राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) जर तुम्ही ही एक शेतकरी आहात, आणि तुम्हाला नवीन यंत्र घेणे परवडत नाही तर ही योजना तुमच्यासाठी आहे! भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ग्रामीण भागातील सर्व नागरिक शेतीवर अवलंबून असतात परंतु बदलत्या काळामुळे शेतीचे स्वरूप आता आधुनिकतेकडे झुकत आहे. शेती शाश्वत होण्यासाठी कष्टा सोबतच योग्य तंत्रज्ञानाची जोड लावावी लागते. परंतु शेतामध्ये वापरले जाणारे सर्व आधुनिक यंत्रे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी घेणे हे कठीण आहे. ही गोष्ट लक्षात घेता सरकारने राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेची सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली शेती मिळवण्यासाठी आधुनिक तंत्र मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेमुळे फक्त यंत्रसामग्रीची उपलब्धता पुरेशी झाली नाही, तर शेतीचे उत्पादन खर्च कमी करण्याचा मार्गही मोकळा केला आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यासाठी तुम्हाला पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची माहिती हवी असते हीच माहिती खालील लेखांमध्ये तुम्ही पाहू शकता:
योजनेचा उद्देश
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) या योजने मागचा उद्देश काय आहे याची माहिती खालील लेखकामध्ये पाहू शकता:
- मजुरांवरील अवलंबित्व कमी करणे : शेतामधील कामासाठी मजुरांची टंचाई आणि मजुरीसाठी वाढणारा खर्च यामुळे शेती परवडत नाही. मजुरीच्या येवजी तंत्रज्ञानाचा वापर जर शेतीमध्ये आला तरीही अडचण तर होते आणि पैशांची बचत होते.
- शेतीचे काम वेळेत पूर्ण करणे : अगोदरच्या काळातील पद्धतीपेक्षा यंत्रांचा वापर करून शेतामधील कामे नांगरणी, पेरणी, फवारणी आणि काढणीचे काम यासाठी जास्त वेळ न लागता वेगाने होते आणि अचूक होतात.
- उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवणे : व्यक्तींच्या क्षमा पेक्षा यंत्रांचा वापर जास्त कार्यक्षम असतो. हे डिझेल वर किंवा विजेवर चालणारी यंत्रे जास्त काम करतात तेही कमी वेळामध्ये, यामुळे पिकाचा संपूर्ण उत्पादन खर्च घटतो आणि शेतकऱ्यांच्या हातात अगोदर पेक्षा जास्त नफा राहतो.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार : शेतामध्ये फक्त पारंपारिक अवजारांचा वापर न करता, त्यासोबतच नवीन यंत्रणांची जोड लावली तर शेतीचा दर्जा सुधारतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक आधार देणे आणि त्यांना जागतिक दर्जाच्या शेतीकडे वळवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- शेतकरी सक्षमीकरण : ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी अजून एक यंत्र घेता यावेत आणि यासाठी अनुदान देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये प्रगत शेतकऱ्यांच्या बरोबरीने घेऊन येणे.
पात्रता व नियम (Eligibility and Rules)
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) या योजनेसाठी लागणारी पात्रता आणि नियम याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- सर्वात महत्त्वाचे अर्जदारा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेत जमीन असणे अनिवार्य आहे.
- महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे.
- शेतकऱ्यांनी यापूर्वी आशा यंत्रांसाठी योजनेचा लाभ घेतलेला नसावा, घेतला असेल तर त्याला पुन्हा त्याच यंत्रासाठी ठराविक कालावधी पर्यंत अनुदान मिळत नाही.
नियम व अटी :
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल द्वारे केलेले अर्ज स्वीकारले जाऊ शकते.
- या योजनेचा लाभ म्हणजेच यंत्र खरेदी करण्याअगोदर पोर्टल लॉटरी लागणे आणि विभागाकडून पूर्व संमतीपत्र मिळणे अनिवार्य असते.
- शेतकऱ्यांना जे यंत्र खरेदी करायचे आहेत ते सरकारमान्य किंवा BIS (Bureau of Indian Standards) प्रमाणित असणे अनिवार्य आहे.
- या यंत्राची खरेदी फक्त शासनमान्य विक्रेत्यांकडून करणे अनिवार्य आहे.
- खरेदी केल्यानंतर बिल्स, यंत्रांचे फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेमध्ये पोर्टलवर अपलोड करून देणे बंधनकारक आहे.
- या अनुदानाची रक्कम कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाशिवाय लाभार्थ्याच्या अंधार लिंग असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. यामुळे तुमचा आधार नंबर हा बँक खात्याशी संलग्न असणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी अर्जदाराकडे असणे अनिवार्य आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.
- ७/१२ (सातबारा) उतारा (जमिनीच्या मालकीचा दाखवणारा पुरावा)
- ८-अ चा उतारा (जमिनीची माहिती दर्शवणारा उतारा)
- बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत
- नोंद : तुमचे बँक खाते हे आधार कार्डा सोबत लिंक असणे अनिवार्य आहे कारण अनुदानाची रक्कम आधार कार्डच्या बँक खात्याशी लिंक आहे त्याच खात्यावर रक्कम पडते.
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) या योजनेची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते महाडीबीटी द्वारे भरलेला अर्ज ग्राह्य धरला जातो.
- सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या mahadbt.maharashtra.gov.in
- यानंतर नवीन अर्जदार नोंदणी (New Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करा
- तुमचं नाव आणि आधार नंबर टाकून नोंदणी करून घ्या नोंदणी केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मेल किंवा तयार करावा लागेल.
- पासवर्ड आणि युजरनेमचा वापर करून लॉगीन करून घ्या.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि बँक तपशील काळजीपूर्वक भरा. अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही यामुळे माहिती भरताना अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
- यानंतर पोर्टल वरील कृषी विभाग या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या योजनेची निवड करा आणि तुम्हाला ज्या यंत्रासाठी अनुदान हवे आहे त्याची निवड करून घ्या.
- त्यानंतर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- यानंतर अर्जाची छाननी कृषी विभागामार्फत केली जाते.
अर्जनंतर ची प्रक्रिया
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) :-
- अर्जाची संख्या जास्त असेल तर लाभारतीची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येते.
- निवड झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत पोर्टल वारे किंवा एसएमएस द्वारे पूर्वसंमतीपत्र मिळते.
- हे पत्र मिळायला शिकाय कुठल्याही प्रकारची खरेदी करू नका खरेदी केल्यानंतर अनुदान मिळत नाही.
- पूर्वसंमती मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेता कडून यंत्र खरेदी करून घ्या परंतु विक्रेता हा शासनमान्य विक्रेता असावा लागतो.
- खरेदी करून झाल्यानंतर खरेदीचे बिल आणि यंत्रणा चे फोटो अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी लागतात.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “संजय गांधी निराधार योजना 2026″ योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/sanjay-gandhi-niradhar-subsidy-scheme/