Women Construction Workers Maternity Benefit Scheme 2026 : महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना ही योजना कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या विकासात बांधकाम क्षेत्र असते. परंतु या योजना तीन महिला कामगारांना विविध सामाजिक शारीरिक आणि आर्थिक समस्याला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे मातृत्व आणि संगोपनाच्या काळात देखील महिला कामावर जात असतात ते शक्य होत नाही, यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत प्रमाण होऊ शकतो.
महाराष्ट्र शासनाने या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ’ (MahaBOCW) मार्फत महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना ही योजना सुरू केली आहे. २०२६ वर्षाच्या नियमानुसार महिलांना आता प्रसूती काळात कामावर जाण्याची गरज नसून, महिला कामगारांना प्रसूती काळा योग्य आहार, योग्य वैद्यकीय उपचार आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी सुधारणा या योजनेमध्ये करण्यात आली आहे.
महिला कामगारांच्या नवजात बालकांना आधार देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हालाही त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकामध्ये पाहू शकता:
Women Construction Workers Maternity Benefit Scheme 2026 : पात्रता – Eligibility
महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व अटी उमेदवारांना पूर्ण करणे महत्त्वाचे असते.
- महिला अर्जदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेली असणे आणि तिची नोंदणी सक्रिय असणे अनिवार्य असते.
- असं करण्याअगोदर महिला कामगारांनी केवळ 90 दिवस मागील बारा महिन्यांमध्ये बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक असते, ज्याचे प्रमाणपत्र किंवा स्वयं घोषणापत्र अनिवार्य आहे.
- या योजनेचा लाभ फक्त पहिल्या दोन जिवंत अपत्यासाठी उपलब्ध आहे.
- प्रसूती शासकीय, निमशासकीय रुग्णालयामध्ये किंवा अधिकृत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या मार्गदर्शनाखाली झालेली असणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिला बांधकाम कामगार यांच्याकडे खालील कागदपत्राची यादी अर्ज करण्यासाठी महत्त्वाची असते.
- कामगार असल्याचे ओळखपत्र : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत मिळालेले ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
- महिला कामगार यांचे ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड
- या योजनेचे अनुदान डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होते त्यासाठी बँक तपशील
- वैद्यकीय कागदपत्रे (प्रसूतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज कार्ड)
- जन्म झालेल्या बालकाचा जन्म दाखला (Birth Certificate).
- महिला 12 महिन्यांपूर्वी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे याचे प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण कार्ड.
- पहिल्या दोन अपत्य विषयीचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र
Women Construction Workers Maternity Benefit Scheme 2026 : वयोमर्यादा – Age limit
| निकष / घटक | तपशील |
| महिला कामगाराची वयोमर्यादा | अर्ज करत असलेल्या महिला कामगाराचे वय १८ वर्षे ते ४० वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. |
| अपत्य मर्यादा | या योजनेचा लाभ फक्त पहिल्या दोन जिवंत असलेल्या बालकांच्या प्रसूतीसाठीच दिला जातो. |
| बालकाचे वय (अर्जासाठी) | प्रसूती झाल्यानंतर कमाल १ वर्षाच्या आत (किंवा नियमांनुसार निर्धारित मुदतीत) योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. |
Women Construction Workers Maternity Benefit Scheme 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
- सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या mahabocw.in
- जर तुम्ही या अगोदर नोंदणी केली नसेल तर नोंदणी करण्यासाठी चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरा.
- नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करा
- लोगिन केल्यानंतर योजना विभागांमधून प्रसूती सहाय्य योजना या योजनेची निवड करा.
- अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख) काळजीपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे (आधार कार्ड, बँक पासबुक, डिस्चार्ज कार्ड, जन्म दाखला) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
Women Construction Workers Maternity Benefit Scheme 2026 : अनुदान
| प्रसूतीचा प्रकार / बाब | अनुदानाची रक्कम |
| नैसर्गिक प्रसूती (Normal Delivery) | 25,000 |
| सिझेरियन प्रसूती (Casarean Delivery) | 25,000 |
| गर्भपात किंवा गर्भधारणा विस्कळीत झाल्यास | आरोग्यासाठी 10,000 |
| विशेष तरतूद (अपघात / बालमृत्यू) | दुर्दैवी प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला तर, जिल्हा शल्यचिकिस्तकांच्या प्रमाणपत्र आधारित ठरलेले सहाय्य. |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “सलोखा योजना 2026” या योजनेची माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/salokha-scheme-2026/