PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) :- आई सुकरूप तर बाळ सुकरूप हे लक्षात ठेवून भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालय मार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. गर्भवती महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता योग्य मार्गदर्शन व सामाजिक सुरक्षा या योजनेद्वारे देण्यात आली आहे. ही योजना प्रामुख्याने गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना म्हणजेच ज्या आईचे बाळ आणखी छोटे आहे अशा मातांना सामाजिक सुरक्षा या योजनेद्वारे देण्यात येत आहे. आपल्या भारत देशात गरीब कुटुंबामध्ये आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी गर्भवती महिलेला अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत काम किंवा मजुरी करावी लागते जेणेकरून कुटुंबाचा खर्च भागेल.
या गोष्टी लक्षात घेता विश्रांती आणि आवश्यक्य पोषण मिळत नाही याचा गंभीर परिणाम आई आणि बाळावर आरोग्यावर होऊ शकतो.वरील गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारने या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला पहिला अपत्याच्या जन्मावेळी सरकार ५,००० आणि दुसऱ्या अपत्यावेळी ६,००० रुपये ची आर्थिक मदत देणार आहे. या योजनेच्या मिळणारा लाभ, योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) पुणे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सविस्तर लिहिलेली आहेत:
- या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाशिवाय किंवा कुठल्याही कार्यालयात न जाता मोहिनीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिस च्या खात्यामध्ये जमा होते.
- PM Matru Vandana Yojana 2026 या योजनेअंतर्गत सुरू केलेल्या नवीन नियमानुसार समाजात मुलीबद्दल असलेला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो.
- या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ म्हणजे दुसऱ्या प्रसूतीमध्ये मुलगी झाल्यास महिलेला ६,००० रुपये मिळतात.
- या योजनेचे नवीन नियमांनुसार या योजनेचा अर्ज करताना पतीचे अधार कार्ड जोडणे अनिवार्य नाही. यामुळे ज्या महिलेचे पती सोबत राहत नाहीत अशा महिलेला कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि या योजनेचा लाभ पूर्ण कोणी घेता येतो.
- या योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी गरोदरपणाची नोंदणी लवकर करणे कमीत कमी एक प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि जन्मानंतर बाळाचे लसीकरण योग्य वेळी करणे बंधनकारक आहे. यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित आणि सुधारण्यास मदत होते.
- PM Matru Vandana Yojana 2026 या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि डिजिटल करण्यात आली आहे ज्यामुळे नागरिक स्वतः घरी बसल्या या योजनेच्या अधिकृत पोर्टल द्वारे किंवा मोबाईल ॲप द्वारे लवकर अर्ज करू शकतात.
- ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही अशा महिलांसाठी अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका या योजनेचा अर्ज भरण्यास मदत करतात.
अर्ज कोण करू शकतो? (Eligibility Criteria)
PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता किंवा नियम खालीलप्रमाणे दिलेले आहेत:
- अर्जदार महिलेचे वय १९ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे लागते.
- महिला गर्भवती आहे असे जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडीमध्ये नोंदवलेले असणे अनिवार्य आहे.
- SC / ST प्रवर्गातील सर्व महिला या योजनेचा अर्ज भरू शकतात.
- आर्थिकदृष्ट्या मागास महिला अर्ज करू शकतात पण एक अट आहे महिन्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपये पेक्षा तुम्ही असावे लागते.
- रेशन कार्ड असलेल्या महिला
- ज्या महिला शेती करतात आणि मजुरी करतात
- ज्या महिला आरोग्य व सामाजिक कार्यकर्त्या आहेत अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- दिव्यांग महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- पीएम-जेएवाय या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डधारक असणाऱ्या महिला अर्ज भरू शकतात.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- महिलेचे स्वतःचे आधार कार्ड
- माता-बाल संरक्षण कार्ड (MCP Card)
- बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस खाते पुस्तक (महिलेचे)
- दुसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे : बालकाचे जन्म प्रमाणपत्र, लसीकरणाचे रेकॉर्ड (MCP Card)
- दुसऱ्या अपत्याच्या वेळी (मुलगी झाल्यास – ₹६,००० साठी) : महिलेचे आधार कार्ड आणि बँक पासबुक, दुसऱ्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र, लसीकरणाचे रेकॉर्ड.
- खालीलपैकी कोणती एक कागदपत्रे असेल तर चालेल:
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड किंवा पिवळे/केसरी रेशन कार्ड
- ई-श्रम (e-Shram) कार्ड.
- मनरेगा (MGNREGA) जॉब कार्ड.
- जातीचा दाखला
- दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र
- आयुष्मान भारत (PM-JAY) चे हेल्थ कार्ड.
PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे महिलेकडे असणे अनिवार्य आहे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने मोफत अर्ज करता येऊ शकते.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या pmmvy.wcd.gov.in
- यानंतर Citizen Login या पर्यायला क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल द्वारे आलेला OTP टाका.
- लॉगिन झाल्यावर ‘Data Entry’ पर्यायामध्ये जाऊन ‘Beneficiary Registration’ हा पर्याय निवडा आणि फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरा (नाव, पत्ता आणि वय, गरोदरपणाची माहिती, बँक तपशील आणि ई-श्रम कार्ड, रेशन कार्ड)
- सांगितलेली अर्जदार मोहिलेचे कागदपत्रे : आधार कार्ड, बँक पासबुक, MCP कार्ड आणि पात्रता प्रमाणपत्र योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- भरलेली माहिती तपासून घ्या अचूक आहे का आणि सबमिट करा. सर्वात महत्त्वाचे तुम्हाला अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो तो जतन करून ठेवा.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वात अगोदर तुमच्या गावातील असलेली अंगणवाडी केंद्राला भेट द्या.
- अंगणवाडी सेविका कडून या योजनेचा मोफत फॉर्म मिळवा.
- फॉर्ममधील सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक भरा. त्यामुळे तुमची स्वाक्षरी किंवा अंगठा उमटवा. त्या फॉर्म सोबतच तुमची सर्व कागदपत्रे छायाप्रती जोडा.
- हा भरून झालेला पूर्ण फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे द्या.
- तुम्ही दिलेली फॉर्म आणि कागदपत्र अंगणवाडी सेविका तपासते आणि स्वतःच्या असलेल्या सरकारी सॉफ्टवेअर लॉगिन मधून तुमचा अर्ज ऑनलाईन पणे सबमिट करते.
मिळणारे फायदे
PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) या योजनेअंतर्गत महिलेला मिळणारे फायदे सविस्तर खालील प्रमाणे लिहिलेली आहेत.
१. पहिल्या अपत्याच्या जन्माच्या वेळी (एकूण ₹५,०००)
- पहिला हप्ता : गरोदरपणाची सुरुवातीची नोंदणी केल्यानंतर आणि अंगणवाडी किंवा सरकारी दवाखान्यात कमीत कमी एक प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर हा पहिला हप्ता ३,००० रुपये मिळतो.
- दुसरा हप्ता : बाळ झाल्यानंतर बाळाची जन्म नोंदणी आणि बाळाला प्राथमिक लसीकरण म्हणजेच पहिले चक्र पूर्ण झाल्यानंतर हा दुसरा हप्ता २,००० मिळतो.
२. दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी
- दुसऱ्या प्रसूतीमध्ये गर्भवती महिलेला मुलगी झाली तर मातेला ६,००० रुपये मिळते.
३. अतिरिक्त संस्थागत प्रसूती लाभ
- लाभार्थी महिलेची प्रसूती शासकीय रुग्णालयात केली असेल तर तिला योजने सोबतच जननी सुरक्षा योजना अंतर्गत रोख रक्कम मिळते.
- यामुळे ग्रामीण भागातील महिलेला साधारणपणे १,४०० आणि शहरी महिलेला १,००० फायदा होतो.
लाभार्थी यादी कशी तपासावी?
- सर्वप्रथम तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या pmmvy.wcd.gov.in
- मुख्य पानावर असलेल्या Citizen Login पर्याय निवडा.
- तुमचा अर्ज करताना तुम्ही दिलेला मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल द्वारे आलेला OTP टाकून लॉगिन करून घ्या.
- लॉगिन झाल्यानंतर, डॅशबोर्ड वर तुम्हाला Track Application Status’ किंवा ‘Beneficiary Status’ या दोन पर्यायांपैकी एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका किंवा आधार नंबर टाकून सर्च करा. तुमच्या अर्जाची स्थिती तू मला दिसेल आणि बँक खात्यात पैसे जमा झालेत की नाहीत याची ही माहिती मिळेल.

महत्त्वाची सूचना : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे PM Matru Vandana Yojana 2026 (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे किसान क्रेडिट कार्ड योजना 2026 त्या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता: https://totalyojana.com/kisan-credit-card-kcc-scheme-2026/