प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) सर्व नागरिकांसाठी Best आर्थिक मदत!

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) ही योजना भारत सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या अचानक समोर येणाऱ्या आर्थिक संकटामुळे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत असणार. फक्त वर्षाला तुम्ही ४३६ रुपये भरा आणि प्रीमियममध्ये २ लाख रुपये मिळवा. या योजनेचे खासियत हेच आहे की वर्षाला फक्त तुम्हाला ४३६ रुपये बँक मध्ये जमा करायचे आहेत. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे मृत्यूनंतर ही कुटुंबाला आर्थिक मदत देणे एखाद्या वेळेस कुटुंबाच्या कर्तव्य व्यक्तींचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला २ लाख पर्यंत आर्थिक मदत मिळते.

जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया कशी केली जाते? , अर्ज प्रक्रिया आणि अर्ज कोण करू शकत नाही? आणि कोण करू शकतो? याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.

योजनेचा उद्देश

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे दिले आहेत:

  • भारतातील ग्रामीण भागातील आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना जास्त महागडे आयुर्विमा कवच घेणे शक्य नाही. यामुळे भारत सरकारने या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेअंतर्गत सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
  • एखाद्या वेळेस दुर्भाग्याने कुटुंबातील कर्तव्य तिचा मृत्यू झालास कुटुंबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट येते. आशा कठीण काळामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेअंतर्गत कुटुंबांना भारत सरकार द्वारे २ लाख रुपयांची आर्थिक मदत देतो.
  • नागरिक अनेकदा विमा कडे गुंतवणूक करणे म्हणूनच पाहतात आणि त्यातील सुरक्षेचे दुर्लक्ष करतात. गुंतवणूक याच्याकडे दुर्लक्ष करून सुरक्षा याच्याकडे लक्ष केंद्रित करावे, नागरिकांना कमी प्रीमियम मध्ये मोठी सुरक्षा कशी मिळू शकते, याची जाणीव सर्व नागरिकांना या योजनेद्वारे सांगणे हा प्रमुख उद्देश आहे.
  • जनधन खात्याची ही योजना जोडली गेली आहे. नागरिकांच्या बँक खात्याशी प्रॉपर फक्त पैशांच्या देऊन घेवाण साठी न करता, नागरिकांपर्यंत भारत सरकारने विविध सरकारी सुरक्षा योजना सुरू केले आहेत त्या सर्व नागरिकापर्यंत पोहोचवणे, आणि बँक व्यवस्थेवर सर्व नागरिकांचा विश्वास वाढवणे हा या योजनेचा हेतू आहे.
  • अनेक नागरिक कागदांची कटकट नको म्हणून विमा घ्यायचे टाळतात, परंतु ही योजना पूर्णपणे कागदमुक्त आणि ऑटो डेबिट द्वारे चालणारी आहे, यामुळे कोणतीही कटकट न ठेवता नागरिकांना सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

अर्ज कोण करू शकतो ? (Eligibility)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) या योजनेसाठी लागणारी पात्रता आणि नियम खालील प्रमाणे सविस्तर दिले आहेत.

  • अर्जदार व्यक्तीचे वय १८ वर्षे ते ५० वर्षे दरम्यान असावी.
  • या योजनेमध्ये वार्षिक नूतनीकरण वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत करता येते.
  • अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे कोणतेही बँक मध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे.
  • कारण या योजनेअंतर्गत मिळणारी प्रीमियमची रक्कम बँक खात्यामधून ऑटो डेबिट पद्धतीने कापण्यात येते.
  • दर्शनाची स्वतःचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करताना आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरण्यात येते यामुळे खाते केवायसी पूर्ण असावे लागते.
  • एक व्यक्ती एकाच बँक खाते द्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • अर्जदाराला बँकेला ऑटोमॅटिक सुविधेसाठी लेखी संमती देणे अनिवार्य असते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराकडे खालील दिलेली कागदपत्रे असणे फायदेशीर ठरते.

  • आधार कार्ड (बँक खात्याशी यांनी मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे)
  • बँक पासबुक
  • नोंदणी फॉर्म (Consent Form)
  • स्वयं-घोषणापत्र (Self-declaration)

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) या योजनेची अर्थ प्रक्रिया आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येते. याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

ऑफलाइन बँकेत प्रत्यक्ष जाऊन.

  • तुम्ही बँक मध्ये जाऊन प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना या योजनेचा फ्रॉम किंवा अर्ज तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळवा.
  • फोन मध्ये तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती ( नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर) खाते तपशील आणि वारस्ताराचे नाव त्याची सर्व माहिती अचूक भरा.
  • तुम्ही बँकेला तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम कापण्याची परवानगी देणार आहेत यासाठी फॉर्म सोबतच डेबिट साठीची संमती पत्र द्या.
  • फॉर्म सोबत सांगितलेली कागदपत्रे जोडा आणि बँक मधील अधिकाऱ्यांकडे फॉर्म आणि कागदपत्रे द्या. फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळेल ते जपून ठेवा.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्ही या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या किंवा बँकेच्या अधिकृत ॲप ला भेट द्या. jansuraksha.gov.in
  • तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
  • यानंतर Insurance’ किंवा ‘Government Schemes’ किंवा ‘Social Security Schemes अशी तीन पर्याय दिसतील यापैकी एक निवडा.
  • यानंतर PMJJBY (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) हा पर्याय निवडा.
  • तुमचे खाते निवडा, नॉमिनीची माहिती भरा आणि अर्ज सबमिट करायच्या आधी सर्व माहिती अचूक आहे का तपासा आणि सबमिट करून द्या. पीडीएफ जतन करून ठेवा.

मिळणारे फायदे (Benefits)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे खालील प्रमाणे सविस्तर दिली आहेत.

  • योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला २ लाख पर्यंत रुपये मिळतात.
  • वर्षाला फक्त तुम्हाला ४३६ रुपये प्रीमियम मध्ये भरावे लागतात विमा संरक्षण मिळून जाते. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असा स्वस्त विमा आहे.
  • या योजनेसाठी कुठल्याही प्रकारचे आरोग्य तपासणी किंवा वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही.
  • या योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी कागदासाठी कटकट करण्याची गरज नाही.
  • या योजनेअंतर्गत एकदा ऑटो डेबिट नोंदणी केल्यानंतर स्वतः बँकमध्ये जाऊन गुंतवणूक करायची गरज नाही. ४३६ रुपये आपोआप तुमच्या बँक खात्यामधून बँक कापून घेते.
  • योजनेसाठी भरलेला प्रीमियम आणि मिळणारी विमा रक्कम, इन्कम टॅक्स नियमानुसार कर सवलती मध्ये पात्र असू शकते.
  • कुटुंबातील कर्तव्य व्यक्तींचा निधन झाला तर कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण होते अशा वेळी ही विमा रक्कम कुटुंबाचा आधार बनू शकते.
PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026 feature image
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) सर्व नागरिकांसाठी भारत सरकार द्वारे आर्थिक मदत!

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Bima Yojana 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2026 याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-suraksha-bima-yojana-2026/