Lek Ladki Scheme 2026 (लेक लाडकी योजना) मुलींसाठी Best संधी (Apply Now)

Lek Ladki Scheme 2026 (लेक लाडकी योजना) ही योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. गरीब पालकांकडे पैसे नसतात यामुळे मुलींना आर्थिक भार किंवा जबाबदारी म्हणून पाहिले जाते पालकांच्या डोक्यात हा असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे बालविवाहला आळा घालण्यात येतो, कारण मुलींचे वय 18 वर्ष आणि मुलगी अविवाहित असेल तर पैसे मिळतात. या योजनेमुळे मुलींचा बालविवाह होत नाही तर मुलींचे पूर्ण शिक्षण होते हे सर्व फक्त या योजनेमुळे शक्य होऊ शकते तर तुम्ही आत्ताच या योजनेचा अर्ज भरा. ही योजना मुलींसाठी मदतीचा हात नसून तर मुलगी स्वालंबी बनावी, समाजात मानाचे स्थान मिळवण्यासाठी ही एक महत्त्वाची चळवळ आहे.

या योजनेचे उद्देश

Lek Ladki Scheme 2026 (लेक लाडकी योजना) या योजनेचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • समाजात असलेले मुला-मुलींच्या संख्येतील विषमतेचे प्रमाण कमी करणे आणि पालकांच्या मनात मुलींच्या जन्माची स्वागत करण्याची मानसिकता बनवणे.
  • गरीब कुटुंबामध्ये पैशाची अडचण चालू असता मुलींचे शिक्षण दबवले जाते मुलीची शाळा सोडली जातेआणि बालविवाह करण्यात येतो अशी परिस्थिती येऊ नये हा एक मुख्य उद्देश आहे.
  • मुख्य उद्देश म्हणजे बालविवाहाला आळा घालणे, या योजनेचे पैसे मुलगी 18 वर्षाची आणि अविवाहित असल्याशिवाय मिळत नाही यामुळे बालविवाह होण्याचे प्रमाण कमी होते.
  • मुलींचे आरोग्य सुधारावे, मुलींना योग्य ते पोषण मिळावे, आरोग्य मध्ये सुधरणा व्होवी .
  • मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ७५,००० एवढी रक्कम मिळते ही रक्कम तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी ठरते ज्यामुळे ती सक्षम बनते.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भलिंग चाचणी या समस्येला आळा घालणे आणि मुलींना जगण्याचा समाजात अधिकार मिळवून देणे.

पात्रता (Eligibility)

  • १ एप्रिल २०२३ या तारखे दिवशी आणि या तारखेपासून पुढील ज्या मुलीचा जन्म होईल त्या मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.या तारखेपूर्वी जन्मलेल्या मुलीनां या योजनेचा लाभ घेता येत नाह.
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • रेशन कार्ड हे कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार मुनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १,००,००० रुपये पेक्षा कमी असावे.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील पहिला दोन अपत्यांपैकी मुलींनाच भेटू शकतो.
  • पहिल्या प्रसूतीच्या वेळी एक मुलगा किंवा एक मुलगी असेल आणि दुसऱ्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • मुलींना शेवटचा लाभ (₹७५,०००) हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि मुलगी अविवाहित असेल तरच मिळतो.

Lek Ladki Scheme 2026 (लेक लाडकी योजना) या योजनेचा लाभ तेव्हाच भेटतो जेव्हा मुलगी शिक्षण घेत असेल. या योजनेचे पैसे टप्पा टप्प्याने मिळत असतात (उदा. पहिली, ६ वी, ११ वी) या प्रत्येक टप्प्यात पैसे मिळवताना मुलगी शाळेत शिक्षण घेत असावी ( Bonafide Certificate पैसे मिळवताना हा दाखला असणे अनिवार्य आहे)

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • मुलीचा जन्म दाखला
  • मुलीचे आधार कार्ड
  • शाळेचा दाखला (मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे (पहिली, सहावी आणि अकरावी ) यासाठी पुरावा म्हणून मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र)
  • पालकांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
  • उत्पन्नाचा दाखला (१ लाख रुपये पेक्षा कमी)
  • बँक पासबुक असणे अनिवार्य आहे (मुलीचा व तिच्या आईचा संयुक्त बँक खाते किंवा आईचे बँक खाते पासबुक)
  • पालकांचे हमीपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

अनुदान (Benefit Amount)

  • १-सर्वात अगोदर मुलीचा जन्म झाल्यावर ₹५,०००
  • २-मुलीने इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतल्यानंतर ₹६,०००
  • ३-मुलीने इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर ₹७,०००
  • ४-मुलीने इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर ₹८,०००
  • ५-सर्वात लास्ट मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹७५,०००

एकूण जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत ₹१,०१,००० एवढी रक्कम मुलींना भेटते.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

Lek Ladki Scheme 2026 (लेक लाडकी योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:

1.ऑनलाइन पद्धत

  • सर्वात आधी महाराष्ट्र शासन अधिकृत सेवा पोर्टल ला भेट द्या womenchild.maharashtra.gov.in किंवा नारी शक्ती दूध हा मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करा
  • पालकांनी आपला मोबाईल नंबर टाकून त्या पोर्टलवर नोंदणी करा
  • स्किन वर विविध पर्याय दिसतात त्यामध्ये “लेक लाडकी योजना” हा पर्याय निवडा
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा
  • नमूद किरणे कागदपत्रे स्कॅन करून स्पष्ट स्वरूपात अपलोड करा
  • सर्व माहिती अचूक भरली आहे का त्यापासून अर्ज सबमिट करायानंतर मिळणारे पोचपावती किंवा एप्लीकेशन नंबर हा भविष्यासाठी जतन करून ठेवा.

2.ऑफलाइन पद्धत

  • तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका कडे जा लेक लाडकी योजनेचा विहित नमुनातील अर्ज मोफत मिळवा
  • अर्जामध्ये तुमच्या मुलीचे नाव, पालकांची नाव, जन्म तारीख, बँक खाते आणि रेशन कार्ड ची माहिती अचूक भरा
  • अर्जा सोबत आवश्यके असलेले सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रति स्वरूपात जोडा
  • भरलेले अर्ज आणि त्याला जोडलेली कागदपत्रे पुन्हा त्याच अंगणवाडी सेविकाकडे जमा करा.

निष्कर्ष (Conclusion)

ही योजना महाराष्ट्र शासनानी मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे मुलींना आर्थिक मदत मिळून त्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होते. पात्र असलेल्या मुलींना आर्थिक मदत मिळवून त्यांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी मदत होणार आहे लवकरात लवकर कागदपत्र सह वेळेत अर्ज करा.

सूचना (Disclaimer)

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Lek Ladki Scheme 2026 (लेक लाडकी योजना) अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही “प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेची” अधिक माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/pm-dhan-dhaanya-krishi-yojana-2026/