Janani Suraksha Yojana 2026:- जननी सुरक्षा योजना| गरोदर महिलांसाठी Best मार्गदर्शन

Janani Suraksha Yojana 2026:- जननी सुरक्षा योजना ही एक अत्यंत कल्याणकारी योजना आहे. ही योजना फक्त आर्थिक मदतीचे साधन नाही तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील मातांना सरकारी आरोग्य यंत्रणेसोबत जोडून त्यांना सुरक्षित मातृत्व प्रधान करून देण्यासाठी एक आधारस्तंभ आहे. आरोग्य हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे आणि सोबतच मातृत्वाचा प्रवास सुरक्षित ठेवणे ही कुठल्याही समाजाच्या प्रगतीची पहिली पायरी असते.

गरोदरपणामध्ये गुंतागुंत आणि बाळंतपणाच्या वेळी होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी संस्थात्मक प्रसूती महत्त्वाची आहे. ही योजना हजारो मतांसाठी वरदान ठरत आहे कारण माता आणि बालमृत्यू दर कमी होण्याच्या राष्ट्रीय ध्येयाला कधी देणारी ही योजना आहे. जर तुम्हालाही वाटते ही योजना महत्वकांशी यांनी कल्याणकारी आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे पात्रता आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची सर्व माहिती खालील लेखकामध्ये पाऊ शकता.

Janani Suraksha Yojana :- योजनेचा उद्देश

जननी सुरक्षा योजना 2026 या योजनेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे आहेत:

  • माता आणि बालमृत्यू दर कमी करणे : गरोदरपणामध्ये आणि प्रसूती दरम्यान आई तसेच नवजात बालकांचा मृत्यू दर कमी करणे हे या योजनेचे सर्वात महत्त्वाचा उद्देश मानला जातो.
  • संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देणे : प्रसूती घरी करण्याऐवजी सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये प्रसूती करण्यासाठी मातांना प्रोत्साहित करणे, यामुळे प्रसूती दरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटातस आणीबाणी त्वरित उपचार मिळू शकतील.
  • गरीब कुटुंबांना आर्थिक आधार : गरीब कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा महिला दुर्लक्ष करत असतात त्यांना प्रस्तुतीसाठी लागणारा खर्च झेपावण्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना देऊन मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • आरोग्य सेवांचे सक्षमीकरण : सार्वजनिक आरोग्य केमिस्ट्री लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी सरकारी केंद्राच्या माध्यमांमधून प्रसूतीची सुविधा पुरवणे.
  • अशक्तपणा व आजारांचे प्रमाण कमी करणे : वैद्यकीय तपासणी वेळेवर आणि सुरक्षित प्रसूती द्वारे आई आणि बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे.

पात्रता – Eligibility

जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असणार याची यादी खालील प्रमाणे आहे.

  • गरोदर महिन्याचे वय 19 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेचा लाभ पहिल्या दोन जिवंत अपत्य घेऊ शकतात. तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या पत्त्यासाठी ही योजना लागू असू शकत नाही.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रसूती ही अनिवार्यपणे सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या खाजगी आरोग्य संस्थेमध्ये झालेली असणे अनिवार्य आहे.
  • गरोदरपणाची सुरुवातीच्या काळात जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रामध्ये, अंगणवाडीमध्ये किंवा अशा सेवेकडे गरोदर मातेची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • ही योजना पुढील गटातील महिलांसाठी अधिक फायदेशीर ठरते :१) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांसाठी. २) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी.

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

जननी सुरक्षा योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे:

  • ओळख पटवण्यासाठी अर्जदार महिन्याचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड यापैकी कोणतीही एक असले तरी चाल.
  • गरोदरपणामध्ये नोंदणी केल्यानंतर मिळणारे माता आणि बाल संगोपन कार्ड (MCP Card)
  • नोंदणी केल्यानंतर मिळणारा अधिकृत क्रमांक : RCH नोंदणी क्रमांक
  • बँक तपशील
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • दारिद्र्य रेषेखालील (BPL) प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया – How to Apply

जननी सुरक्षा योजना 2026 या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असलेली संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

गरोदरपणाच्या सुरुवातीला केलेली नोंदणी

  • गरोदर झाल्यानंतर 12 आठवड्याच्या आत तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविका कडे आपली नोंदणी करून घ्यावी.
  • अंगणवाडी सेविका तुम्हाला सरकारी आरोग्य केंद्रामध्ये नोंदणी करतील आणि तुम्हाला माता निवांत संगोपन कार्ड देतील.

गरोदरपणामधील तपासणी : या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदरपणाच्या काळात नियमित आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केल्यानंतर मिळालेली कार्ड आणि नोंदणी क्रमांक तुमचे मुख्य आधार असतील.

प्रसूती वेळी ची प्रक्रिया : प्रस्तुतीसाठी सरकारी रुग्णालयाची किंवा योजनेसाठी मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयाची निवड करून घ्या.
रुग्णालयामध्ये दाखल होताना MCP कार्ड आणि आधार कार्ड सोबत ठेवणे फायदेश ठरेल. हॉस्पिटल प्रशासनाला तुमची जननी सुरक्षा योजना या योजनेचे लाभार्थी आहेत हे सांगावे लागेल.

लाभ मिळवण्याची प्रक्रिया (प्रसूतीनंतर)

  • प्रसूती यशस्वी पूर्ण पारपडल्यानंतर, हॉस्पिटल मधील संबंधित क्लर्क किंवा जननी सुरक्षा विभागाकडे तुमचा अर्ज जमा करा.
  • यानंतर तुम्हाला तिथेच एक साधा क्लेम फॉर्म भरून घ्यावा लागतो.
  • फॉर्म सोबतच तुमचा बँक पासबुकची प्रत आणि आधार कार्डची प्रत जोडणे बंधनकारक असते.
  • कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासन ही माहिती आरोग्य विभागाच्या पोर्टल द्वारे अपडेट करत असतो.
  • सर्व माहिती योग्य आणि अपलोड झाल्यानंतर शासन तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा करतो.
  • योजनेची माहिती पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट : nhm.gov.in

अनुदान

लाभार्थी गटप्रसूतीचे ठिकाणअनुदानाची रक्कम (रूपयांत)
ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थीसरकारी/मान्यताप्राप्त रुग्णालय700
शहरी क्षेत्रातील लाभार्थीसरकारी/मान्यताप्राप्त रुग्णालय600
BPL लाभार्थीस्वतःच्या घरी500
Janani Suraksha Yojana 2026 feature image
Janani Suraksha Yojana 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे जननी सुरक्षा योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “LIC विमा सुखी योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/lic-bima-sakhi-yojana-2026/