • भारतामध्ये ड्रोन उडवण्यासाठी परवानगी म्हणजेच लायसन्स लागतो या योजनेमधून लायसन्स हे मोफत मिळवून देणे.
  • बेरोजगार असल्यामुळे तरुण कामासाठी शहराकडे स्थलांतर होत आहे म्हणून सरकारने तरुणांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

पात्रता (Eligibility)

  • अर्जदाराचे वय हे १८ ते ५५ वर्षे असावे
  • अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. (कृषी पदवी किंवा पदविका असणाऱ्या व्यक्तींना विशेष प्राधान्य दिले जाते)
  • अर्जदार च्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख पेक्षा कमी असावे
  • कर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे
  • अर्जदाराकडे मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे फिटनेस प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे
  • अर्जदाराकडे ड्रोन परवान्यासाठी भारतीय पासपोर्ट ( Valid Indian Passport) असणे अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

Free Drone Pilot Training Scheme 2026 (मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे:

  • वैद्य भारतीय पासपोर्ट (Valid Indian Passport) DGCA च्या नियमानुसार
  • उमेदवाराचे स्वतःचे आधार कार्ड (आधार कार्ड हे मोबाईल नंबर ची लिंक असणे आवश्यक आहे)
  • पॅन कार्ड (अर्जदार चा ओळखीचा आणि आर्थिक पुरावा म्हणून)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • 12 वी मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate – LC)
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Casre Certificate)
  • नॉन-क्रिमिलेअर (Non-Creamy Layer Certificate)
  • ई.डब्लू.एस. प्रमाणपत्र (EWS Certificate)
  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate)
  • बँक पासबुक (उमेदवाराचे स्वतःच्या नावाने बँक खाते असणे अनिवार्य आहे)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

Free Drone Pilot Training Scheme 2026 (मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना) या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना वेगवेगळ्या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो

खुल्या प्रवर्गासाठी (EWS): https://app.mahaamrut.org.in

मराठा / कुणबी प्रवर्गासाठी: https://sarthi-maharashtragov.in

OBC / VJNT / SBC प्रवर्गासाठी: https://mahajyoti.org.in

अनुसूचित जातीसाठी (SC): https://mahadbt.maharashtra.gov.in

  • वेबसाईट वरती मुख्य पेजवर “Notice Board” किंवा “Latest Advertisements” हा पर्याय निवडा
  • यानंतर Free Drone Pilot Training Scheme किंवा ड्रोन पायलट प्रशिक्षण अशी लिंक दिसूनील ते लिंक‌ उघडा
  • सर्वात अगोदर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि आधार नंबर टाका आणि रजिस्ट्रेशन करा
  • OTP ओटीपी येईल ओटीपी टाकून अकाउंट सुरक्षित करा
  • नोंदणी करून झाल्यानंतर लॉगिन करा आणि अर्जामधील खालील वैयक्तिक माहिती ही अचूक भरा:
  • वैयक्तिक माहिती ( स्वतःचे नाव, जन्मतारीख पत्ता, आणि चालू मोबाईल नंबर)
  • शैक्षणिक माहिती (10 वी व 12 वी किंवा पदवीचे गुण)
  • तुमच्या भारतीय पासपोर्टचा क्रमांक अचूक भरा
  • सांगितलेली आवश्यक कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करा. कागदपत्रे स्पष्ट दिसत नसतील तर अर्ज परत येऊ शकतो.
  • यानंतर “Preview” बटन दाबून सर्व माहिती आणि कागदपत्रे बरोबर आहेत का तपासा.
  • सर्व माहिती बरोबर असल्यास सबमिट करा. अर्ज पूर्णपणे सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट (Application PDF) आणि पोचपावती (Receipt) जतन करून ठेवा.

सूचना (Disclaimer)

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Free Drone Pilot Training Scheme 2026 (मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही “महाज्योती मोफत टॅब योजना” या योजनेची पूर्ण माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/mahajyoti-free-tablet-scheme-2026/