शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026) शेतामध्ये अपघात झाल्यानंतर कुटुंबाला मिळणार अनुदान तेही लवकरात लवकर! Best मार्गदर्शन

शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026) महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करताना जीवघेण्या अपघातांना समोरे जावे लागते, अशा गंभीर स्थिती शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली. ही योजना पूर्णपणे सानुग्रह अनुदान द्वारे राबवण्यात आली आहे, अगोदरच्या काळी विमा कंपन्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या क्लिष्ट प्रक्रियेतून बाहेर पडली आहे.

Farmer Accident Insurance Scheme 2026 :- एखाद्या वेळेस दुर्दैवी अपघात झाला तर अशा संकटाच्या वेळी कुटुंबाचा अंतर हरवण्याची भीती असते या अनपेक्षित संकटाशी सामना करण्यासाठी निषेध करांना पाठिंबा देण्यासाठी या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभा आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारे पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, अनुदान आणि अर्ज प्रक्रिया याची सर्व सविस्तर माहिती खालील लेखकामध्ये पाहू शकता.

योजनेचा उद्देश

शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026) योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे दिले आहेत :

  • संकटकाळात आर्थिक आधार देणे : शेतामध्ये काम करत असताना अनेकदा वीज पडणे, सर्पदंश, पाण्यात बुडणे किंवा यंत्र मधील बिघाडामुळे गंभीर अपघात होणे अशा दुर्दैवी काळामध्ये जर कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला किंवा कायमचे अपंग झाले तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • शेतकरी कुटुंबाला विम्याचे संरक्षण : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करून देणे यामुळे अपघातांच्या भीषण प्रसंगातून कुटुंबाला मोठा आर्थिक संकटांवर पडावे लागत नाही आणि त्यांना तातडीने मदत मिळवून देणे.
  • कागदपत्रांची आणि प्रक्रियेची सुलभता : अगोदरच्या काळामध्ये विमा योजनेमध्ये विमा कंपनीच्या क्लिष्ट कठीण मुळे रक्कम मिळण्यामध्ये अनेक दिवस लागत असे. या योजनेचा एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सानुग्रह अनुदान म्हणजेच लवकरात लवकर मदत देणे ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि लवकर करणे जेणेकरून कुटुंबाला वेळेमध्ये मदत मिळेल.
  • कुटुंबाचे मनोबल वाढवणे : शेतकरी हा शेतामध्ये काम करणारा एक योद्धा आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित आहे ही भावना त्याच्या मनामध्ये रुजवली आणि शेती व्यवसायातील धोक्याविषयी त्याला एक प्रकारची सुरक्षेची हमी देणे योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

पात्रता (Eligibility)

शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026) या योजनेसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे:

  • अर्जुनधार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराच्या नावावर ७/१२ उतारा असावा लागतो तरच तो या योजनेसाठी पात्र ठरतो.
  • खातेदार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतो. या योजनेचा लाभ इचे कुटुंबातील अनेक सदस्य घेऊ शकत नाहीत.
  • 10 ते 75 वर्ष या वयोमर्यादामधील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • अपघातांचे प्रकार : सर्पदंश, विंचू दंश, वीज पडणे, पाण्यात बुडणे, विजेचा शॉक लागणे, उंचावरून पडून मृत्यू किंवा अपंग होणे, शेतीचे काम करताना यंत्रणा मुळे होणारे भीषण अपघात आणि नक्षलवाद्यांकडून झालेली हिंसा, दंगल किंवा तत्सम घटना इत्यादी अपघात झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेचा नियम असा आहे की एका कुटुंबामध्ये एकूण दोन व्यक्ती या योजनेच्या कक्षेमध्ये येतात.
  • लक्षात घ्या आत्महत्यासारख्या स्वतःहून केलेल्या कृतीमुळे किंवा नशेमध्ये असताना झालेल्या अपघातांमुळे मृत्यू झाला तर या योजनेचा लाभ तशा व्यक्तींना भेटू शकत नाही.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे खालील दिलेली कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • अर्ज हा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी असलेला असावा.
  • अर्जदाराच्या नामावर ७/१२ उतारा आणि ८-अ चा उतारा
  • अर्जदाराच्या वारसदारांची नावे स्पष्ट करण्यासाठी ७/१२ वरील वारस नोंदणीचा पुरावा असणे अनिवार्य आहे.
  • अपघाती मृत्यू झाला असेल तर अधिकृत मृत्यू दाखला.
  • अपघाताची नोंद पोलिसात केल्याचा प्रथम माहिती अहवाल आणि घटनास्थळाचा पंचनामा केलेला असावा.
  • मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट असणे अनिवार्य आहे पण ते मूळ अहवाल असावे.
  • अपघाती मृत्यू झाल्यास व्यक्तीचे वय बघण्यासाठी आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
  • वारसदारांच्या बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायाप्रत.
  • अर्जदाराचे आधार कार्ड आणि मृत्यू व्यक्तीचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • अपघात झाल्यानंतर व्यक्ती अपंग झाला असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • अपघात झाल्यानंतर पुढील 45 दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करणे अनिवार्य आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • कागदपत्रांची तपासणी करताना मूळ कृती पडताळणीसाठी सोबत ठेवा.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे समजेल अशी सोप्या भाषेमध्ये देण्यात आली आहे.

  • अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम स्थानिक तलाठी, ग्रामसेवक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये त्वरित भेट द्या आणि अपघाताची बातमी मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा तुम्हाला पुढील प्रक्रियेत मदत करू शकतो.
  • वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडा आणि ही कागदपत्रे (FIR, पंचनामा, मृत्यू दाखला, ७/१२) अपघाताच्या घटनेच्या पुराव्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात.
  • सर्व कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये जमा करा.
  • यानंतर तुम्हाला तिथे या योजनेचा अधिकृत दावा अर्ज मिळतो काळजीपूर्वक आणि अचूक करा त्यावर वारसदारांची स्वाक्षरी असणे अनिवार्य असते.
  • तुम्ही जमा केलेल्या अर्जाची आणि कागदपत्राची तपासणी करून तालुका स्तरावरील समिती द्वारे करण्यात येते.
  • सर्व कागदपत्रे अचूक असल्यास, प्रस्ताव पुढील मंजुरी साठी जिल्हास पदावर पाठवण्यात येतो.
  • हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, शासन थेट पात्र वारसदारांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करतो.
  • या योजनेची वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी समोरील लिंक पहावी https://krishi.maharashtra.gov.in/
Farmer Accident Insurance Scheme 2026 feaute image
Farmer Accident Insurance Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme 2026)या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे राज्य कृषी यंत्रिकीकरण योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/agricultural-mechanization-scheme/