PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) शेतकऱ्यांसाठी Best संधी | (Apply Now)

PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान योजनेची सुरुवात केली आहे कारण शेतकऱ्यांचा विकास हा शेतीमधून जास्त प्रमाणात होतो, शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतामध्ये ऊर्जा आणि सिंचन व्यवस्था ही चांगली असायला हवी परंतु या व्यवस्थेमध्ये हिंदू स्त्रोतांवर अवलंबून राहिल्यामुळे सिंचनाचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो या गोष्टी लक्षात ठेवून केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकरी हा सिंचनाच्या खर्चापासून मुक्त होऊ शकतो. या योजनेचा आणखीन एक मोठा वापर होतो शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीचा वापर करून जमिनीपासून वीज उत्पादक म्हणून त्यांचे उत्पन्न वाढवते. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होतो.

या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ, योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि योजनेचे फायदे काय असणार आहेत याची सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये दिलेली आहे.

योजनेचे उद्देश

PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे दिलेले आहेत:

  • सिंचन खर्चात बचत : सध्या पंप हे डिझेलवर चालतात आणि सिंचनाचा खर्च वाढतो. हा खर्च कमी करण्यासाठी पंप हा सौर ऊर्जेवर चालला तर सिंचनाचा खर्च कमी होतो.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे : तुमच्या शेतातील पडीक जमीन तुम्हाला आता फायदा करून देणार आहे, म्हणजेच पडिक जमिनीवर सौर प्रकल्प उभा केला तर ते जमीन वीज देते आणि ते 20 तुम्ही सरकारी क्रेडीला विकू शकता यात सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो.
  • ऊर्जा सुरक्षा आणि स्वावलंबन : सौर ऊर्जा शेतामध्ये बसवल्यानंतर ग्रामीण भागातील वीज कधी जाणार नाही आणि वीज पुरवठा सुनिश्चित होतो, शेतकरी हा वीज वितरण कंपन्या वर अवलंबून न राहता स्वावलंबी बनतो.
  • पर्यावरण संरक्षण : सौर ऊर्जा चा वापर केला तर वातावरणामध्ये कार्बन उत्सर्जनात घटक निर्माण होतात आणि वातावरण प्रदूषण मुक्त झाल्यामुळे शेतीला प्रोत्साहन मिळते.
  • सौर कृषी पंप संचयन : ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वीज पोहोचू शकत नाही, यावर तोडगा म्हणून सौर पंपाचा वापर केल्याने अशा दुर्गम भागात ही सिंचन सोपे होते.
  • ग्रीडवरील भार कमी करणे : सरकारी ग्रीडवर कृषी क्षेत्रासाठी वीज लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ताण पडतो, परंतु जर स्थानिक पातळीवर सौर ऊर्जा निर्माण झाली तर हा ताण कमी होऊ शकतो.

पात्रता (Eligibility)

PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) या योजनेसाठी लागणारी पात्रता आणि काही नियम खालील प्रमाणे लिहिलेले आहेत:

  • अर्जदार हा भारतीय रहिवासी असावा आणि शेतकरी असावा.
  • अर्ज ताराकडे स्वतःची जमीन असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराकडे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी स्वतःची पडीक किंवा नापीक जमीन असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या तुमच्याकडे डिझेल पंप असणे किंवा तो वापरत असणे अनिवार्य आहे, असेल तरच या योजनेचा अर्ज तुम्हाला करता येऊ शकतो.
  • ज्या अर्जदाराकडे अधिक वीज कनेक्शन असलेले पंप आहे त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.
  • इतर राज्यांमध्ये सरकारी नोकरदार किंवा कर भरणारा व्यक्ती या योजनेचा अर्ज भरू शकतो.
  • अर्जदाराने इतर कोणतेही सोलार पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील दिलेली कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असलेले.
  • पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड
  • जमिन स्वतःच्या मालकीची आहे पटवण्यासाठी ​७/१२ उतारा (7/12 Extract)
  • ८-अ (8-A) प्रमाणपत्र (जमीन किती आहे तपासण्यासाठी)
  • जमिनीचा नकाशा
  • बँक पासबुक
  • जर तुम्ही कर्ज करण्यासाठी अर्ज करत असाल तर बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र
  • विज बिल (सध्याच्या पंपाचे असलेले कनेक्शन)
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • संमती पत्र

टीप : वरील सर्व कागदपत्रे चालू वर्षातील किंवा आत्ताच काढलेली असावीत. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करताना कागदपत्रे ही स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) या योजनांची अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने खालील प्रमाणे सविस्तर लिहिले आहे.

  • सर्वप्रथम PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलला भेट द्या kusum.mahaurja.com
  • तुमच्या स्क्रीनवर Beneficiary Registration किंवा नवीन अर्जदार नोंदणी यापैकी एक पर्यायी दिसेल त्यावर क्लिक करा.
  • तुमचा आधार नंबर आणि वैयक्तिक माहिती घरा व नोंदणी करा.
  • नोंदणी झाल्यानंतर Apply for PM-KUSUM या पर्यायावर क्लिक करा.
  • फोन मध्ये तुमची सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा.
  • माहिती भरून झाल्यानंतर कोणत्या घटकासाठी अर्ज करत आहेत हेही निवडा.
  • सांगितलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा, योग्य साईज मध्ये. यानंतर अर्जासाठी असलेली शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा. आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

टीप : जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या तालुका कृषी कार्यालयात (Taluka Agriculture Office) जाऊन संपर्क करू शकता

अनुदान

योजनेचा घटक (Component)केंद्र + राज्य अनुदान (Subsidy)शेतकऱ्याचा वाटा (Beneficiary Share)मुख्य उद्दिष्ट
घटक B (नवीन सोलर पंप)९०% ते ९५%५% ते १०%डिझेल पंप बदलून नवीन सोलर पंप बसवणे.
घटक C (पंप सौरीकरण)६०%४०%सध्याच्या इलेक्ट्रिक पंपांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपात रूपांतरित करणे.
  • अनुदान हे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा केले जाते. शेतकऱ्यांना फक्त स्वतःचा वाटा भरावा लागतो.
  • अनुदानाचे प्रमाण थोड्या प्रमाणात SC/ST प्रवर्ग आणि काही दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी जास्त असू शकते.
PM Kusum Yojana 2026 feature image
PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Kusum Yojana 2026 (पीएम कुसुम योजना 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे प्रधानमंत्री स्व निधी योजना 2026 याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-svanidhi-yojana-2026/