Paramparagat Krishi Vikas Yojana 2026 : सध्याच्या रासायनिक युगामध्ये शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे. पिकांवर रासायनिक खताचा वापर केल्यामुळे शेतीमधील उत्पन्न तात्पुरते वाढते परंतु त्याचा परिणाम मातीची सुपीकता, मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत जातो.
या कमी समस्या लक्षात घेऊन सरकारने या समस्येला मात करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना 2026 या योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना सेंद्रिय शेतीला पुनरुज्जीवित करणारी एक अत्यंत महत्त्वाची मोहीम ठरली आहे. या योजनेद्वारे रासायनिक विरहित, पारंपारिक आणि निसर्गपूरक शेती पद्धतीचा अवलंब करून जमिनीची ढासळलेली गुणवत्ता सुधारण्यास मदत करते आणि विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घेणारे भर दिला जातो. तुमचे उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि नियम व अटी याची सर्व माहिती खालील प्रमाणे आहे.
Paramparagat Krishi Vikas Yojana 2026 : योजनेचा उद्देश
परंपरागत कृषी विकास योजना 2026 या योजनेचे प्रमुख देश खालील प्रमाणे आहेत.
- सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीचे नासाडी न होऊ देता पारंपारिक आणि नैसर्गिक शेती पद्धतीसाठी प्रोत्साहित करणे.
- जमिनीची सुपीकता सुधारणे : सेंद्रिय खतांचा वापर करून मातीची गुणवत्ता आणि मातीची जलधारण क्षमता वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
- विषमुक्त अन्नधान्य उत्पादन : मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या रसायनाचा वापर न करता शुद्ध पौष्टिक आणि दर्जेदार अन्नाचे उत्पादन करणे.
- उत्पादकता टिकवून ठेवणे : नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून दीर्घकाळ टिकणारे आणि शाश्वत शेती व्यवस्था निर्माण करणे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ : सेंद्रिय शेती उत्पादनांना बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळवून देऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणे.
- बाजारपेठेचा विस्तार : शेतकऱ्यांना थेट स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठे जोडून त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

Paramparagat Krishi Vikas Yojana 2026 : पात्रता व नियम – Eligibility & Rules
परंपरागत कृषी विकास योजना 2026 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील पात्रता व नियम पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- ही योजना वैयक्तिक शेतकऱ्याऐवजी शेतकरी गटांसाठी आहे. समानता या योजनेसाठी 20 ते 50 शेतकऱ्यांचा मिळून 20 हेक्टर क्षेत्राचा एक गट असणे म्हणजे कारक आहे.
- सहभागी शेतकऱ्यांकडे स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक असून तीन जमीन रासायनिक मुक्त सेंद्रिय शेतीसाठी रूपांतरित करण्यास शेतकरी तयार असावे.
- या योजनेसाठी एकाच गावातील किंवा लगतच्या परिसरातील शेतकरी एकत्र येऊन हा गट तयार करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- शेतकऱ्यांनी कमीत कमी तीन वर्षे सेंद्रिय शेती पद्धतीचे अवलंब करण्याची आणि रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे बंद करण्याची तयारी दर्शविणे आवश्यक असते.
- नियम व अटी (Rules & Regulations)
- शेतकऱ्यांना स्थानिक कृषी अधिकारी किंवा आत्मा यंत्रणेच्या मदतीने अधिकृत प्लास्टर किंवा शेतकरी उत्पादक गट अगोदरच तयार असावा लागतो.
- उत्पादित शेतमाल सेंद्रिय असल्याचे सिद्ध करण्यासाठी सहभागी गारंटी प्रणाली अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असते.
- मिळणारी आर्थिक मदत थेट रासायनिक खते सोडून सेंद्रिय, गांडूळ खत, जैविक कीटकनाशके आणि शेतात करावयाचे मार्गदर्शन प्रशिक्षण उपक्रमांवरच खर्च करावी लागतात.
- गटातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सेंद्रिय शेती विषयक प्रशिक्षण शिबिरांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये उपलब्ध आहे परंतु त्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
Paramparagat Krishi Vikas Yojana 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
परंपरागत कृषी विकास योजना 2026 या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रांची यादी असेल तर फायदेशीर ठरू शकते.
- पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
- पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा विज बिल असणे अनिवार्य आहे.
- जमिनीचा ७/१२ (सातबारा) आणि ८-अ उतारा जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी.
- आवश्यक असेल तर जमिनीचा नकाशा ही लागतो.
- बँक पासबुक च्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स कारण अनुदानाची रक्कम डायरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यात येते.
- किंवा बँकेमध्ये रद्द केलेला चेक.
- शेतकरी गटाची नोंदणी केलेली पत्र किंवा स्वाक्षरी असलेली सहमती पत्र.
- सहभागी गारंटी प्रणाली अंतर्गत नोंदणी अर्ज किंवा कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर
अर्ज प्रक्रिया – How to Apply
परंपरागत कृषी विकास योजना 2026 अंतर्गत कर्ज करण्याचे आणि लाभ मिळवण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
- सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक अर्ज न करता कमीत कमी 20 ते 50 शेतकऱ्यांचा मिळून एक गट किंवा क्लस्टर तयार करणे अनिवार्य आहे.
- गटातील शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी किंवा आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची माहिती परिपूर्ण मिळवा.
- कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटाचा प्रस्ताव तयार करून त्यात सर्व सहभागी शेतकऱ्यांची माहिती आणि जमिनीचे क्षेत्र सोबत सातबारा उताऱ्याचा तपशील जोडणे अनिवार्य असते.
- योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासाठी कृषी विभागाच्या साह्याने PGS-India (Participatory Guarantee System) या अधिकृत पोर्टलवर शेतकरी गटाची ऑनलाईन नोंदणी करण्यात येते.
- कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गटाच्या कागदपत्रांची आणि जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी करण्यात येईल, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव उच्च स्तरावर मंजूर करण्यात येतो.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीसाठी मिळणारे आर्थिक अनुदान पात्र शेतकऱ्याच्या डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
| नोंदणी करण्याचे अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे वन स्टॉप सेंटर योजना 2026 या योजनेचे संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalyojana.com/one-stop-centre-scheme/