तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी| Best मार्गदर्शन

तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026) ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षा कृषी योजनेची एक मानली जाते. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होते आणि वाढत्या वन्यजीव मानव संघर्षामुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात केली. या योजनेमुळे फक्त पिकांचे रक्षण होत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचे उत्पादन सुरक्षित राहते. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शेतातील पिके सुरक्षित राहावे असा दृष्टिकोन असतो परंतु वन्य प्राण्यामुळे पिकांचे नुकसान होत असते परंतु आता काळजी मिटली कारण महाराष्ट्र शासन घेऊन आले आहे “तार कंपनी योजना”.

जर तुम्हालाही वाटते आपल्या शेतातील पिके सुरक्षित राहावे तर या योजनेचा अर्ज लवकरात लवकर भरून घ्या. या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया सर्व गोष्टींचे मार्गदर्शन खालील प्रमाणे करण्यात आले आहे.

योजनेचा उद्देश

तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026) योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.

  • पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण : माकडे, रानडुक्कर, नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यांमुळे पिकांवर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. यामुळे यामुळे शेतीला कुंपणामुळे सुरक्षा कवच यामुळे पिकांची नासाडी थांबते आणि शेतकरी आर्थिक नुकसान पासून दूर होतो.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य : शेतकरी हा खते, बियाणे आणि मजुरीवर खर्च करत असतो तो खर्च पीक नष्ट झाल्यामुळे वाया जातो. पिके सुरक्षित राहिल्यानंतर उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारते.
  • मानवी-वन्यजीव संघर्षात घट : कुंपणामुळे प्राणी शेतामध्ये येऊ शकत नाहीत, शेतामध्ये नसेल तर जंगलातील प्राणी अन्नाच्या शोधामध्ये येतात तेव्हा मानव आणि वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो. कुंपणामुळे हा संघर्ष कमी होऊ शकतो किंवा शांतही राहील.
  • शेती व्यवसायाला प्रोत्साहन देणे : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी शेती सोन्याचा निर्णय किंवा पडीक ठेवण्याचा विचार करत असतात. योजना त्यांना परत शेती करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि शेती व्यवसायातील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • उत्पादकता वाढवणे : शेतामधील पिकांचे नुकसान टाळतो तेव्हा शेतीतील एकूण उत्पादन अधिक प्रमाणात वाढते. याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यालाच होतो पण अप्रत्यक्षपणे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनावरही सकारात्मक परिणाम पडू शकतो.

पात्रता (Eligibility)

तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणाऱ्याकडे खालील पात्रता असणे अनिवार्य असते.

  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नाभावर शेत जमीन असणे अनिवार्य आहे.
  • त्या जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८-अ चा दाखला असणे अनिवार्य आहे.
  • जर जमीन सामायिक असेल तर इतर खातेदारांची ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • स्थानिक वन विभाग किंवा कृषी विभागाकडून शेतामध्ये कुंपण करायचे आहे, त्या भागांमध्ये रानडुक्कर नीलगाय किंवा इतर वन्य प्राण्यांचा त्रास होतो का याची खात्री केली जाते.
  • ज्यांच्या शेत जमीनी चळवळ क्षेत्राच्या लगत आहेत किंवा वन्यजीव मार्गावर आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येऊ शकते.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा लागतो.
  • अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी या जमिनीसाठी अशाच प्रकारचा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून कुंपणासाठी लांब घेतलेला नसावा.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष तरतुदी किंवा आरक्षित कोटा असू शकतो.
  • अर्ज करताना संबंधित क्षेत्रातील ग्रामपंचायती विकास समिती किंवा संयुक्त पण व्यवस्थापन समिती यांच्याकडून जमिनीच्या पिकाचे नुकसान होत आहे असे शिफारस पत्र मिळवणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • जमिनीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ७/१२ उतारा असणे अनिवार्य आहे.
  • गाव नमुना ८-अ जमिनीचे एकूण क्षेत्र दर्शवण्यासाठी आवश्यक आहे.
  • शक्य असल्यास संबंधित वर्षाचा पीक पेरा सोमनाचा असू द्या.
  • ओळख पटवण्यासाठी आणि पत्त्याचा पुरवा पाहण्यासाठी आधार कार्ड
  • बँक तपशील
  • पॅन कार्ड असेल तर
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र(Domicile Certificate)
  • संमती पत्र (NOC)
  • वन विभाग किंवा कृषी विभागाचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026) अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असते याचे मार्गदर्शन खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

  • सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://mahadbt.maharashtra.gov.in/
  • अगोदर तुम्ही नोंदणी केली नसेल तर आधार क्रमाचा वापर करून नोंदणी करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर कृषी विभाग या पर्यायावर क्लिक करा तिथे स्टार कंपनी योजना वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी कुंपण या यापैकी एका पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर अर्ज उघडेल अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती आणि जमिनीचा तपशील काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे (७/१२, ८-अ, आधार कार्ड) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासा माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या, कारण अर्ज सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही आणि माहितीमध्ये त्रुटी आढळल्यानंतर अर्ज रद्द होऊ शकतो.
  • माहिती अचूक असल्याची खात्री केल्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करा. यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा क्रमांक मिळेल जपून ठेवा.

अनुदान – Subsidy

तपशीलअनुदानाची टक्केवारी/मर्यादा
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी७५% ते ९०% पर्यंत
SC/ST प्रवर्गातील शेतकरी९०% ते १००%
किमान क्षेत्र मर्यादा साधारणपणे०.४० हेक्टर ते २.०० हेक्टरपर्यंत
प्रति हेक्टर कमाल अनुदानशासनाच्या दराप्रमाणे (उदा. ५०,००० ते १,००,००० रुपये)
Wire Fencing Scheme 2026 feature image
Wire Fencing Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे तार कुंपण योजना 2026(Wire Fencing Scheme 2026)या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना 2026 संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/rajarshi-shahu-maharaj/