संजय गांधी निराधार योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेची सुरुवात राज्यातील दुर्बल घटकाला विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी केली आहे. योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागामार्फत करण्यात आली आहे. समाजामध्ये अनेक घटक स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी असमर्थ असतात. अशाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना जगण्यासाठी आधाराची गरज असते, यासाठी आणि समाजात सर्प व्यक्तींना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे.
या योजनेमुळे शारीरिक व मानसिक अपंगत्व, कौटुंबिक संकटे, अनाथपणा, दुर्धर आजार अशा व्यक्तींच्या कमीत कमी मूलभूत गरजा पूर्ण भारत किंमतांना जगण्याची उमेद मिळावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया त्याची संपूर्ण माहिती खालील लेखांमध्ये दिली आहे.
योजनेचा उद्देश
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेची स्थापना समाजातील उपेक्षित घटकांना प्रमुख प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे पाहू शकता:
- आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षा : अशा व्यक्तींना ज्यांना शारीरिक आणि सामाजिक कारणामुळे स्वतःचा उदरनिर्वाह करता येत नाही, अशा व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे.
- गरीबी निर्मूलन : अल्प उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आवश्यक मूलभूत गरजा पुरवणे आणि त्यांना गरीबीच्या गर्दीतून काढण्याचा प्रयत्न करणे.
- सामाजिक सन्मान : निराधार व्यक्तींना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यासाठी त्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणे.
- दुर्बल घटकांचे संरक्षण : वृद्ध, विधवा, अनाथ, अपंग आणि गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींचे संरक्षण करणे यामुळे त्यांना वेळेवर उपचार आणि पोषण मिळू शकेल असे कामे करणे.
- सामाजिक समतोल राखणे : समाजामध्ये वाढत असलेली आर्थिक देरी कमी करण्यासाठी आणि दुर्बल घटकांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी त्यांना मदतीचा हात देणे.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे फायदेशीर ठरते.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- उत्पन्न दाखला (Income Certificate)
- बँक तपशील
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- अपंग असेल तर : जिल्हा शल्य चिकित्सकांचे ४०% अपंग असलेले प्रमाणपत्र
- महिला विधवा असेल तर : पतीचा मृत्यू दाखला असणे अनिवार्य आहे.
- दुर्धर आजारग्रस्त : शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांकडून मिळालेले प्रमाणपत्र ज्यामध्ये आजार असल्याचे लिहिलेले आहे.
- अनाथ मुले : अनाथालयाचे प्रमाणपत्र किंवा आई-वडील नसलेले मृत्यू दाखला
- शेतकरी आत्महत्या : नृत्य शेतकऱ्याचा वारसदार असलेला प्रमाणपत्र तहसीलदारांनी मिळालेली
- ३५ वर्षावरील अविवाहित महिला : वयाचा दाखला म्हणजे शाळा सोडलेला दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र.
पात्रता (Eligibility)
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोण पात्र ठरवू शकतो?
- अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्ष या दरम्यान असणे अनिवार्य आहे. (दिव्यांग व्यक्तीसाठी वयाची अट शितल असेल).
- कर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- औरंगाबादचे वार्षिक उत्पन्न हे २१,००० इतकी असावी किंवा यापेक्षा कमी.
- ज्या व्यक्तींना स्वतःचा उदरनिर्वाह करणे कठीण जाते.
- दिव्यांग ४०% अपंगत्व व्यक्ती आहे.
- महिला विधवा, घटस्फोटीत, अत्याचारित महिला, देवदासी आणि वेश्याव्यवसायातून मुक्त झाली आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
- दुर्धर आजार असलेले व्यक्ती
- अनाथ मुले किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंब, आणि 35 वर्षांवरील अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अनुदान
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी अनुदान हे खालील प्रमाणे दिले आहे.
| तपशील | आर्थिक लाभ (दरमहा) |
| अनुदान रक्कम | १,५०० रुपये |
| वितरण पद्धत | डायरेक्ट ला भारताच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल (DBT – Direct Benefit Transfer) |
| कालावधी | लाभार्थी जो परंत पात्र आहे तोपर्यंत अनुदान मिळत राहील (दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असू शकते) |
| प्रक्रिया | सर्वप्रथम अर्जाची चरणी केली जाते यानंतर मंजुरीनंतर अनुदान खात्यामध्ये जमा केले जाते. |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेचे अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:
- सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
- जर तुम्ही नवीन असाल तर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार तपशील भरा नोंदणी करून घ्या.
- नोंदणी झाल्यानंतर तू मला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- त्यानंतर तुम्ही सेवा विभागांमध्ये जावा आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग निवडा. तो विभाग निवडल्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेची निवड करा.
- यानंतर अर्ज उघडेल अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, उत्पन्न तपशील आणि बँक तपशील) अचूकपणे भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती पासून अचूक असल्याची खात्री करून घ्या.
- माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल तो जपून ठेवा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- तुम्ही तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट द्या.
- संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी नमुना अर्ज मिळवा.
- अर्जामधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्जासोबत वरील सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी जोडा. (आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, प्रवर्गानुसार आवश्यक प्रमाणपत्रे, इत्यादी)
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर कागदपत्रे तुमच्या भागातील तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती लक्ष करून घ्या. पोचपावती ही भविष्यात कामासाठी येऊ शकते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 (Sanjay Gandhi Niradhar Subsidy Scheme) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/cm-youth-intership-traning-scheme-2026/