महिला-केंद्रित पर्यटन कर्ज योजना 2026 (Women-Centric Tourism Loan Scheme 2026) या योजनेची सुरुवात म्हणजे महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल. या योजनेअंतर्गत राबवली जाणारी पर्यटन कर्ज योजना महिलांना उद्योजिका म्हणून घडवण्यासाठी एक आधार ठरत आहे. पर्यटन क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे अन्य योजनेअंतर्गत व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी म्हणून समोर आली आहे.
या योजनेअंतर्गत ₹15 लाख पर्यंत बिनव्याजी अर्थसहाय्य आणि विनातारण खर्च उपलब्ध करून देणारी ही एकमेव योजना आहे. महिलांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि अनुदानाची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:
योजनेचा उद्देश
महिला-केंद्रित पर्यटन कर्ज योजना 2026 (Women-Centric Tourism Loan Scheme 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- महिला उद्योजकतेला प्रोत्साहन : पर्यटन क्षेत्रांमधील महिलांची संख्या वाढवणे आणि त्यांना केवळ पर्यटक किंवा कर्मचारी म्हणून न ओळखता मालक किंवा उद्योजिका म्हणून ओळख करणे.
- आर्थिक स्वावलंबन : ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना पर्यटन व्यवसायासाठी लागणारे भांडवल सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे, यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकते.
- पर्यटन विकासाचे विकेंद्रीकरण : महिलांच्या माध्यमातून पर्यटनाचे जाळी गाव पातळीपर्यंत पोहोचवणे, यामुळे स्थानिक पातेवर परियोजनाचा विकास होऊ शकेल आणि रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होईल, यामुळे गावातील तरुण बेरोजगार राहणार नाही.
- बिनव्याजी आणि विनातारण आर्थिक आधार : व्यवसायसाठी कर्ज घेताना तारण नसल्यामुळे अडचण दूर होते आणि व्याजाच्या भारतात द्वारे महिलांवर आर्थिक भार कमी होतो.
- सुरक्षित आणि सर्वसमावेशक पर्यटन : महिला द्वारे चालवले जाणारे पर्यटन केंद्र हे पर्यटकांसाठी, विशेष म्हणजे महिला पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित आणि सविस्तर वातावरण निर्माण करते जेणेकरून महिलांना स्वातंत्र्य मिळेल.
- महिला रोजगाराला चालना : या योजनेअंतर्गत या व्यवसायामध्ये 50% पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना रोजगार मिळविण्यास मदत होऊ शकेल.
पात्रता – Eligibility
महिला-केंद्रित पर्यटन कर्ज योजना 2026 (Women-Centric Tourism Loan Scheme 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
- व्यवसाय पूर्णपणे महिलेच्या मालकीचा असावा किंवा त्या व्यवसायामध्ये संबंधित महिलेचा हिस्सा निर्णयक असणे बंधनकारक आहे.
- कर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी.
- प्रस्तावित पर्यटन व्यवसाय महाराष्ट्राच्या भौगोलिक हद्दीतच असणे अनिवार्य आहे.
- संबंधित व्यवसायाची पर्यटन संचालनालय आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे नोंदणी असणे अनिवार्य आहे किंवा तुम्ही व्यवसायाचा पर्यटन घटक म्हणून परवाना काढू शकता आणि तो सादर करू शकता.
- हा व्यवसाय जर ट्रॅव्हल एजन्सी किंवा तत्सम सेवक क्षेत्रांमधील असेल, तर त्यामध्ये किमान 50 टक्के कर्मचारी महिला असली बंधनकारक आहे.
- अर्जदार मोहिलेले महाराष्ट्र राज्यातील कोणतेही राष्ट्रीय कृत, सहकारी किंवा खाजगी बँकेकडून पर्यटन व्यवसायासाठी कर्ज घेतलेले असावे लागते.
पुढीलपैकी व्यवसायासाठी कर्ज मिळू शकेल :
- १.होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट (B&B)
- २. कृषी पर्यटन (Agro-Tourism)
- ३. पर्यटन माहिती केंद्र / टूर ऑपरेटर्स
- ४. साहसी पर्यटन उपक्रम (Adventure Tourism)
- ५. स्थानिक खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट किंवा कॅफे
- ६. हस्तकला विक्री केंद्र (Souvenir Shops)
- ७. प्रवासी वाहतूक सेवा (महिलांसाठी राखीव टॅक्सी किंवा टुरिस्ट गाड्या)
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
महिला-केंद्रित पर्यटन कर्ज योजना 2026 (Women-Centric Tourism Loan Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रेची यादी खालील प्रमाणे आहे.
- महिलेची स्वतःचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- व्यवसाय नोंदणी केलेले प्रमाणपत्र
- पर्यटन संचालनालय नोंदणी (तुमचा व्यवसाय पर्यटन घटक म्हणून पर्यटन संचलयाकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र)
- प्रकल्प अहवाल (Project Report)
- जर सांगा तुमची स्वतःची असेल तर जागेचा ७/१२ उतारा किंवा भाड्याची जागा असेल तर नोंदणीकृत भाडे करार असणे बंधनकारक आहे.
- कर्ज मंजुरी पत्र (Sanction Letter)
- कर्ज खात्याचे विवरण
- व्याज परतावा अर्ज
- कर्मचारी तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र
अर्ज प्रक्रिया – How to Apply
महिला-केंद्रित पर्यटन कर्ज योजना 2026 (Women-Centric Tourism Loan Scheme 2026) या योजनेचा अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
सर्वात आधी तुम्ही तुमच्या व्यवसायाची नोंदणी पर्यटन संचलनाच्या संकेतस्थळावर किंवा त्यांच्या संबंधित जिल्हा कार्यालयाकडे पर्यटन घटक म्हणून करून घेणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे याशिवाय अर्ज करू शकणार नाही.
ज्या व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेणार आहात, त्यासाठी सर्वात आधी कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेशी भेट द्या. बँकेमधून तुमचा प्रकल्प अहवाल तपासून कर्जाची “मंजुरी प्रत” घेणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :
- सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या maharashtratourism.gov.in
- यानंतर ‘आई’ (AAI) या योजनेचा विभाग शोधा आणि तुमचं नाव पत्ता आणि जन्मतारीख टाकून नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
- शॉपिंग केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, बँक तपशील, आणि व्यवसायाची सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्जा मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या आणि नंतर सबमिट करा. कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
- अर्ज सबमिट करून झाल्यानंतर अर्जाचे प्रिंट आऊट काढून घ्या. जर अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे महिला-केंद्रित पर्यटन कर्ज योजना 2026 (Women-Centric Tourism Loan Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/pm-peek-bima-scheme/