Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme – राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना 2026 | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! Best मार्गदर्शन

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना 2026 (Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026) ही योजना महाराष्ट्रातील उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता खर्च महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली.

Rajarshi Shahu Maharaj Education:- ही योजना खास करून खुल्याचा प्रवर्गातील (EBC) विद्यार्थ्यांसाठी बरदान ठरली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणामध्ये कुठलाही प्रकारचा खंड पडू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे.

जर तुम्ही एक विद्यार्थी आहात ही संधी तुमच्यासाठी चालू झाली आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, मिळणारा लाभ, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची सविस्तर माहिती खालील लेखकामध्ये पाहू शकता:

योजनेचा उद्देश

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे दिले आहे.

  • शिक्षणाचा समतोल साधणे : आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षणाची समान संधी मिळवून देणे.
  • ​आर्थिक भार कमी करणे : वाढत्या महागाईमुळे व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे शुल्क अधिक असते परवडत नसते. यामुळे पालकांवरील अर्थिक बोज कमी करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यास मदत करणे.
  • गळती रोखणे (Dropout Prevention) : पैसे नसतात म्हणून घोषित विद्यार्थी अर्धवट शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी आणि त्यांना पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बळ देणे.
  • शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन : शिक्षण घेण्याबाबतचे आर्थिक अडथळे नाहीसे झाल्यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासामध्ये आणि नवनवीन कौशल्य शिकण्या मध्ये लक्ष केंद्रित करू शकतील यामुळे राज्यातील एकूण शैक्षणिक गुणवत्ता वाढू शकते.
  • उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढविणे : तांत्रिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवणे आणि राज्यातील कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी या योजनेचे सुरुवात केली.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे खालील शैक्षणिक पात्रता असेल तरच तो पात्र ठरू शकतो.

  • विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी CAP (Centralized Admission Process) प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शासकीय, विनाअनुदानित व्यवसायिक शिक्षण किंवा शासन अनुदानित शिक्षण या संस्थेमध्ये प्रवेश घेतला असावा.
  • विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमधील हजेरी कमीत कमी 75% असणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी असावा दुसरे पार्ट टाइम जॉब करत नसावा.
  • मागील वर्षाच्या शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण असले अनिवार्य आहे.
  • विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी आपल्या प्रवर्गातील असावा लागतो.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
  • एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन विद्यार्थी योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
  • विद्यार्थी जर भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती किंवा इतर कोणत्या शिक्षण सवलतीत असेल तर त्या विद्यार्थ्याला एकाच शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026) योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी असणे फायदेशीर ठरू शकते.

  • आधार कार्ड (आधार कार्ड हे विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • प्रवेश पावती (Admission Receipt)
  • CAP अलॉटमेंट लेटर (CAP Allotment Letter)
  • मागील वर्षातील सर्व वर्षाच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र (१०, १२ वी)
  • बोनाफाईड सर्टिफिकेट (Bonafide Certificate)
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  • प्रवर्ग प्रमाणपत्र (Category Certificate)
  • बँक तपशील
  • शपथपत्र / घोषणापत्र (Affidavit/Declaration)
  • गॅप सर्टिफिकेट (जर शिक्षणामध्ये खंड असेल तर)

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026) या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता :

  • सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या mhadbt.com
  • जर तुम्ही नवीन वापर करता असाल तर New Applicant Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • नोंदणी करण्यासाठी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. नोंदणी झाल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड मिळेल.
  • युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, उत्पन्नाचे तपशील आणि बँक तपशील याची सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • प्रोफाइल संपूर्ण भरून झाल्यानंतर सर्व योजना या विभागामध्ये जा. यानंतर तिथे Directorate of Higher Education किंवा तुमच्या शिक्षणानुसार Directorate of Technical Education या पर्यायाची निवड करा. त्याची यादी मधून राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेचे नाव शोधा आणि अप्लाय या बटनवर क्लिक करा.
  • निघून झाल्यानंतर अर्जा मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेज म्हणजेच महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रम, प्रवेशाचा प्रकार, शैक्षणिक वर्ष, भरलेली फी आणि इतर संबंधित माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे.
  • त्यानंतर नमूद केलेली सर्व कागदपत्र योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदाचा पासा सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. यानंतर जर असेल तर अर्ज शुल्क भरा.
  • सबमिट या बटनवर क्लिक करा. अर्ज यशस्वी पूर्ण सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन आयडी मिळेल ते जपून ठेवा.
  • ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर तुमच्या अर्जाची हार्ट कॉफी आणि अर्ज भरण्यासाठी जेवढे कागदपत्रे लागली होती ते सगळी कागदपत्रे कॉलेजमध्ये जमा करा. कॉलेजमध्ये सर्व कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे त्याशिवाय या योजनेचा लाभ भेटू शकणार नाही.
Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026 feature image
Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना (Rajarshi Shahu Maharaj Education Fee Reimbursement Scheme 2026)या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “पॉलिहाऊस योजना 2026 ” योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/polyhouse-scheme-2026/