Salokha Scheme 2026 : सलोख योजना|शेत जमीन तुमची परंतु ताबा दुसऱ्यांचा असेल तर आताच अर्ज करा Best मार्गदर्शन

Salokha Scheme 2026 : जमीन तुमची आहे, परंतु ताबा दुसऱ्यांचा आहे! असे तुमच्या सोबत हे होत आहे का? जर हो, तर हा लेख संपूर्ण वाचा कारण महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील सामाजिक नागरिकांसाठी सलोख योजना सुरू केली आहे. जर तुमच्या शेतावर दुसऱ्यांनी ताबा मिळवला आहे किंवा मालकी हक्क गाजवत आहे यामुळे वारंवार शेतासाठी वाद निर्माण होत आहेत तर ही योजना तुमच्यासाठीच आहे.

शेतीसाठी होणारे वाद अनेक वर्षे दिवाणी न्यायालयात प्रलंबित राहतात, ज्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो आणि सामाजिक शांतीवरही होत असतो. आया परिस्थितीमध्ये काय करावे? याच गोष्टीवर तोडगा म्हणून महसूल विभागाने जमिनीचे वाद मिटविण्यासाठी आणि विनासायास मिटवण्यासाठी सखोल योजना 2026 या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नाममात्र मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कथा जमिनीचा अधिकृत अदला बदल करण्याचा मुभा देण्यात आला आहे. या योजनेमुळे फक्त शेतकऱ्यांचे आर्थिक लूट थांबली जात नाही तर जमिनीचे कागदपत्रांचे वास्तवस्थितीनुसार अद्ययावतीकरण करणे सोपे झाले आहे.

सलोख योजना फक्त योजनाच नसून, महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबामध्ये विश्वास आणि सखोल निर्माण करणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल बनत आहे. तुम्हाला या योजनेचा वापर करून शेती आपली मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे ते संधी गमवू नका आणि आताच अर्ज करून घ्या. अर्ज करण्यासाठी लागणारे नियम व अटी, आवश्यक कागदपत्रे, शेत जमीन परत मिळवण्यासाठी लागणारी प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया त्याची सर्व माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता…

Salokha Scheme 2026 या योजनेचा उद्देश

महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधील शेतीशी संबंधित वाद मिटवून शेतकऱ्यांना समाधानी करण्यासाठी योजनेचा प्रमुख उद्देश आहे. खालील प्रमाणे योजनेचे सर्व उद्देश आहेत :

  • जमिनीचे वाद कायमचा मिटवणे : खूप वेळा शेतकरी आपापसात जमिनीचे अदला बदल करत असतात पण कागदपत्रे ती नोंदणी केलेली नसते. यामुळे उद्भवणारे भविष्यातील वाद निर्माण होतात. हे वाद न्यायालयात घेऊन न जाता, सरकारी स्तरावर परस्पर संमतीने सोडवणे.
  • कायदेशीर गुंतागुंत दूर करणे : भरपूर वर्षापासून एका शेतकऱ्याच्या जमिनी दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आणि दुसऱ्याच्या जमिनी पहिल्याच्या ताब्यामध्ये अशी साखळी निर्माण असते. अशा परिस्थितीमध्ये ताबा आणि मालकी हक्क यांच्यामधील तफावत दूर करणे आणि जमिनीच्या नोंदणी अधिकृत कायदेशीर करून देणे.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करणे : जमिनीच्या अदलाबदली साठी सामान्यता सर्वांना मोठा मुद्रण शुल्क भरावे लागते. या योजनेमुळे ते शुल्क फक्त 1000 मुद्रांक शुल्क आणि 1000 नोंदणी शुल्क एवढा असू शकतो.
  • महसूल नोंदी अद्ययावत करणे : समोरासमोर जमिनीचा ताबा आणि महसूल दस्तऐवज यामध्ये सुसंगतता निर्माण करून देणे यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा इतर शासकीय कामे विनासायास होतील.
  • सामाजिक शांतता राखणे : जमिनीच्या वादातून ग्रामीण भागात अनेकदा हिंसाचार किंवा दीर्घकाळ चालणारे कौटुंबिक वाद चालू असतात. हे वातावरण समाजात सखोल आणि सुसंवाद कायम टिकवून ठेवण्यासाठी हा या योजनेचा नाना मागील आणि सपने मागील मुख्य हेतू आहे.

आवश्यक कागदपत्रे

सलोख योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि जमीन परत आपल्या करण्यासाठी खालील कागदपत्राची यादी असणे अनिवार्य आहे.

  • जमिनीची अदलाबदल करायची आहे त्या दोन्ही जमिनीची चालू वर्षाची ७/१२ उतारे असणे आवश्यक आहे.
  • जमिनीच्या मालकी हक्क टाकण्यासाठी ८-अ चा उतारा असणे अनिवार्य आहे.
  • असलाबदल करणाऱ्या दोन्ही शेतासंबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेताची अदलाबदल करायची आहे त्या जमिनीची अचूक जागा समजण्यासाठी गावाचा नकाशा किंवा गट नकाशा असणे आवश्यक आहे.
  • ध्वनी शेतकऱ्यांचे आदलाबदली कोणतेही हरकत नाही असे संमती पत्र लेखी असणे आणि मध्ये आहे.
  • सर्वात महत्त्वाची कागदपत्रे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी संबंधित शेतकरी यांच्या उपस्थित जमिनीचे प्रत्यक्ष ताबा कोणाकडे आहे या अधिकृत पंचनामा करण्यात येतो.
  • स्वाक्षरी आणि पासपोर्ट साईज फोटो
  • नोंदणी शुल्क भरल्याची पावती

Salokha Scheme 2026 : लागणारी पात्रता

  • ही सलोख योजना फक्त शेती जमिनीसाठीच लागू आहे. अकृषक जमिनी, रहिवासी भूखंड किंवा व्यावसायिक जागा अशा गोष्टींसाठी योजना लागू नाही.
  • जादू किंवा अधिक शेतकऱ्यांमध्ये जमिनीची अदलाबदल होणार आहे त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्वयंघोषीत संमती असणे आवश्यक असते.
  • शेतजमिनीचा प्रत्यक्ष ताबा हा महसूल रेकॉर्ड पेक्षा वेगळा असावा साधारणपणे अनेक वर्षापासून चिमणीची अदलाबदल झालेली असावी आणि त्या जमिनीवर त्या शेतकऱ्याचा प्रत्यक्ष ताबा असणे अनिवार्य आहे.
  • ध्वनी शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ जवळपास सारखे असावे लागते.
  • ज्या शेतजमिनी बाबत बदलाबद्दल करायचे आहे त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची गंभीर कायदेशीर वाद किंवा न्यायालयात प्रलंबित खटला नसणे.
  • जमीन ज्याच्या नावावर आहे ते कायदेशीर मालक किंवा वारसदार असावेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वारसा हक्कावरून वाद नसावे लागतात.
  • जमिनीच्या संबंधित सर्व कर किंवा सरकारी देणे भरलेली असावी अर्धवट नसावी लागते.

अर्ज प्रक्रिया – How to Apply

सलोख योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही मोजून विभागाने अतिशय सोप्या पद्धतीने ठेवली असून याची सर्व माहिती खालील लेखा मध्ये पाहू शकता:

  • सर्वप्रथम ज्याच्या सोबत जमिनीची अदलाबदल करायची आहे त्या संबंधी शेतकऱ्यांची चर्चा करून घ्यावे. दोन्ही पक्षकारांचे या अदलाबदनिस एकमत असणे आवश्यक असते.
  • नमूद केल्याप्रमाणे दोन्ही पक्षकारांचे ७/१२ उतारे, ८-अ चा उतारा, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार ठेवा.
  • तुमच्या गावांमधील तलाठी यांच्याकडे योजनेचा अर्ज किया तलाठी तुम्हाला योजनेचा अर्ज नमुना देतील. त्या अर्जामध्ये दोन्ही जमिनीचे गट नंबर क्षेत्रफळ आणि अदलाबदली चे कारण योग्य अक्षरांमध्ये स्पष्टपणे लिहा.
  • अर्ज सादर केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जमिनीवर येथील. तिथे ते दोन्ही पक्षकारांच्या उपस्थितीमध्ये जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून घेतील आणि त्यांचा पंचनामा करून घेतील.
  • पंचनामा वर दोन्ही शेतकरी आणि दोन्ही पंचांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात.
  • महसूल विभागाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क मिळून भरणे आवश्यक असते.
  • सर्व कागदपत्रे यांनी पंचनामा पूर्ण झाल्यानंतर संबंधित तहसीलदार किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.
  • इथे आदलाबदली चा अधिकृत दस्त तयार केला जातो. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसूल विभाग अधिकृतपणे ७/१२ उताऱ्यावर आणि गाव नमुना नंबर ६ मध्ये आवश्यक असलेले बदल करतो. यामुळे जमिनीचे कागदोपत्री मालकी तुमच्या प्रत्यक्ष ताब्यात सोबत जुळत असते.
  • महाराष्ट्र शासनाचे महसूल विभाग संकेतस्थळ : https://mahrev.gov.in
Salokha Scheme 2026 feature image
Salokha Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे सखोल योजना 2026 (Salokha Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “मधुमक्षिका पालन योजना 2026” या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/bee-keeping-scheme-2026/