Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) ही योजना भारत सरकार द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणकारी सामाजिक सुरक्षिततेसाठी ९ मे २०१५ रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. अनेक नागरिकांना वृत वृद्धपकाळात नियमित पेन्शन भेटत नसल्याने अनेक नागरिकांना स्वाभिमानाने जगता येत नाही. अटल पेन्शन योजना ही फक्त एक व्यक्ती पूर्ती मर्यादित नाही संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा कवच म्हणून काम करते. भारत सरकारी कर्मचाऱ्यांना इतर पेन्शन योजने लाभ भेटत असतात. परंतु, शेतमजूर, घर कामगार, रिक्षा चालक, छोटे दुकानदार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना वृद्धकाळात उत्पन्नाचे साधन नसते, यामुळे जगणे कठीण होते या गोष्टीवर तोडगा म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ वयाच्या ६० वर्षानंतर खत्रीशी जमा होतो. वृद्धा काळात नागरिकांना स्वतःच्या छोटा गरजा भागवण्यासाठी इतरावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. सर्व भारतीय नागरिकांमध्ये तरुण वयापासूनच भविष्यासाठी बचत करण्याची आवड निर्माण होते. अटल पेन्शन योजना ही फक्त एक व्यक्तीपूर्ती मर्यादित नाही तर या योजनेचा लाभ सर्व कुटुंबाला सुरक्षित करते. ज्या व्यक्तींनी या योजनेचा अर्ज केला आहे त्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पेन्शन त्या व्यक्तीच्या पती किंवा पत्नीला आयुष्यभर तितकीच मिळत जाते.
या योजनेची वैशिष्ट्ये
Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) वैशिष्ट्ये काय आहे ते खालील प्रमाणे पाहूया:
- तिहेरी सुरक्षा कवच (Triple Benefit) : अर्जुनधाराला ६० वर्षानंतर मुख्य गुंतवणूकदाराला दरमहा आयुष्यभर पेन्शन मिळत जाते. मुख्य गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या पती किंवा पत्नीला तितकीच पेन्शन आयुष्यभर मिळत जाते. एवढेच नव्हे तर दोघांचाही मृत्यू झाला तर त्यांची संपूर्ण मूळ रक्कम त्यांच्या अपत्याला (मुलगा किंवा मुलगी (वारसदार)) देण्यात येते.
- वयानुसार कमी प्रीमियम (Age-based Premium) : तुम्ही जेवढ्याला लवकर म्हणजे कमी वयात या योजनेची छोटी छोटी गुंतवणूक कराल तेवढाच मासिक प्रीमियम म्हणजे पैसे जमा करण्यासाठी लागणारी रक्कम कमी होतो. १८ व्या वर्षी ₹५,००० पेन्शनसाठी दरमहा फक्त ₹२१० भरावे लागतात आणि जर वय ४० झाले ₹१,४५४ भरावे लागतात.
- ऑटो-डेबिट सुविधा (Auto-Debit Facility) : प्रीमियम भरण्यासाठी बँकेत जाण्याची आवशक्यता नाही घरी बसल्या तुमच्या लिंग केलेल्या बचत खात्यातून प्रत्येक महिना त्रैमासिक किंवा सहामाही पद्धतीनुसार पैसे आपोआप कट केले जातात.
- कर सवलतीचा फायदा (Tax Benefits) : या गुंतवणुकीवर प्राप्तीकर कायद्याच्या Section 80CCD अंतर्गत ५०,००० पर्यंतच्या अतिरिक्त गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.
- सुलभ अपग्रेड आणि डाऊनग्रेड (Flexibility) : जर गुंतवणूकदाराला आपल्या भविष्यात पेन्शन कमी किंवा पाडवायची असेल तर ते वाढवता किंवा कमी करता, आर्थिक वर्षानुसार वर्षातून एकदा त्यात बदल करण्याची मुभा मिळते तेव्हा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता.
पात्रता (Eligibility)
- गुंतवणूकदार हा भारताचा रहिवासी असावा.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ ते ४० वर्षे मध्ये असावे.
- अर्जदाराचे कोणत्याही बँक खात्यामध्ये बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- आधार कार्ड (आधार कार्ड हे बँक खात्याची आणि मोबाईल नंबर सोबत लिंक असावे लागते.)
- गुंतवणूकदाराचे दरमहा ची गुंतवणूक आपोआप कापली जाते यामुळे गुंतवणूकारांनी खात्यात पुरेशी रक्कम न ठेवल्यास दंड होऊ शकतो.
Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील अटी व नियम मान्य असावे लागते
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जदाराकडे असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी स्वतःचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुक (Bank Passbook)
- चालू असलेला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ची लिंक असलेला.
- वारसदाराची माहिती (Nominee Details)
- अर्जदार विवाहित असेल तर पती किंवा पत्नीचे नाव आणि त्यांचा आधार कार्ड नंबर.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) या योजनेचे अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने केली जाते. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी खालील प्रक्रिया पहावी.
१. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Process)
e-NPS पोर्टलद्वारे (आधार आधारित) :
- Protean (पूर्वीचे NSDL) च्या अधिकृत e-NPS वेबसाईटवर भेट द्या https://enps.nsdl.com
- रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडून तुमची वैयक्तिक माहिती भरा.
- माहिती भरून झाल्यानंतर Atal Pension Yojana निवडा
- तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर OTP आलेला सबमिट करा.
- बँक तपशील भरा.
- पेन्शनचा पर्याय निवडा व अर्ज सबमिट करा.
२. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Process)
- तुमच्या ज्या बँकेमध्ये बचत खाते काढले आहे तिथे भेट द्या.
- बँक मधून Application Form (अटल पेन्शन योजना नोंदणी फॉर्म) मिळवा. (हा फॉर्म तुमच्या बँकेच्या किंवा पेन्शन विभागाच्या वेबसाईट वरून डाउनलोड करता येतो)
- फॉर्म मध्ये दिलेली संपूर्ण माहिती अचूक भरा (नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि बँक खाते तपशील)
- तुम्ही दर महा किती गुंतवणूक करणार आहेत ते चिन्हांकित करा.
- तुमच्या नंतर पेन्शन कोणाला द्यायचे (पती/पत्नी आणि वारसदार) त्याचा नाव व आधार तपशील भरा.
- फॉर्म वरती स्वाक्षरी करा व बँक अधिकाऱ्यांकडे जमा करा.
- बँक तुमचे तपशील पडताळून खाते सुरू करतो आणि तुमच्या मोबाईलवर PRAN (Permanent Retirement Account Number) चा मेसेज येईल तू जतन करून ठेवा.
मिळणारे अनुदान (Financial Assistant)
Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) या योजनेद्वारे मिळणारे अनुदान खालील टप्प्यात लिहिले आहे.
१. सरकारी अनुदानाचा नियम (Government Co-contribution)
केंद्र सरकारकडून प्रतिवर्ष कमाल १,००० रुपये गुंतवणूकदाराच्या खात्यात एकूण वार्षिक प्रीमियमच्या ५०% रक्कम अनुदान म्हणून जमा करण्यात येते. हे अनुदान पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरकारकडून देण्यात येते.
२. अनुदानासाठीच्या अटी (कागदोपत्री नियम)
कर्जदार इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत नसावेत. सरदार इन्कम टॅक्स भरणारा नसावा. टिप : २०२६ मध्ये नवीन खाते उघडणारा सामान्य नागरिकांना आता सरकारकडून ५०% सह अनुदान मिळत नाही. गुंतून मुक्ताराला स्वतःच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागतो.
३. अप्रत्यक्ष आर्थिक फायदे (Indirect Benefits)
- ५०,००० पर्यंतच्या गुंतवणुकीवर Section 80CCD (1B) अंतर्गत तुम्हाला घरातून सुट मिळते, यामुळे पैशाची बचत होते.
- व्यवस्थापन शुल्क अत्यंत कमी म्हणजेच नाहीसे आहे, कारण या योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड नियामक यांच्याकडून केले जाते.
- कदाचित मार्केट घसरले तरीही सरकार तुम्हाला तुमचे ठराविक पेन्शन देण्याची कमी घेते, यात मार्केटचा चड उताराचा काही संबंध नाही याचा अभाव तुमच्या पेन्शनवर पडत नाही.

Disclaimer
या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे Atal Pension Yojana 2026 (अटल पेन्शन योजना) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे मागील त्याला शेततळे योजना 2026 मी योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/magel-tyala-shettatle-yojana-2026/