मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) तरुण युवकांसाठी सुवर्णसंधी! प्रशिक्षणाद्वारे मिळणार पैसे! Best मार्गदर्शन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) ही योजना महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वाढती बेरोजगारी आणि उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त मनुष्यबळ याची कमतरता हे पाहून महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरवात केली. या दोन प्रमुख समस्येवर उपाय काढण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेमुळे फक्त तरुणांना रोजगार मिळत नाही, तर त्यांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण कामाचा अनुभव, कामासाठी सज्ज केले जाते. अनेक तरुणांकडे शिक्षण पात्रता आहे पदवी आहे परंतु कामाचा अनुभव नसल्याने काही ठिकाणी त्यांना रोजगार मिळत नाही, आणि ते बेरोजगार राहतात पैसे कमवण्याची कुठलीही संधी नसते. परंतु आता या योजनेअंतर्गत कामाचा अनुभव मिळेल आणि त्या कामाच्या अनुभवावरून रोजगारही मिळेल. ही योजना खास करून तरुणांसाठी बनली आहे, या योजनेमुळे महाराष्ट्रातील तरुण पिढीला स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आणली जाते.

जर तुम्हालाही कामाचा अनुभव मिळवायचा असेल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, या कामा अंतर्गत मिळणारे वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती खालील लिखामध्ये पाहू शकता.

योजनेचा उद्देश

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) या योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे दिला आहे.

  • कौशल्य विकास आणि अनुभव : अनेकदा तरुणांकडे शैक्षणिक पात्रता असते परंतु कामाचा अनुभव नसल्याने त्यांना रोजगार देण्यास नकार मिळतो. आता या योजना अंतर्गत सर्व तरुण पिढीला कामाचा अनुभव मिळवून देणे.
  • रोजगारक्षमतेत वाढ (Employability) : प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवारांना त्वरित कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी उद्योगांच्या गरजा आणि तरुणांचे कौशल्य यामधील दरी कमी करणे.
  • आर्थिक स्वावलंबन : तुरुंगात प्रशिक्षण दरम्यान स्वावलंबी राहू शकतील यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्या वेतन देणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे.
  • उद्योगांना कुशल मनुष्यबळ : राज्यातील सर्व विविध उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळू शकेल.
  • ​बेरोजगारीचे निर्मूलन : सर्व तरुण पिढीला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि राज्यातील बेरोजगारीची तरी कमी करणे हाय या योजनेच्या सर्वात मोठा आणि प्रमुख उद्देश आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

  • आयटीआय (ITI) पूर्ण असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेमध्ये पदवीधारक उमेदवार पात्र ठरतात.
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतात.
  • पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

टीप : तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला विद्यावेतन निश्चित केले जाते. अर्ज करताना तुमच्याकडे संबंधित शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) या योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची यादी तयार केली आहे.

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक असणे बंधनकारक आहे.
  • १० वी, १२ वी, आयटीआय (ITI), पदविका (Diploma) किंवा पदवीची (Degree/Post-Graduate) यापैकी जे शिक्षण तुमचे पूर्ण आहे त्याची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे.
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • बँक तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

सूचना : वरील सर्व कागदपत्रे अधिकृत आणि स्पष्ट दिसत असावेत. अर्ज प्रक्रिया सादर करताना सर्व माहिती अचूक आहे याची काळजी घ्या. चुकीची माहिती असल्या नंतर अर्ज रद्द होऊ शकतो.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) या योजनेची अर्ज प्रक्रिया आहे खालील प्रमाणे दिली आहे.

  • सर्वात अगोदर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या https://cmykpy.mahaswayam.gov.in/
  • सर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन नसेल केले तर आता Register या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमची मूलभूत माहिती भरून घ्या आणि नोंदणी पूर्ण करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • मुख्य पानावर जाऊन तुमचे शैक्षणिक माहिती, कौशल्य, पत्ता आणि इतर आवश्यक वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • त्यानंतर पोर्टलवरील योजना विभागामध्ये जाऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेची निवड करा.
  • योजनेच्या माहितीच्या खालील अप्लाय या पर्यायावर क्लिक करा. यानंतर अर्ज ओपन होईल.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक भरली आहे याची खात्री करून घ्या. सर्व माहिती अचूक असेल तर अर्ज सबमिट करा.
  • अर्ज पूर्णपणे समीर झाल्यानंतर तुम्हाला “एप्लीकेशन आयडी” मिळेल त्याची प्रिंट काढून ठेवा.

वेतन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) या योजनेचे वेतन हे तरुणाच्या शिक्षण पात्रतेनुसार खालील प्रमाणे दिली आहे.

शैक्षणिक पात्रतादरमहा विद्यावेतन (Stipend)
१२ वी उत्तीर्ण6,000
आयटीआय (ITI) / पदविका (Diploma)8,000
पदवीधर / पदव्युत्तर (Graduate / Post-Graduate)10,000
CM Youth Intership & Traning Scheme 2026 feature image
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026)

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CM Youth Intership & Traning Scheme 2026) या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “महाराष्ट्र शेतजमीन भाडपट्ट्याने देण्यासाठी नवीन नियम” लागू झाली याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/maharashtra-agricultural-land-lease/