प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) ही योजना शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी भारत सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख का नाम म्हणजे शेतकरी परंतु नैसर्गिक आपत्ती निश्चित पाऊस आणि पीक नसाडी यामुळे शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणामध्ये जोखीम असते.
ही योजना फक्त विमा संरक्षण नसून, शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करणारी एक उपक्रम आहे. 2026 हंगामी साठी या योजनेमध्ये काही महत्त्वाचे तांत्रिक बदल आणि निकष लागू करण्यात आले आहेत, या नवीन बदलांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना असणे महत्त्वाचे आहे. या योजनेचे अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अनुदान, योजनेचा उद्देश आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती खालील लेखकामध्ये पाहू शकता :
योजनेचा उद्देश
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) हे योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहेत :
- नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण : अंकाळी पाऊस दुष्काळ पूर्ण चक्रवाती रोगराई किंवा किडा यासारखे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते ते भरून काढणे.
- आर्थिक स्थैर्य प्रदान करणे : शेती मधील मोठ्या प्रमाणातील जोकिंग कमी करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, यामुळे शेती करणे फायदेशीर आणि शाश्वत राहील.
- कर्ज परतफेडीस मदत : पीक वाया गेल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज उचलतात. विमा भरपाई मिळाल्या नंतर शेतकरी आपली पीक कर्ज वेळेमध्ये फेडू शकतो ज्यामुळे ते कर्जबाजारी होण्यापासून वाचतो.
- आधुनिक शेतीस प्रोत्साहन : जोकिंग कमी झाल्यामुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञान, चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खते पिक वाढवण्यासाठी जास्त धाडस करू शकेल.
- शेतीतील गुंतवणूक टिकवून ठेवणे : नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नासल्यास होणारे आर्थिक नुकसान भरून काढल्यानंतर, शेतकऱ्याची पुढच्या हंगामीसाठी शेती करण्याची क्षमता वाढवू शकते.
पात्रता – Eligibility
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) या योजनेसाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.
- सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. यामध्ये अल्पभूधारक सीमांत, शेतकरी तसेच मोठ्या जमिनीचे मालक हे ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार शेतकरी हा जमिनीचा मालक असावा किंवा भाडेतत्बावर शेती करण्यात असावा. तुम्ही जर भाडे करू शेतकरी असेल तर तुमच्याकडे जमीन मालका सोबतचा नोंदणीकृत करारनामा असणे अनिवार्य आहे.
- तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शेती करत आहेत त्या क्षेत्रांमधील शासनाने ज्या पिकांसाठी विमा अधिसूचित केला आहे त्याच पिकाचा विमा काढता येणे शक्य आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा असली बंधनकारक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे AGRISTACK Farmer ID असणे बंधनकारक आहे. डिजिटल पिक सर्वेक्षणामध्ये पिकांची माहिती नोंदवलेली असणे अनिवार्य आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्जत घेतला आहे त्यांचे विमा हप्ते संबंधित बँकेद्वारे कापले जातात. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही ते शेतकरी स्वेच्छने या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे.
- जमिनीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ७/१२ उतारा
- अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर एकूण किती जमीन आहे हे पाहण्यासाठी ८-अ उतारा
- पेरणी प्रमाणपत्र (खर्च प्रमाणपत्र) (तलाठी किंवा ग्रामसेवकाकडून मिळालेले)
- AGRISTACK Farmer ID
- बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत
- शेती भाड्याने करत असाल तर : नोंदणीकृत भाडेकरार (Registered Lease Agreement)
- चालू असलेला मोबाईल नंबर
अनुदान – Subsidy
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) या योजनेचे अनुदान खालील प्रमाणात आहे.
| पिकाचा प्रकार | शेतकऱ्याचा हिस्सा |
| खरीप पिके | विमा रकमेच्या २% |
| रब्बी पिके (उदा. गहू, हरभरा, रब्बी ज्वारी इ.) | विमा रकमेच्या १.५% |
| हंगामी/नगदी/बागवानी पिके (उदा. फळबागा, भाजीपाला) | विमा रकमेच्या ५% |
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) योजनेची अर्ज प्रक्रिया पारदर्शक असते. त्याची संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे पाहू शकता:
- सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्या https://www.pmfby.gov.in
- त्यानंतर मुख्य पानावर “फार्मर कॉर्नर” हा विभाग निवडा.
- नोंदणी करण्यासाठी ‘Guest User’ म्हणून नोंदणी करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर नाव आणि आधार नंबर टाका.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा.
- Application पर्याय निवडा आणि तुमचे राज्य, जिल्हा, गाव आणि बँक खाते क्रमांक टाका.
- यानंतर पिकाचा तपशील पिकाची निवड आणि क्षेत्र टाका व ‘AGRISTACK Farmer ID’ आणि ७/१२ ही सर्व माहिती काळजीपूर्व भरा.
- वरील नमूद केलेली सर्व कागदपत्रे आधार कार्ड, ७/१२, ८-अ आणि बँक पासबुकच्या प्रती योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जुन शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या याशिवाय अर्ज पूर्ण मांडला जाणार नाही.
- अर्जामधील सर्व माहिती अचूक असलेची खात्री करून घ्या, अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
- माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा आणि तुम्हाला एक एप्लीकेशन नंबर मिळेल तू जपून ठेवा

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PM Peek Bima Scheme) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे मशरूम उत्पादन योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/mushroom-cultivation-scheme-2026/