PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) Best मार्गदर्शक! (Apply Now)

PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) ही योजना शेतीचा विकास करण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी मंजुरी दिली.भारतातील आजही बहुतांश लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता हवामानात होणारे बदल याचा असर थेट शेतातील पिकांवर होत आहे, अशा समस्या दूर करण्यासाठी कृषी क्षेत्रात एका नवीन डिजिटल आणि शाश्वत युगाची सुरुवात करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत बियाणे आणि यांत्रिकीकरण हे वापरात यावे आणि याद्वारे पिकांचे उत्पादन वाढावे. या योजनेमधून फक्त अनुदान मिळत नाही तर शेतीकडे नेणारा सुवर्णमार्ग आहे. ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे.

या योजनेचा उद्देश

PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न हे वाढावे. खाली सविस्तरपणे उद्देश लिहिले आहेत:

  • या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे जिथे शेतीमध्ये उत्पादन कमी निघते, शेतीसाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • पारंपारिक शेती पद्धती म्हणजेच मजदूर काम सोडून शेतामध्ये यंत्रीकरणाचा वापर करण्यात यावा.
  • पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी प्रगत बियाणे उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांचा उच्च दर्जाचे हवामान अनुकूल करून देणे असा एक उद्देश आहे.
  • उच्च मूल्य असलेल्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळवणे आणि एकाच पिकांवर शेतकरी अवलंबून राहू नये हे सांगणे
  • रासायनिक खतांचा वापर कमी करणे आणि शेतामध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला वाढवा देणे
  • वेगवेगळ्या 11 मंत्रालयाच्या 36 योजनांना एकत्र आणून सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळवून देणे

अर्ज कोण करू शकतो? (Eligibility Criteria)

PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते हे खालील सविस्तर सांगितले आहे:

  • ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
  • ज्यांच्या नावावर शेती योग्य जमीन आहे अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात.
  • महिला शेतकरी असल्यास किंवा महिलांच्या नावावर शेती असल्यास या योजनेअंतर्गत महिलांना विशेष प्रोत्साहन आणि लाभ मिळू शकतो.
  • जे शेतकरी दुसऱ्यांच्या जमिनीवर भाडेतत्त्वावर किंवा करारावर शेती करतात अशा शेतकऱ्यांना विशेष अटींवर या योजनेमध्ये समाविष्ट केले जाते.
  • ही योजना संपूर्ण देशासाठी आहे तरीही पहिल्या टप्प्यात देशातील 100 निवडक आकांक्षी जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिले गेले आहे त्यामुळे त्याच जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा थेट आणि लवकरात लवकर लाभ मिळेल.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड (आधार नंबर हा बँक खात्याशी आणि तुमच्या मोबाईल नंबर ची लिंक असणे अनिवार्य आहे)
  • मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड
  • ​७/१२ उतारा (जमीन तुमच्याच नावावर आहे हे सिद्ध करण्यासाठी)
  • ८-अ उतारा (तुमच्या नावावर एकूण किती जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी)
  • ​भाडेपट्टा (जर तुम्ही इतरांच्या जमिनीवर शेती करत असाल तर अनिवार्य आहे)
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायाप्रत
  • पासपोर्ट साईज फोटो (फॉर्म वर लावण्यासाठी)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) या योजनेची अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येते

ऑनलाइन पद्धत:

  • सर्वात अधिक या अधिकृत पोर्टल ला भेटतात द्या mahadbt.maharashtra.gov.in
  • नंतर होमपेजवर नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडा
  • तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा नंतर तुमच्या मोबाईल वरती OTP येईल.
  • नंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच ना पत्ता मोबाईल नंबर बँक खात्याशी तपशील आणि जमिनीची माहिती हे सर्व अचूक भरा
  • नंतर सांगितलेली कागदपत्रे योग्य आकारात अपलोड करा
  • सर्व माहिती तपासा पूर्ण अचूक भरली आहे का आणि सबमिट करा
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर स्क्रीनवर अर्ज क्रमांक मिळेल त्याची प्रिंट काढून ठेवा.

ऑफलाइन पद्धत:

  • तुमच्या गावातील तलाठी, ग्रामसेवक किंवा तालुका कृषी अधिकारी या कार्यालयात जाऊन योजनेच्या नमुन्यातील अर्ज मोफत मिळवा
  • अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक, जमीन आणि बँकची माहिती अचूक भरा
  • अर्जा सोबत सांगितलेली कागदपत्रे जोडा
  • अर्ज पुन्हा एकदा तपासा सर्व माहिती अचूक आहे का, आणि अर्ज व सर्व कागदपत्रे तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे किंवा तालुका कृषी कार्यालयात जमा करा

कोणत्या जिल्ह्यांची निवड

खालील जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे: पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली

सूचना (Disclaimer)

या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Dhan-Dhaanya Krishi Yojana 2026 (प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना) अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

येथे तुम्ही “नमो शेतकरी निधी योजना” ची माहिती पूर्ण पाहू शकता: https://totalyojana.com/namo-shetkari-nidhi-yojana-2026/