Nucleus Budget Scheme 2026 : अनुसूचित जमाती (ST) वर्गासाठी सुवर्णसंधी | Best मार्गदर्शन

Nucleus Budget Scheme : भारतामधील राहणाऱ्या घटकांचा सर्वसमावेशक विकास होण्यासाठी शासनाचे मुख्य ध्येय असतात. विशेष म्हणजे दुर्गम आणि अति दुर्गम भागातील वास्तव्य करणाऱ्या अधिवासी समुदायाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास सर्वांसोबत म्हणजे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते.

शासन योजनेच्या चौकटीबाहेर जाऊन तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने आदिवासी विकासासाठी ‘न्यूक्लिअस बजेट योजना’ राबवली जात आहे. योजना आदिवासी बांधवाच्या नवीन पूर्ण कल्पनांना आणि स्थानिक गरजेच्या प्रकल्पांना मंजुरी देणारे एक उत्तम व्यासपीठ बनत आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:

Nucleus Budget Scheme 2026 : योजनेचा उद्देश

न्यूक्लियस बजेट योजनेचा प्रमुख उद्देश खालील प्रमाणे देण्यात आले आहेत:

  • सर्वसमावेशक विकास : भारतातील सर्व घटकांचा सोबतच आदिवासी समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास मुख्य प्रवाहात आणणे.
  • स्थानिक गरजांची पूर्तता : आदिवासी घटकांचा नियमित अर्थसंकल्पामध्ये समावेश नाही परंतु स्थानिक पातळीवर अत्यंत गरजेच्या असलेल्या आणि अभिनव स्वरूपाच्या प्रकल्पांना मंजुरी देणे.
  • आर्थिक स्वावलंबन : वैयक्तिक लाभाच्या योजनेद्वारे आदिवासी कुटुंबांना उत्पन्नासाठी नवीन स्त्रोत म्हणून देणे.
  • सामूहिक प्रगतीला चालना : आदिवासी मानवांना सामूहिक प्रकल्पाच्या माध्यमातून सहकार्य करणे आणि सामुदायिक विकासाची भावना प्रोत्साहित करणे.
  • प्रशासकीय सुलभता : स्थानिक पातळी मधील प्रशासकीय यंत्रणेला अधिकार दिल्यानंतर कागदपत्राची प्रक्रिया लवकर करणे आणि योग्य वेळेवर मदत पोहोचवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

Nucleus Budget Scheme 2026 : पात्रता – Eligibility

न्यूक्लियस बजेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उमेदवाराकडे खालील अटी व पात्रता पूर्ण असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्र रहिवासी असलेले अनिवार्य आहे.
  • अर्जदार अनुसूचित जमाती मधील असणे आवश्यक आहे, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले वैद्य जात प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक ठरते.
  • योजनेसाठी पात्र पुढील ठरतात : अनुसूचित क्षेत्र पेसा क्षेत्र किंवा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत आदिवासी कुटुंब इत्यादी.
  • प्राधान्य या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालीलंबांना आणि सोबतच अत्यंत मागास आणि विशेष मागास आदिवासी घटकांना दिले जाते.
  • अर्जदाराने यापूर्वी अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

न्यूक्लिअस बजेट योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) : महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी क्षेत्रातील रहिवासी असल्याचा दाखला.
  • ओळख पटवण्यासाठी अर्जदारायचे आधार कार्ड (Aadhaar Card) असले अनिवार्य आहे.
  • बँक तपशील
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाहण्यासाठी उत्पन्न दाखला असणे गरजेचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो
  • प्रकल्पाचे दरपत्रक/कोटेशन
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र (तुम्ही राहत असलेल्या स्थानिक ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र किंवा अर्ज मान्यताबाबतचा ठराव)

अर्ज प्रक्रिया How to Apply

न्यूक्लियस बजेट योजना चा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया अगदी सरळ आणि सोप्या भाषेत आहे कशी करावी हे खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या क्षेत्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये किंवा जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये जाम योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा. काही ठिकाणी अर्ज संबंधित ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये उपलब्ध असतो.
  • अर्जामधील वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), बँक तपशील आणि आवश्यक प्रकल्पाचा किंवा साहित्याचा तपशील काळजीपूर्वक करा.
  • वरील नमूद केलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत त्यांच्या साक्षांकित प्रति जोडा.
  • स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतीचा ठराव शिफारस पत्र सोबत जोडणे अनिवार्य आहे आणि फायदेशीर ठरते.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रासोबत संबंधित ITDP प्रकल्प कार्यालयामध्ये स्वतः जमा करा आणि जमा केल्यानंतर पोचपावती लक्ष करून घ्या.
  • प्रकल्प कार्यालयांमध्ये अधिकारी अर्जाची आणि कागद पत्राची तपासणी केली जाते गरज असल्यास स्थळ पाहणी देखील करण्यात येते.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही समोरील लिंक ला भेट देऊ शकता https://cpetp.trti-maha.in/ आणि महत्वाची प्रक्रिया वरील सांगितल्या प्रमाणेच आहे.

अनुदान

न्यूक्लियस बजेट योजना या योजनेचे अनुदान खालील प्रमाणे देण्यात आले आहे

लाभाचा प्रकारअनुदान
वैयक्तिक लाभ50,000
सामूहिक प्रकल्प7,50,000
विशेष मागास कट (PVTG)100% पर्यंत अनुदान
Nucleus Budget Scheme 2026 feature image
Nucleus Budget Scheme 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे न्यूक्लिअस बजेट योजना या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे महिला बांधकाम कामगार प्रसूती सहाय्य योजना 2026 या योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/women-construction-workers/