Mahajyoti Free Tablet Scheme 2026 (महाज्योती मोफत टॅब योजना) ही योजना इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे आणि माहितीचे युग आहे या सोबतच आजच्या काळात “डिजिटल शिक्षण” अनेक विद्यार्थी घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी अडचण येऊ नये म्हणून ‘महाज्योती मोफत टॅप योजना’ सुरू करण्यात आली आहे. JEE, NEET आणि MHT-CET यासारख्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी डिजिटल साहित्य असणे आवश्यक आहे डिजिटल साहित्य मार्फत विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस लावून शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थी पैशांभावी किंवा साधनांभावी मागे राहतात या कारणांमूळे महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर मोफत टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या योजनेचा उद्देश:
Mahajyoti Free Tablet Scheme 2026 (महाज्योती मोफत टॅब योजना) ही योजना सुरू करण्यामागील अत्यंत महत्त्वाचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही, गरीब आणि श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साधनांमुळे निर्माण झालेली दरी मिटवणे.
- श्रीमंत आणि गरीब विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे, कारण कोचिंग लावण्या इतके पैसे गरीब विद्यार्थ्यांकडे नसतात यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाही किंवा मागे राहतातपरंतु आता या योजनेमुळेविद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट डेटा आणि कोचिंग देऊन ही अडचण दूर करणे.
- विद्यार्थ्यांना घरीबसल्या कोणत्याही नामांकित प्राध्यापकांचे ऑनलाईन क्लासेस पाहता यावेत, ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना डिजिटल माध्यम उपलब्ध करून देणे हा हेतू आहे.
- JEE (IIT), NEET (Medical) आणि MHT-CET आशा कठीण परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश पूर्ण देशाला दाखवून देणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, शिक्षणाची आवड निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
कोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात?
- विद्यार्थी हा महाराष्ट्रातील पुढील प्रवर्गातील असावा: OBC (इतर मागासवर्गीय) VJ-A (विमुक्त जाती) NT-B, NT-C, NT-D (भटक्या जमाती) SBC (विशेष मागास प्रवर्ग)
- विद्यार्थी हा 10 वी उत्तीर्ण असावा
- विद्यार्थ्याने अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा JEE, NEET किंवा MHT-CET या परीक्षेची तयारी करत असावा
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख यापेक्षा कमी असा आणि नॉन क्रिमिलेअर असणे बंधनकारक आहे
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
वरील नियमास विद्यार्थी पात्र असतील तर Mahajyoti Free Tablet Scheme 2026 (महाज्योती मोफत टॅब योजना) या योजनेचा लाभ घेऊ शकता.
पात्रता (Eligibility)
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
- विद्यार्थी केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील असावा ( OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC)
- अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा.
- विद्यार्थ्याने 11 वी मध्ये विज्ञान शाखा निवडली असावी
- JEE (इंजिनिअरिंग), NEET (मेडिकल) किंवा MHT-CET विद्यार्थी हा या स्पर्धा परीक्षा देणार असावा
- नॉन-क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) असणे अनिवार्य आहे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे ₹8 लाख पेक्षा कमी असणे अनिवार्य आहे
आवश्यक कागदपत्रे (Requried Documents)
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- 10वी ची गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate – LC)
- 11 वी मध्ये सायन्सला प्रवेश घेतल्याची फी पावती किंवा बोनाफाईड (Bonafide Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
- विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photograph)
वरील सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात स्पष्ट दिसतील अशी अपलोड करा कागदपत्रे अपूर्ण असेल किंवा अस्पष्ट असेल तर अर्ज परत येऊ शकतो.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Mahajyoti Free Tablet Scheme 2026 (महाज्योती मोफत टॅब योजना) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:
- अर्ज करता वेळेस सर्वात अगोदर महा ज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या : mahajyoti.org.in
- नोंदणी करते वेळेस ‘Notice Board’ किंवा ‘Registration’ हा पर्याय निवडून नोंदणी करा
- नंतर “Registration for JEE/NEET/MHT-CET Training” (किंवा मोफत टॅब योजना) अशा प्रकारची लिंक दिसेल ती निवडा
- तुमची वैयक्तिक माहिती ही अचूक भरा
- तुमचा प्रवर्ग (OBC, VJNT, SBC)
- 10वी चे गुण आणि 11वी मध्ये तुम्ही प्रवेश घेतलेल्या कॉलेजचे नाव
- आधार कार्ड 10वी ची गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर, 11 वी ची प्रवेश पावती (फी पावती/बोनाफाइड), ही सर्व कागदपत्रे अपलोड करा
- विद्यार्थ्यांचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- वरील भरलेली सर्व माहिती अचूक आहे का तपासून सबमिट करा
- अर्ज यशस्वी पूर्ण सबमिट झाल्यावर त्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
सूचना (Disclaimer)
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Mahajyoti Free Tablet Scheme 2026 (महाज्योती मोफत टॅब योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
येथे तुम्ही लेक लाडकी योजना या योजनेची अधिक माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/lek-ladki-scheme-2026/